‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Kantara चित्रपटातील ‘पंजुर्ली’ आणि ‘गुलिगा’ हे देव कोण आहेत?
सगळीकडेच ‘कांतारा १’ ची चर्चा आहे… रिषभ शेट्टीचं उत्कृष्ट लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनयाचं कौतुक करण्यासाठी शब्दच अपुरे पडतील… चित्रपटाची कथा तर अप्रतिम आहेच; पण विशेष आकर्षण आहे ते म्हणजे या चित्रपटात उल्लेख केलेल्या पंजुर्ली आणि गुलिगा या दोन देवतांचं… नेमकी काय आहे या दोन देवतांची कथा जाणून घेऊयात… (Panjurli and Guliga))
कांतारा चित्रपटातल्या वराह रुपम हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत झालं आहे… या गाण्यात उल्लेख केलेला वराह हा विष्णुचा अवतार आहे हे आपण जाणतोच… तसेच, कांतारा चित्रपटामध्ये दोन देव दाखवले आहेत… पंजुर्ली आणि गुलिगा … दक्षिणेत प्रामुख्याने कर्नाटकात पंजुर्ली देवाची पूजा केली जाते... पंजुर्ली देवाला जमीन आणि शेतीचं रक्षण करणारा देव मानलं जातं… सुख, समृद्धी आणि भरभराट यांचा आशीर्वाद पंजुर्ली देवाकडून मिळतो अशी दक्षिणेत मान्यता आहे… (Kantara : The Legend-Chapter 1)

तर, इतर काही कथांनुसार पंजुर्लीची वेशभुषा पाहिली तर लक्षात येतं की, पंजुर्लीच्या डोक्यावर जो मुकुट आहे त्याच्यावर वराह आहे. कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये पंजुर्लीची पूजा करत भूता कोला हा उत्सवही साजरा केला जातो. एका दंतकथेनुसार कैलास पर्वतावर पार्वती मातेला एक अनाथ डुकराचं पिल्लू भेटलं… पार्वतीला त्या पिल्लाची दया आली आणि तिने त्या पिल्लाला मांडीवर घेतलं आणि पंजुर्ली हे नाव त्याला दिलं. पंजुर्ली जंगलाचा रक्षक आहे असंही म्हटलं जातं… (Entertainment news)
आता कांतारामध्ये उल्लेख केलेल्या गुलिगा देवाची निर्मिती कशी झाली? तर असं मानलं जातं की शंकराकडून गुलिगाची निर्मिती झाली आहे. भगवान शंकराने एक दगड फेकला त्यातून गुलिगा जन्माला आला असं मानलं जातं. गुलिगा हा उग्र देव आहे असं म्हटलं जातं.. तर, दक्षिण कर्नाटकातील संस्कृतीनुसार गुलिगाचा जन्म हा शंकरामुळे त्याच्या भस्मामुळे झाला आहे अशीही मान्यता आहे. दक्षिणेत सांगितल्या जाणाऱ्या एका दंतकथेनुसार देवी पार्वतीला भस्माचा एक विचित्र दगड दिसला. जेव्हा हा दगड पार्वतीने भगवान शंकराच्या हाती दिला तेव्हा त्यांनी तो दगड खाली फेकला आणि तो फुटून त्यातून गुलिगा जन्माला आला… शिवाय, भगवान विष्णुच्या रक्षणासाठी म्हणजेच पंजुर्लीच्या रक्षणासाठी गुलिगाला पाठवलं गेलं अशीही मान्यता दक्षिणेत आहे. (Kannada movies)
================================
=================================
काही दंतकथेत असं देखील सांगितलं जातं की, गुलिगाने विष्णुलोकात उत्पात माजवला होता.. त्यावेळी भगवान विष्णुने गुलिगाला शाप दिला आणि पृथ्वीवर पाठवलं… तेव्हा पंजुर्ली आणि गुलिगा यांच्यात युद्ध झालं आणि काही केल्या ते थांबेना… तेव्हा दुर्गा देवीने येऊन ते युद्ध थांबवलं आणि त्यांना सतत एकत्र राहा असं सांगितलं… अगदी तेव्हापासूनच पंजुर्ली आणि गुलिगा यांची पूजा एकत्र करण्यास सुरुवात झाली आणि गुलिगा हा पंजुर्लीचा रक्षक झाला असंही मानलं जातं. कोला उत्सवात पंजुर्ली आणि गुलिगा यांचं रुप घेऊन अनेकजण नाच करतात आणि दोघांच्या मैत्रीतलं दर्शन घडवतात.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi