स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

‘महाभारत’ मालिकेतील कर्ण काळाच्या पडद्याआड; अभिनेते Pankaj Dheer यांचा कॅन्सरने मृत्यू
दुरदर्शनवर ९०च्या दशकात प्रसारित झालेली ‘महाभारत’ मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली… जितकी लोकप्रियता या मालिकेला मिळाली त्याहून जास्त प्रेक्षकांनी प्रतिसाद मालिकेतील पात्रांना दिला… मात्र, आज (१५ ऑक्टोबर) या मालिकेत कर्णाची भूमिका साकारणाऱे अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer Death) यांचं निधन झालं.. वयाच्या ६८ व्या वर्षी कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे…

पंकज धीर यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं होतं… पंकज यांनी ‘सडक’, ‘सोल्जर’, ‘बादशाह’, ‘टारझन :द वंडर कार’, ‘आरजू’, ‘जागृती’, ‘परदेसी’, ‘सनम बेवफा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… मात्र, त्यांना अधिक लोकप्रियता ‘महाभारत’ मालिकेतील कर्णाच्या भूमिकेमुळे मिळाली होती…
================================
हे देखील वाचा : ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!
================================
तसेच,’चंद्रकांता’ या मालिकेत त्यांच्या ‘शिवदत्त’ या भूमिकेचीही खूप प्रशंसा झाली. ‘बढो बहू’, ‘युग’, ‘द ग्रेट मराठा’ आणि ‘अजूनी’ यांसारख्या मालिकेतही त्यांनी काम केले होते. दरम्यान, पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीर हा देखील एक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता असून ‘जोधा अकबर’, ‘चेन्नई एक्सप्रेस’सारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्याने कामं केली आहेत…. (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi