Abhijeet Sawant : जुन्या गाण्याला नवा साज;अभिजीत चाहत्यांना देणार सरप्राईज

Paresh Rawal १५ दिवस पित होते त्यांचीच लघवी? अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ
Paresh Rawal बॉलीवुडतील अत्यंत बहुपरकीय अभिनेता आहेत. त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. खलनायकापासून ते कॉमेडी आणि गंभीर पात्रे निभावण्यात परेश रावलचा हात कोणीही धरु शकत नाही. या सर्वांच्या मध्ये दिग्गज अभिनेता ने त्याच्या नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीत चकित करणारी गोष्ट सांगितली आहे ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेता परेश रावल यांनी नुकतीच ‘दा लल्लनटॉप’ ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या जीवनाशी संबंधित एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले की चित्रपट ‘घातक’ च्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांना गुडघ्यात गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये एडमिट होणे भाग झाले. आणि उपचारादरम्यान त्यांच्या भेटीमध्ये अॅक्शन डायरेक्टर आणि अभिनेता अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण यांच्याशी संवाद झाला. आणि त्यांनी म्हटले की वीरू देवगण यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 15 दिवस त्यांची लघवी प्यायली आहे.(Paresh Rawal Urine News)

वीरू देवगन यांनी परेश रावल यांना एक अनोखी सल्ला दिला. ‘आपल्या जखमेला लवकर बरे होण्याकरण्यासाठी साठी रोज सकाळी उठून पहिले आपले मूत्र पिऊन घ्यावे, असे त्यांनी सांगितले.आणि परेश रावल यांनी ही अजिबात संकोच न करता या सल्ल्यावर विश्वास ठेवला आणि सलग १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायले.आणि गंमंत म्हणजे हे करून झाल्यावर जेव्हा त्यांनी एक्स-रे काढले, त्यावेळी डॉक्टरही त्यांच्या जलद पुनर्प्राप्तीवर आश्चर्यचकित झाले. परेश म्हणाले की, या घरगुती उपचारामुळे ते एका महिन्यात पूर्णपणे निरोगी झाले.

परेश रावल यांनी विचार केला की जर त्यांना मूत्र प्यावे लागले तर ते हे सहजपणे प्यायले जाणार नाही. त्यावर परेश रावल म्हणाले, “मी हे बिअरसारखे घुटगुट करून पिणार कारण जर मला हे पिणार असेल तर मी हे योग्य पद्धतीने पिणार. मी १५ दिवस असे केले आणि जेव्हा एक्स-रे रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित झाले. त्यांनी हे ही सांगितले की जखम बरे होण्यासाठी सामान्यतः २ ते २.५ महिने लागतात, पण ते १.५ महिन्यातच बरे झाले!” (Paresh Rawal Urine News)
=====================================
======================================
परेश रावल बॉलीवुडमध्ये त्यांच्या शानदार अभिनयासाठी ओळखले जातात. परेश रावल यांच्या कामाबद्द्ल बोलायचे झाले तर ते लवकरच प्रियदर्शनच्या आगामी हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’ मध्ये दिसणार आहेत, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि तब्बूही आहेत. तसेच ते अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत ‘हेरा फेरी 3′ मध्ये ही झळकणार आहे.