Pathaan OTT Release Date: ‘या’ दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘पठाण’, जाणून घ्या सर्व माहिती
बॉलीवुडचा किंग खान म्हणजे अर्थात लाखो चाहत्यांच्या मनाची धडकन असलेला नट शाहरुख खान ‘पठाण’ सिनेमाच्या निमित्ताने २०१८ नंतर पुन्हा सिनेमात झळकला आणि SRK चा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार नाही. अस आतापर्यंत कधीही झालेल नाही त्यामुळे पठाणने बॉक्स ऑफिसवर काही दिवसातच तुफान कमाई केली. शाहरुख खानच आता वय झाल आहे. त्याने आता सिनेमा सृष्टीतून संन्यास घ्यावा असं वाटत असलेल्यांसाठी ही खऱ्या अर्थी चपराक ठरली.(Pathaan OTT Release Date)
25 जानेवारीला रिलीज झालेला ‘पठाण’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बंपर कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, पठाण सिनेमाने प्रदर्शित झाल्याच्या केवळ ३८ दिवसांत देशातील हिंदी आवृत्तीतून ५०६ कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे, तर जगभरातील ग्रॉस कलेक्शन १०२७ कोटींवर पोहोचले आहे. पठाण सिनेमाला प्रदर्शित होऊन १ महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला असला तरीही अजूनही चाहते सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.
============
============
आता पठाणच्या OTT वर प्रदर्शित होण्यासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. पठाण अखेर कोणत्या दिवशी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पठाण सिनेमा २५ एप्रिलला OTT वर प्रदर्शित केला जाणार आहे. ‘पठाण’ ची चित्रपटगृहातील जबरदस्त कमाई पाहून आता निर्माते तो ओटीटीवरही आणण्याचा विचार करत आहेत. अद्याप त्याच्या ओटीटी रिलीजबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट 25 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केला जाईल. निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्यात १०० कोटी रुपयांचा करार झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. (Pathaan OTT Release Date)
‘पठाण’ हा यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला स्पाय अॅक्शन चित्रपट आहे. या सिनेमात किंग खानसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी पहिल्यांदाच पठाणमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखक सिद्धार्थ आनंद केल आहे. तसेच यशराज फ्लिम्सच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आला आहे. YRF Spy Universe चा हा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. यापूर्वी, तो 2018 मध्ये ‘झिरो’मध्ये दिसला होता. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी तमिळ आणि तेलगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.