पायल कपाडियाच्या All We Imagine As Light ने रचाला इतिहास, मिळाले तब्बल ८ मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन
पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन एज लाइट’ हा ३० वर्षांत कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या स्पर्धा विभागात पात्र ठरलेला पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. गुरुवारी, २३ मे रोजी या भारतीय चित्रपटाच्या प्रीमिअरने बरीच चर्चा निर्माण केली. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांची मनेही जिंकली होती.’ऑल वी इमॅजिन एज लाइट‘ या चित्रपटाला प्रीमियरनंतर तब्बल ८ मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. चित्रपट महोत्सवाच्या या आवृत्तीचे हे सर्वात दीर्घ प्रदर्शन होते.(All We Imagine As Light in Cannes 2024)
‘ऑल वी इमॅजिन एज लाइट‘ या चित्रपटाला प्रीमियरनंतर ८ मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. डेडलाइनच्या रिपोर्टनुसार, “पायल कपाडिया कान्स स्पर्धेत चित्रपट दाखवणारी पहिली महिला भारतीय चित्रपट निर्माती आहे. आणि गेल्या तीन दशकांतील हा पहिलाच भारतीय निर्मित चित्रपट आहे.पायलला अभिमान आहे की ती फिल्म फेस्टिव्हलमध्ये इतिहास रचू शकली आणि जगाला दाखवू शकली की भारतीय सिनेमात फक्त बॉलिवूडपेक्षा बरेच काही आहे.
पायल कपाडिया ने डेडलाईनशी बोलताना सांगितले की, “भारत हा एक असा देश आहे जो खूप चांगले चित्रपट बनवतो. फक्त बॉलीवूडच नाही तर प्रत्येक राज्याचा स्वतःचा उद्योग आहे आणि त्यात अगदी हुशार चित्रपट निर्माते आहेत. त्यामुळे आता आणखी ३० वर्षे वाट पाहावी लागणार नाही, अशी आशा आहे. मी उत्साहित आहे आणि आमच्या चित्रपटाची निवड झाली याचा आम्हाला खरोखर आनंद आहे. आम्हाला याची अपेक्षा नव्हती आणि हा सन्मान आहे कारण या श्रेणीत बरेच चित्रपट निर्माते आहेत ज्यांचे मी खरोखर कौतुक करते.(All We Imagine As Light in Cannes 2024)
==========================
===========================
‘ऑल वी इमॅजिन एज लाइट’ ही इंडो-फ्रेंच निर्मिती असून या चित्रपटात परिचारिका प्रभा (कानी कुश्रुती) हिच्या आयुष्यावर आधारित आहे. दरम्यान, तिची मैत्रीण आणि रूममेट अनु (दिव्या प्रभा) तिच्या बॉयफ्रेंडसोबत शांत जागा शोधत असते. तेव्हाच या दोन स्त्रिया समुद्रकिनाऱ्यावरील सहलीला जाण्याचा निर्णय घेतात, जिथे त्यांना त्यांच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी जागा मिळते. पायलचा हा पहिलाच फीचर चित्रपट आहे. काही वर्षांपूर्वी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अ नाईट ऑफ नोइंग नथिंग‘ नावाच्या डॉक्युमेंटरीला गोल्डन आय अवॉर्ड मिळाला होता. पायलचा हा पहिलाच चित्रपट आहे. काही वर्षांपूर्वी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अ नाईट ऑफ नोइंग नथिंग’ नावाच्या डॉक्युमेंटरीला गोल्डन आय अवॉर्ड मिळाला होता.