
“म्हणूनच मी पुढील ३०-३३ वर्षे त्यांच्यासाठी रांगेत उभा राहण्यास तयार”; Thalapathy Vijay यांची सिनेसृष्टीतून निवृत्ती!
साऊथ सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी आजवर एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत चाहत्यांचं मनोरंजन केलं… पण आता त्यांनी आपल्या चाहत्यांना धक्का देत अभिनयातून कायमची निवृत्ती घेत असल्याचं जाहिर केलं… जगभरात थलपती विजय यांचा करोडोंचा चाहतावर्ग त्यांच्या या निर्णयामुळे सुन्न झाला आहे.. तमिळ फिल्म इंडस्ट्रीत रजनीकांत, कमल हासन यांच्या पाठोपाठ थलपती विजय हे फार मोठं नाव आहे.. अखेर विजय यांची त्यांचा ३३ वर्षांच्या फिल्मी प्रवास कायमचा थांबवत आता फुल टाईम राजकारणात एन्ट्री घेतली आहे… त्यांचा ‘जन नायकन’ हा २०२६ मध्ये प्रदर्शित होणारा शेवटचा चित्रपट असणार आहे…या चित्रपटाच्या ऑडियो लॉन्च कार्यक्रमात मलेशियात संपन्न झाला, यावेळीच विजय यांनी आता अभिनयातून निवृत्ती घेत राजकारणाकडे लक्ष केंद्रिंत करणार असल्याचं जाहिर केलं…

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच थलपती विजय यांनी ‘तामिळगा वेत्री कळघम’ या नावाचा स्वत:चाच राजकीय पक्ष स्थापन केला होता आणि २०२६च्या निवडणूकीत तेच रिंगणात उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं… त्याचीच घोषणा करताना भावूक झालेले विजय म्हणाले की,”माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे. लोकं थिएटरमध्ये मला पाहण्यासाठी येतात आणि रांगेत उभे राहतात. म्हणूनच मी पुढील ३०-३३ वर्षे त्यांच्यासाठी रांगेत उभा राहण्यास तयार आहे.“पुढे अभिनेता म्हणाला,”मला अगदी पहिल्या दिवसापासूनच सर्व प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. पण माझे चाहते सुरुवातीपासूनच माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत.” अशा भावना अभिनेत्याने यावेळी व्यक्त केल्या.

आता एक नजर टाकूयात त्यांच्या चित्रपटांवर… तर, बालकलाकार म्हणून विजय यांनी सुरुवात केली होती… १०व्या वर्षी ‘वेट्री’ या तमिळ चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली… पुढे १८व्या वर्षी नायक म्हणून ‘थीरपू’या चित्रपटातून त्यांचा सुरु झालेला प्रवास पुढे ३३ वर्ष अविरत सुरुच राहिला… विशेष म्हणजे त्यांना अॅक्टर म्हणून तमिळ फिल्म इंडस्ट्रीत लॉंच केलं त्यांच्या आई-वडिलांनीच.. ज्या ‘थीरपू’ चित्रपटात ते लीड रोल करत होते त्या चित्रपटाची पटकथा विजय यांच्या आई शोभा यांनी लिहिली होती… बॉक्स ऑफिसवर जरी हा चित्रपट हिट झाला नसला तरी प्रेक्षकांच्या मनात थलपती विजय हे नाव कायमचं कोरलं गेलं…

रजनीकांत, कमल हासन यांच्यासोबतीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आपल्या वेगळा फॅन फॉलॉईंग तयार करणाऱ्या थलपती विजय यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपटांत कामं केली आहे… विशेष म्हणजे दरबार या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी ९० कोटी मानधन घेत रेकॉर्ड केला होता… पण त्यांचा हा रेकॉर्ड विजय यांनी मोडून काढत ‘मास्टर’ या चित्रपटासाठी त्यांनी १०० कोटी मानधन घेतलं होतं.. बरं, साऊथमधल्या लेजेंड कलाकारांना स्पेसिफीक नावाने ओळखलं जातं.. म्हणजे थलायवा रजनीकांत आणि थलपती विजय.. पण त्यांना हे नाव कसं पडलं? तर, विजय यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला बरेच अॅक्शन आणि रोमॅंटिक चित्रपट केले होते… कालांतराने कॉमेडी, अॅक्शन आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांतून त्याने वेगळी छाप पाडली आणि साध्या हिरोपासून हळूहळू तो चाहत्यांसाठी ‘थलपती’ (सेनापती) बनला.
================================
हे देखील वाचा : V Shantaram यांच्या अजरामर ‘पिंजरा’ चित्रपटाच्या पडद्यामागची गोष्ट!
================================
‘गिल्ली’सारख्या सुपरहिट चित्रपटाने विजय यांना ‘मास हिरो’ची ओळख मिळवून दिली. ‘कैथी’ चित्रपटाने त्यांच्या अभिनयाला सामाजिक आणि राजकीय विषयाशी जोडलं ते कायमचच. तर ‘थेरी’, ‘मेर्सल’ आणि ‘बिगिल’यांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत लोकांची मनं जिकंली… विजय उत्तम अभिनेते तर आहेत हे त्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून सिद्ध केलं आहेच; परंतु ते उत्तम डान्सर म्हणूनही त्यांची खास ओळख आहे… आजवर विजय यांच्या चाहत्यांनी त्यांना फिल्मी करिअरमध्ये साथ दिलीच आणि आता ते त्यांच्या राजकीय प्रवासाचे देखील साक्षीदार होणार आहेत….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi