मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
‘पोनियिन सेलवन 2’ प्रेक्षकांच्या पसंतीस…
ऐश्वर्या राय आणि विक्रम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ (Ponyin Selvan 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यातील भव्यता पाहून प्रेक्षकांनी बाहुबलीपेक्षा ‘पोनियिन सेलवन 2’ (Ponyin Selvan 2) अधिक चांगला झाल्याची पावती दिली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी सप्टेंबर 2022 मध्ये ‘पोनियिन सेलवन 1’ मोठ्या पडद्यावर आणला. चोल राजांचा हा वैभवशाली इतिहास बघून संपूर्ण जगभर चित्रपटाचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. जवळपास 500 करोडची कमाई या ‘पोनियिन सेलवन 1’ ने केली होती. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग आला असून त्याची भव्यता पहिल्या भागापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच हा चित्रपट बाहुबलीपेक्षाही अधिक चांगला झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या चित्रपटाचे सेट, युद्धाचे सीन आणि ऐश्वर्या रायची दुहेरी भूमिका या सर्वांचेच कौतुक होत आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पोनियिन सेलवन 1’ ने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड तोडले. मणिरत्नम यांचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचा दुसरा भागही त्याच पावलावर पाऊल टाकेल हे स्पष्ट झाले आहे. ‘पोनियिन सेलवन 2′(Ponyin Selvan 2) पाहिलेल्या प्रेक्षकांनी या चित्रपटाला ‘भारतीय सिनेमाचा संपूर्ण अभिमान’ अशी पावती दिली आहे. त्यामुळेच हा चित्रपटही बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये ‘पोन्नियिन सेल्वन 2’ (Ponyin Selvan 2) प्रदर्शित झाला असून त्याचा प्रत्येक शो हाऊसफूल असल्याची माहिती आहे. शिवाय येत्या आठवड्याचे बुकींगही फुल आहे. मणिरत्नम यांनी अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर चोल वंशीय राजावर हा चित्रपट बनवला आहे. यामध्ये ऐश्वर्या राय हिची दुहेरी भूमिका असून पहिल्या भागात अनेक रहस्य दडलेली दाखवण्यात आली आहेत. आता ‘पोनियिन सेलवन 2’ (Ponyin Selvan 2) या दुस-या भागात या सर्व रहस्यांची उकल होणार आहे. ऐश्वर्या राय ही मणिरत्नम यांच्यासाठी लकी अभिनेत्री मानली जाते. ऐश्वर्या सह चित्रपटात कार्ती, चियान विक्रम, त्रिशा आणि जयम रवी, प्रकाश राज, प्रभू, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, जयराम, अश्विन काकुमानु, मोहन रमण, सरथकुमार आणि पार्थिवन यांच्याही भूमिका आहेत.
‘पोनियिन सेलवन 2’ (Ponyin Selvan 2) चे वर्णन सुरुवातीला राजेशाही आणि कारस्थानांच्या जगात स्वागत आहे, असे करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. स्वतः साऊथचा सुपरस्टार रजनिकांत यानेही या चित्रपटाला अस्सल भारतीय सिनेमा असे प्रमाणपत्र सोशल मिडीयाच्या मार्फत दिले आहे. तर काही चाहत्यांनी मणिरत्नम आणि राजामौली यांच्याकडून चित्रपट कसा काढावा याचे प्रशिक्षण बॉलिवूडच्या दिग्दर्शकांनी घ्यावे असेही सुचवले आहे. प्रेक्षकांनी चित्रपटातील सर्वच कलाकारांचे कौतुक केले असले तरी ऐश्वर्या रायची नंदनी आणि वनदेवी ही भूमिका विशेष पसंतीस पडली आहे. विशेषतः राणीच्या भूमिकेत सजलेली ऐश्वर्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक असल्याचे काही प्रेक्षकांनी लिहिले आहे. याशिवाय अभिनेत्री त्रिशाची भूमिकाही अनेक चाहत्यांना भावली आहे. त्रिशाने आपल्या स्टाईलने सर्वांना आश्चर्यचकित केले असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. काहींनी ‘पोनियिन सेलवन 2’ (Ponyin Selvan 2) कॉलिवूडची शान असल्याचे म्हटले आहे.
======
हे देखील वाचा : मुन्नाभाई MBBS अन बोमन इराणींच्या कास्टिंगचा किस्सा!
======
‘पोनियिन सेलवन 2’ (Ponyin Selvan 2) हा आणि त्याचा पहिला भाग कल्की कृष्णमूर्ती यांच्या याच नावाच्या पाच भागांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. सुरुवातीला या कादंबरीची व्यापकता बघत यावर चित्रपट होईल अशी आशाच नव्हती. स्वतः मणिरत्नम यांनी यापूर्वीही या कादंबरीवर चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही वर्षाच्या अभ्यासानंतर मणिरत्नम यांनी पोनियिन सेलवन 1 आणि 2 या दोन यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. चोल राजवटीची ही समृद्ध कथा मोठ्या पडद्यावर आल्यावर या मुळ पुस्तकाची मागणीही नव्यानं वाढल्याचं लक्षात आलं आहे. आता ‘पोनियिन सेलवन 2’ (Ponyin Selvan 2) मध्ये जयम रवी चोल साम्राज्यात परत आला आहे. प्रथमच तिन्ही चोल राजकुमार आणि राजकन्या एकत्र दिसणार आहेत. आदिता करिकलन (विक्रम), अरुणमोझी वर्मन (जयम रवी) आणि कुंदावई (त्रिशा) हे एकत्र आपल्या साम्राज्यात दिसतील. याशिवाय नंदिनी (ऐश्वर्या राय) आणि अदिता करिकलन (विक्रम) हे विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर आल्याचेही पाहता येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग बंधुत्व आणि मैत्रीवर आधारित होता तर दुसरा भाग प्रेम-द्वेषाच्या नात्याचे वर्णन करताना दिसणार आहे.
सई बने