
Prakash Raj : ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ते दत्तक घेतलेले गाव, जाणून घ्या प्रकाश यांच्याबद्दल…..
‘जयकांत शिक्रे…’ नाव उच्चारलं तरी या व्यक्तीचा तिरस्कार वाटतो आणि रागही येतो. एखादा कलाकार जेव्हा खलनायक साकारतो त्यावेळी प्रेक्षकांना त्याचा मनापासून राग आला तर समजायचं पठ्ठ्याने उत्तम काम केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्यांनी खलनायक साकारले आणि त्यापैकी एक म्हणजे प्रकाश राज (Prakash Raj). दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी पाठोपाठ हिंदीतही आपलं नाव आणि आपला दरारा निर्माण करणाऱ्या प्रकाश राज यांचं वैयक्तिक आयुष्य फारच त्रासलेलं आहे. स्वत:च्या ५ वर्षांच्या मुलाला आपल्या हाताने अग्नी देण्याचं दु:ख त्यांच्या वाटेला आलं. आज त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊयात खास किस्से…(Tollywood Films)

तर, प्रकाश राज (Prakash Raj) यांनी केवळ तेलुगू चित्रपटांतच नाही तर इतरही भाषांमधील चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारत आपलं स्थान निर्माण केलं. बॉलिवूडमध्ये बऱ्याचशा चित्रपटांमध्ये प्रकाश यांनी उत्कृष्ट खलनायक साकारला. मग तो ‘सिंघम’ (Singham) असो किंवा ‘वॉंटेन्ड’ (Wanted) प्रेक्षकांना जितक्या त्यांच्या नायक भूमिका आवडल्या तितक्याच त्यांना खलनायक भूमिकांचा राग देखील आला म्हणजेच प्रेक्षकांना त्यांचं काम फार आवडलं. (Telugu Films)
===========================
हे देखील वाचा:Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!
===========================
प्रकाश राज यांचं खरं नाव प्रकाश राय. दुरदर्शनरील ‘बिसिलु कुदुरे’ या मालिकेतून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. पण तमिळ दिग्दर्शक यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपलं आडनाव राय वरुन राज करण्यास सांगितलं आणि इंडस्ट्रीला मिळाले प्रकाश राज. त्यांनी १९९४ मध्ये तमिळ (Tamil Films) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. केवळ ३०० रुपये मानधन मिळवून प्रकाश राज यांनी चित्रपटांसोबत दोन हजारांपेक्षा अधिक नाटकांमध्ये कामं केली आहेत. (Bollywood news)

प्रकाश राज (Prakash Raj) यांनी केवळ चित्रपटांमध्ये अभिनयच केला नाही तर काही चित्रपटही त्यांनी तयार केले आहेत. आजवरच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. ‘वॉंन्टेड’, ‘हिरोपंती’, ‘सिंघम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामं केली आहेत. (Entertainment update)

दरम्यान, तेलुगू चित्रपट निर्मात्यांनी प्रकाश राज यांच्यावर चित्रपटसृष्टीत त्यांच्या वाईट वागणुकीबद्दल ६ वेळा बंदी घातली होती. यावर प्रकाश राज यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं होतं की, “मी माझे नियम पाळतो आणि त्यांच्यापासून विचलित होऊ शकत नाही”. इतकंच नाही तर प्रत्येक चित्रपटासाठी स्वत:ची फी प्रकाश राज स्वत:च ठरवतात. याबद्दल बोलताना एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, “इंडस्ट्रीमध्ये मी एकमेव असा अभिनेता आहे की ज्याने आजपर्यंत मॅनेजरची नियुक्ती केलेली नाही. फोन कॉल्स अटेंड करण्यापासून ते चित्रपटाची निवड, कथा आणि फी या सर्व गोष्टी मी स्वतः ठरवतो. इतकंच नाही तर मी माझ्या कमाईतील २० टक्के चॅरिटीलाही दान करतो”. प्रकाश यांच्या सामाजिक कार्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी तेलंगणा मधील एका गावाला दत्तक घेतलं आहे. (Tollywood gossip)
===========================
हे देखील वाचा: Jaya Bachchan : …म्हणून जया बच्चन ‘सिलसिला’च्या सेटवर रोज जायच्या!
===========================
प्रकाश राज यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या पाचवर्षाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. याबाबत त्यांनी सांगितलं होतं की, त्यांनीच त्यांच्या मुलाचा मृतदेह त्यांच्या शेतात जाळला होता. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होती की,”तो फक्त ५ वर्षांचा होता आणि एक फूट उंच टेबलावर पतंग उडवत होता आणि अचानक तो त्यावरून पडला. काही महिन्यांनंतर, त्याला झटके येऊ लागले आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं कारण कोणालाच समजलं नाही”.
रसिका शिंदे-पॉल