Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा
श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांच्या चर्चेचा विषय नुकत्याच झालेल्या घडामोडीमुळे एक नवा वळण घेत आहे. काही दिवसांपूर्वी, श्रेयस आणि प्रार्थनाहे दिग्दर्शक अजय मयेकर यांच्या सोबत एक स्वामी समर्थ मठातून बाहेर पडताना दिसले होते, ज्यामुळे चाहते उत्सुक झाले होते की, कदाचित ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा सिक्वेल येत असेल. श्रेयसच्या हातात असलेल्या स्क्रिप्टच्या गठ्ठ्यामुळे या चर्चांना उधाण आलं. परंतु, विजयादशमीच्या पवित्र दिवशी या तिघांनी एक आश्चर्यकारक घोषणा केली . ते एकत्र एक चित्रपट घेऊन येत आहेत, तो देखील ‘मर्दिनी’ या नावाने! ( Prarthana Behare and Shreyas Talpade Together)

दसऱ्याच्या दिवशी श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर आपल्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली. हा चित्रपट ‘ मर्दिनी ’ असे असून, तो २०२६ मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरेची लोकप्रिय जोडी एकत्र दिसणार आहे, तसेच अभिनेता अभिजीत खांडकेकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दिग्दर्शक अजय मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ मर्दिनी ‘ चित्रपटाची निर्मिती श्रेयस तळपदे आणि त्यांची पत्नी दीप्ती यांच्या ‘अफ्लूएन्स मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या बॅनरखाली होणार आहे. श्रेयसने या घोषणेशी संबंधित पोस्टमध्ये लिहिलं, “आईच्या आशीर्वादाने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नांदी होत आहे एका नव्या निर्मितीची… असू देत लाख महिषासूर, पुरे आहे फक्त एक… ‘मर्दिनी‘. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हा सर्वांवर अखंड राहू द्या! भेटूया २०२६ मध्ये!”(Prarthana Behare and Shreyas Talpade Together)
================================
हे देखील वाचा: लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न सोहळा !
================================
२०२१ ते २०२३ दरम्यान झी मराठीवर प्रसारित झालेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने श्रेयस, प्रार्थना आणि बालकलाकार मायरा वायकुळला प्रचंड लोकप्रियता दिली. छोट्या पडद्यावर गाजलेली ही जोडी आता मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा उत्साह दुप्पट झाला आहे. श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतल्या त्यांच्या भूमिकांमुळे प्रचंड चर्चेत होती. आता ‘ मर्दिनी ‘च्या रूपाने त्यांच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर एक नवा अनुभव मिळणार आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.