‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल

‘Saare Jahan Se Accha Premier: OTT वर कधी प्रदर्शित होणार अभिनेता प्रतिक गांधीची ‘सारे जहाँ से अच्छा’ सीरीज?
“एका गुप्तहेरासाठी प्रत्येक छोटी माहितीही अत्यंत महत्त्वाची असते. कोणताही मिशन यशस्वी होतो की नाही, हे याच गोष्टीवर अवलंबून असतं…” अशा अर्थपूर्ण संवादासोबत Netflix वर येत आहे एक भन्नाट देशभक्तीपर गुप्तहेर थ्रिलर ‘सारे जहाँ से अच्छा’. अभिनेता प्रतीक गांधी यांचं वेगळंच रूप या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘स्कॅम 1992’ मधून प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या प्रतीक गांधी यांनी तेव्हा स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताच्या भूमिकेतून घराघरात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी ‘धूमधाम’मध्ये हलकीफुलकी कॉमेडी केली आणि ‘फुले’ चित्रपटात ज्योतिबा फुल्यांची भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा मोठा ठसा उमटवला.(Saare Jahan Se Accha Series Premier)

आता या नव्या वेबसीरिजमध्ये ते एका गुप्तहेराच्या भूमिकेतून देशाच्या सुरक्षेसाठी दुश्मन देशाच्या भूमीवर जाऊन त्यांचा अणुकार्यक्रम रोखण्याच्या मोहिमेत सहभागी झालेले दिसणार आहेत. ही वेबसीरिज भारताच्या 1970च्या दशकातील पार्श्वभूमीवर आधारित असून, त्यात भारतीय गुप्तचर यंत्रणांची चतुराई, नैतिक संघर्ष आणि देशभक्ती यांचं अनोखं मिश्रण पाहायला मिळेल. नेटफ्लिक्स ओरिजिनल असलेली ‘सारे जहाँ से अच्छा’ ही वेबसीरिज येत्या १३ ऑगस्ट २०२५, म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या आधी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा टीझर व्हिडीओ नुकताच रिलीज झाला असून त्यात प्रतीक गांधी एका रेडिओवर गोपनीय माहिती ऐकताना दिसतात.

ते स्पष्ट शब्दात म्हणतात , “एक गुप्तहेरसाठी प्रत्येक फोन कॉल, प्रत्येक बँक ट्रान्सॅक्शन, आणि अगदी लहानसा संदेश सुद्धा महत्त्वाचा असतो…”ते आपल्या मिशनबाबत सांगतात, “लक्ष्य आहे शत्रू देशाच्या भूमीवर जाऊन त्यांचा अणुकार्यक्रम थांबवणं…” या मालिकेत प्रतीक गांधी “विष्णू शंकर” या भूमिकेत आहेत – एक हुशार, मिशनला समर्पित भारतीय गुप्तचर अधिकारी. त्याच्यासोबत सनी हिंदुजा, कृतिका कामरा, तिलोत्तमा शोम, रजत कपूर, अनूप सोनी आणि सुहैल नय्यर हे दमदार कलाकारही दिसतील.
==========================
==========================
ही सीरीज म्हणजे एक थरार, रहस्य आणि देशभक्तीचा संपूर्ण अनुभव. गौरव शुक्ला यांनी ही मालिका लिहिलेली असून, दिग्दर्शन सुमित पुरोहित यांचं आहे. Netflix वर ही मालिका रिलीज करताना त्यांनी एक अर्थपूर्ण ओळ लिहिली आहे, “काही लढाया इतिहासाच्या पानांत सापडत नाहीत. स्वातंत्र्याच्या महिन्यांमध्ये, सगळी फाईल्स अन क्लासिफाइड होतील…”