Pooja Sawant संक्रांतीसाठी आतुर असलेल्या पूजा सावंतने पोस्ट केला हलव्याच्या
Sagarika Ghatge राजघराण्यात जन्म, राष्ट्रीय हॉकीपटू, क्रिकेटरशी लग्न असा आहे सागरिका घाटगेचा प्रवास
हिंदीसोबतच मराठी आणि मराठीसोबतच हिंदी मनोरंजनविश्वात आपली ओळख बनवणारे अनेक कलाकार आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सागरिका घाटगे (Sagarika Ghatge). ‘चक दे इंडिया’ (Chak De India) या सिनेमामुळे सागरिकाला मोठी ओळख मिळाली. यानंतर सागरीकाने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि आपलू ओळख तयार केली. आज हीच सागरिका तिचा वाढदिवस साजरा करत आहे. (Sagarika Ghatge Birthday)
८ जानेवारी १९८६ रोजी कोल्हापुरातील राजघराण्यात सागरीकाचा जन्म झाला. (royal family of Kolhapur) ती शाहू महाराजांच्या घराण्यातील मुलगी आहे. सागरिकाची आजी सीता राजे घाटगे (Seeta Raje Ghatge) ह्या इंदौरचे (Indore) राजे तुकोजीराव होळकर यांची मुलगी होत्या. सागरीकाचे बालपण कोल्हापूरमध्येच गेले. त्यांनंतर ती शिक्षणासाठी अजमेरच्या गेली. (Bollywood Tadka)
सागरिकाला अभिनयाची ओढ घरातूनच लागली. तिचे वडील विजयेंद्र घाटगे (Vijyendra Ghatge) हे देखील हिंदी, मराठी चित्रपटांमधील नावाजलेले अभिनेते होते. त्यामुळे तिचा अभिनयात रस होताच. सागरिका दिसायला खूपच सुंदर असल्याने तिला शालेय जीवनापासूनच मॉडेलिंग आणि चित्रपटांच्या ऑफर मिळत होत्या. मात्र तिला आधी तिचे शिक्षण संपवयाचे होते. (Entertainment mix masala)
अभ्यासात हुशार असणारी सागरिका खेळात देखील अव्वल होती. सागरिकाने तिच्या पहिल्याच सिनेमात चक दे इंडियामध्ये एका उत्कृष्ट हॉकीपटूची भूमिका साकारली होती. मात्र खूप कमी लोकांना हे माहित असेल की सागरिका प्रत्यक्ष आयुष्यात देखील एक उत्तम हॉकीपटू असून, तिने राष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळाला आहे. सागरीकांमध्ये हॉकी या खेळामध्ये अनेक बक्षिसे देखील जिंकली आहेत. (Hockey Player Sagrika Ghatge)
सागरीकाने चक दे इंडिया या सिनेमानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तिने सतीश राजवाडे यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या सिनेमात देखील सोनल ही भूमिका साकारत मराठीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती अतुल कुलकर्णीसोबत दिसली होती. हा सिनेमा आणि या सिनेमातील गाणी भरपूर गाजली.
यासोबतच सागरिका फॉक्स, मिले ना मिले हम, दिल दारिया, रष आदी अनेक चित्रपटांमध्ये झळकली. या शिवाय तिने २०१५ साली ‘खतरों के खिलाडी’ मध्ये सहभाग घेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तिने २०१९ साली ‘बॉस’ या ओटीटी सिरीजमध्ये देखील काम केले आहे. मराठी, हिंदीसोबतच सागरिका पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम करते. (Sagrika Ghatge‘s movies)
सागरिका ही तिच्या अफेयरमुळे आणि लग्नामुळे कमालीची चर्चेत आली होती. तिने २०१७ साली क्रिकेटर झहीर खानसोबत (Cricketer Zaheer Khan ) लग्न केले. मात्र त्यांचे नाते अतिशय गुप्त होते आणि अचानक त्यांनी साखरपुडा केल्याचे जाहीर केले.
मात्र असे असूनही युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नामध्ये जेव्हा सारिका आणि झहीर यांना एकत्र हातामध्ये हात घालून पाहिले गेले तेव्हापासूनच त्यांच्या नात्याबद्दल मीडियामध्ये चर्चा होत होत्या. सागरिकांसोबत नात्यात येण्याआधी झहीर खान तब्बल ८ वर्ष अभिनेत्री इशा शेरवानीसोबत नात्यात होता. ते लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील होत होत्या मात्र मधेच माशी शिंकली आणि त्याचे नाते तुटले. (Bollywood Masala)
पुढे सागरिका आणि झहीर (zaheer khan and sagarika ghatge) हे एका पार्टीमध्ये भेटले आणि सागरिकाला पाहताचक्षणी झहीरला ती आवडली. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले, आणि त्यांचे बोलणे चालू झाले. काही दिवसांनी त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. मात्र त्यांना लग्न करायचे होते. त्यांना माहित होते की या लग्नामध्ये अडचणी येणार आहेत. कारण सागरिका हिंदू तर झहीर मुस्लिम आहे. (zaheer khan and sagarika ghatge)
सागरिका आणि झहीर या दोघांनाही एकमेकांच्या घरच्यांना या लग्नासाठी तयार करताना जरा त्रास झाला. जेव्हा झहीरने त्याच्या घरी सागरिकाबद्दल सांगितले तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्यांनी नकार दिला. मग त्याने सागरीकाच्या चक दे इंडिया या सिनेमाची सीडी मागवली आणि घरच्यांना बसवून हा सिनेमा दाखवला. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी या लग्नाला होकार दिला. (zaheer and sagarika’s Lovestory)
इकडे सागरीकाकडे तिच्या आईला या दोघांच्या नात्याबद्दल माहित होते, मात्र वडिलांना कल्पना नव्हती. एका सागरीकाने झहीरला वडिलांना भेटायला बोलवले. तेव्हा तिच्या वडिलांनी फक्त २० मिनिटांचा वेळ दिला होता. मात्र ते जवळपास ३ तास बोलत होते. सागरीकाच्या घरच्यांना क्रिकेट फार आवडते. सर्वच क्रिकेटच्या प्रेमात आहे. मात्र झहीर हा क्रिकेटर आहे , म्हणून नाही तर त्याला अस्खलित मराठी बोलता येते म्हणून घरच्यांनी या लग्नाला होकार दिला होता. पुढे या दोघांनी नोव्हेंबर २०१७ साली लग्न केले. (zaheer and sagarika’s Wedding)
लग्नानंतर सध्या सागरिका चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली तरी तिने तिचा बिजनेस सुरु केला आहे. सागरीकाने ‘अकुती‘ नावाचा तिचा फॅशन ब्रँड लाँच केला आहे. हा ब्रँड ती आणि तिची आई उर्मिला घटने मिळवून सांभाळत आहे. तिने पारंपरिक साड्यांना आधुनिक वेस्टर्न टच देत तिने हा नवा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. (Sagrika Ghatge’s Business)