
Priya Bapat : पहिल्यांदाज ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन!
मराठी मालिका, चित्रपटांसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाने स्वत:चं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) लवकरच आणखी एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे यात ती पहिल्यांदाच नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. प्रिया बापटने आजवर हटके चित्रपट, नाटक, मालिका आणि वेब सीरिज केल्या आहेत. आता नवीन येणारी ही कलाकृती कोणती आहे जाणून घेऊयात…(Bollywood movies)

प्रिया बापट Costao या चित्रपटातून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. ‘झी 5’ वर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात नवाजुद्दीन Civil Servent च्या भूमिकेत दिसणार असे सांगितले जात आहे. अद्याप प्रदर्शनाची तारीख गुलदस्त्यात आहे. (Bollywood upcoming movies)
===============================
हे देखील वाचा: Manoj Kumar : ‘शहीद’च्या पुरस्काराची रक्कम भगतसिंग यांच्या कुटुंबियांना देऊ केली!
===============================
आत्तापर्यंत प्रिया बापट हिने ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ (City Of Dreams), ‘जिंदगीनामा’, ‘रात जवान है,’ ‘रफुचक्कर’, या सीरीज आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

तर नवाजुद्दीन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘बजरंगी भाईजान’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’, ‘बदलापूर’ (Badlapur) अशा अनेक उल्लेखनीय चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. आता लवकरच येणाऱ्या Costao या चित्रपटात नवाज आणि प्रिया बापट यांची जोडी प्रेक्षकांना आवडेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Entertainment)