Rajinikanth यांना बॉलीवूडमध्ये लॉन्च करणाऱ्या सिनेमात बाजी मारली होती अमिताभ

Priya Marathe आणि Shantanu Moghe ची साधी पण क्युट लव्हस्टोरी!
मराठी-हिंदी मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी कर्करोगाने निधन झालं… तिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व हळहळले आहे… सामान्य माणसांसह कलाकारांनी तिच्या कामाचं कौतुक करत तिला आदरांजली वाहिली आहे… प्रिया मराठेने तिचं प्रोफेशनल वैयक्तिक जीवन कायमच वेगळं ठेवलं होतं… प्रियाने २०१२ मध्ये अभिनेता शंतनु मोघे (Shantanu Moghe) सोबत लग्नगाठ बांधली होती… जाणून घेऊयात त्यांच्या हटके लव्हस्टोरीबद्दल…

शंतनु मोघे हा ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे (Shrikant Moghe) यांचा मुलगा… तर प्रिया ही मुळची ठाण्याची पण शुटींगसाठी ती अंधेरीला राहात होती… त्यावेळी तिची रुममेट होती अभिनेत्री शर्वरी लोहकरे (Sharvari Lohakare)… त्यावेळी शर्वरी आणि शंतनु ‘आई’ या मालिकेत एकत्र काम करत होते… शर्वरीमुळे प्रिया आणि शंतनु यांची ओळख झाली… ‘आई’ या मालिकेच्या पार्टीत पहिल्यांदा प्रिया आणि शंतनू एकमेकांना भेटले.. पाटीत झालेली ओळख हळूहळू मेसेज आणि लेट नाईट कॉल्सपर्यंत पोहोचली… दररोजचं बोलणं मैत्रीपलीकडे जाऊ लागलं… आणि अखेर शंतनुने प्रियाला त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि त्याने प्रियाला फिल्मी स्टाईलने थेट लग्नासाठी प्रपोज केलं… प्रियाने होकार दिला खरा पण काही काळ दोघांनी आपलं नातं जगजाहिर न करण्याचा निर्णय घेतला..

============================
============================
मधला काळ गेला तरी अजून प्रिया किंवा शंतनु कुणाच्याच घरच्यांना दोघांच्या नात्याबद्दल काहीच माहित नव्हतं… मात्र, एका पुरस्कार सोहळ्यात डायरेक्ट स्टेजवर शंतनुने प्रियाचं नाव घेतलं आणि त्यांच्या घरच्यांसह सगळ्यांनाच प्रिया आणि शंतनुच्या नात्याबद्दल समजलं… दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या नात्याला होकार दिला आणि २४ एप्रिल २०१२ रोजी या दोघांचे लग्न थाटामाटात झालं… प्रियाला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर शंतनुने तिची खुप काळजी घेतली होती… तिच्या या कठिणी प्रसंगात खंबीरपणे तो तिच्या वेदना पार्टनर म्हणून सहन करत होता आणि तिच्यासोबत कर्करोगाची लढाई ते देखील लढत होता… गेल्या २ वर्षांपासून प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती… सुरुवातीला ती आजारपणातही काम करत होती, पण नंतर तब्येत साथ देत नसल्यामुळे प्रियाने तुझेच मी गीत आहे मालिकेतून मध्येच निरोप घेतला होता… साधी, सोप्पी अशी प्रिया आणि शंतनूची लव्हस्टोरी संपेल असा विचार कधीच कुणाच्या मनात आला नसेल… प्रिया हिच्या निधनामुळे जितकं मनोरंजनसृष्टीचं नुकसान झालं आहे त्यापेक्षाही जास्त शंतनु मोघेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे…. संपूर्ण ‘कलाकृती मिडिया’तर्फे प्रिया मराठे हिला भावपूर्ण आदरांजली. (Priya Marathe Death News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi