
Priyadarshini Indalkar हिचं खरंच लग्न ठरलंय का?; सत्य आलं समोर
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली… या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या घराघरांत प्रियदर्शनी पोहोचली… दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियदर्शनीचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात ती नव्या नवरीसारखी नटली होती… तिच्या या फोटोमुळे तिचं लग्न ठरलं आहे की काय? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला होता… आता या फोटोचं अखेर सत्य समोर आलं आहे…

प्रियदर्शनी इंदलकर हिचा हा नवरीच्या गेटअपमधला फोटो तिच्या आगामी सिनेमाच्या पोस्टरवरचा आहे. ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून याच पोस्टरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारही समोर आले आहेत. या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (Marathi Movie)

चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये पारंपरिक लग्नाच्या वेशभूषेत दिसणारा नायक-नायिका जोडीने उभे असून, दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळलेले, प्रश्नार्थक भाव दिसून येतात. डोक्याला बंदूकसारखी बोटं लावलेली ही देहबोली पाहाता, लग्नाच्या धावपळीत काहीतरी मोठा घोळ होणार असल्याची स्पष्ट झलक पोस्टरमधून दिसत आहे. (Priyadarshini Indalkar)
विशेष म्हणजे, या पोस्टरच्या बॅकग्राऊंडला रेल्वे, बस, वळणावळणाचा रस्ता आणि राशीचक्र अशा घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यात ‘लग्नाअगोदरही लग्नानंतरही’ असे शब्दही लिहिलेले दिसतात. त्यामुळे या चित्रपटाची कथा प्रवास, वेळेचा गोंधळ, चुकीचे निर्णय आणि नशिबाचे फेरे याभोवती फिरणारी असणार हे नक्की… (Marathi Movies 2026)
================================
================================
‘लग्नाचा शॉट’ चित्रपटाचं दिग्दर्शन अक्षय गोरे याने केले असून अक्षय गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच, २०२५ या वर्षात प्रियदर्शनी ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटात झळकली होती.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi