
Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली?
बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यासाठी गॉडफादर किंवा स्टार किड असणं गरजेचं असतं असं म्हणतात. पण या शब्दांना हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींनी मोडून काढत स्वत:च असं विश्व निर्माण केलं. दीपिका पादूकोण, सुश्मिता सेन, ऐश्वर्या राय आणि प्रियांका चोप्रा. ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकून आणि एकेकाळी हिंदीत सुपरहिट चित्रपट देऊनही बॉलिवूडमधील काही लोकांनी नकळतपणे का होईना तिला इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं. आपल्याच माणसांची आपल्याला किंमत नसते पण बाहेरच्यांना असते हे वाक्य मात्र प्रियांकाच्या बाबतीत तंतोतंत जुळतं. बॉलिवूडमधून बाहेर गेल्यानंतर प्रियांकाने हॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्रपणे ओळख निर्माण करत थेट निक जोनसलाच भारताचा जावई केलं. ‘ब्राऊन गर्ल’’ म्हणा किंवा ‘देसी गर्ल’ हिंदीनंतर हॉलिवूडमध्ये डंका गाजवणाऱ्या Priyanka Chopra बद्दल जाणून घेऊयात काही इंटरेस्टिंग गोष्टी.(Priyanka Chopra)
अनुराग मला बघताच सॉरी म्हणाले…
प्रियांकाने कायमच विविधांगी भूमिका साकारल्या आणि त्यातील तिची उल्लेखनीय भूमिका म्हणजे २०१२ साली आलेल्या ‘बर्फी’ (Barfi) चित्रपटातील झिलमिल. पण ही भूमिका तिला कशी मिळाली याचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. अनुपम खेर (Anupam Kher) यांच्यासोबत एका कार्यक्रमात बोलताना प्रियांकाने ‘बर्फी’ चित्रपटातील झिलमिल भूमिकेसाठी आधी तिला दिग्दर्शक अनुराग बासू (Anurag Basu) यांनी नकार दिला होता तो किस्सा सांगितला. प्रियांका म्हणाली की, “एकेदिवशी अनुराग बासू यांचा मला फोन आला आणि एका चित्रपटासाठी भेटायचं आहे असं सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही माझ्या घरी भेटलो आणि त्यावेळी मी तयार होऊन बसले होते; मला पाहून अनुराग म्हणाले की सॉरी माझी चुक झाली. मला आधी कळलंच नाही ते असं का म्हणतायत. त्यांचं असं म्हणणं होतं की ती भूमिका मला जमणार नाही. बरं तोवर झिलमिलच्या भूमिकेबद्दल मला काहीच माहित नव्हतं”. (Bollywood films)
अवघ्या ५ दिवसांत तयार झाली झिलमिल
पुढे ती (Priyanka Chopra) म्हणाली की, “अनुराग यांचं सॉरी ऐकून मी हा विचार केला की माझ्याच घरी बसून तुम्ही मला असं कसं बोलू शकता? मी करु शकणार नाही अशी जर का भूमिका असेल तर ते चॅलेंज मी स्वीकारते असं म्हणून मी त्यांना म्हणाले मला कथा ऐकवा. त्यांनी कथा ऐकवली आणि ऑटिस्टटिक झिलमिल या कॅरेक्टची माहिती दिली. पण त्यांचं असं म्हणणं होतं की झिलमिल ही ग्लॅमरस नसून एक साधी ऑटिस्टटिक मुलगी आहे तुझ्याकडून हे होणार नाही त्यामुळे मी खऱ्या ऑटिस्टटिक मुलीला कास्ट करतो. ते ऐकून मी त्यांना म्हणाले, की मला ५ दिवस द्या आपण वर्कशॉप करु आणि जर का ५ दिवसांमध्ये तुम्हाला माझ्यात झिलमिल दिसली नाही तर तुम्ही खऱ्या ऑटिस्टटिक मुलीची निवड करा. त्यानंतर मी ऑटिझम आजाराबद्दल वाचन केलं, ऑटिस्टटिक शाळेत गेले तिथे त्या मुलांसोबत वेळ घालवला. ५ दिवस अभ्यास केल्यानंतर सहाव्या दिवशी अनुराग कश्यप यांना हवी असलेली झिलमिल तयार होती”. अशाप्रकारे प्रियांका चोप्राने स्वत:च्या अभिनयाला सिद्ध करत ‘बर्फी’ चित्रपटातील झिलमिल साकारली होती. (Hollywood industry)

हार्डकोअर पंजाबी मुलगी असणाऱ्या प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने अभिनयाची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटातून केली. आश्चर्य वाटतंय ना? पण हो. विजय याच्यासोबत २००२ मध्ये ‘थमिजन’ या तमिळ चित्रपटातून तिने अॅक्टिंग डेब्यू केला होता. आणि त्यानंतर २००३ मध्ये ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मुळात प्रियांकाला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं तिला इंटरेस्ट होता एरोनॉटिकल इंजिनिअरींगमध्ये. पण तिच्या भावाने तिचे फोटो थेट मिस इंडिया ब्यूटी पेजेंटला दिले आणि भारताला २००० मध्ये ‘मिस वर्ल्ड’ मिळाली. आश्चर्याची बाब म्हणजे भारतासाठी ‘मिस वर्ल्ड’ हा किताब मिळवणाऱ्या प्रियांकाचं आपल्याच देशात स्वागत झालं नव्हतं हे दुर्दैवच. प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांनी लेहरे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दलचा एक विशेष किस्सा सांगितला. (Celebrity)
======
हे देखील वाचा :‘या’ सिनेमासाठी प्रियांका चोप्राला कसे काय मिळाले सहापट अधिक पैसे?======
मिस वर्ल्ड जिंकूनही….
मधु चोप्रा (Madhu Chopra) म्हणाल्या की, “ज्यावेळी प्रियांका मिस वर्ल्ड जिंकून भारतात बरलेलीला परत आली होती त्यावेळी तिचं स्वागत केलं गेलं नव्हतं. शासनाने असं सांगितलं की प्रियांका ज्या मुळ शहरातून येते तिथेच तिचं स्वागत केलं जाईल आणि हे स्त्री शोषण आहे असं सांगून तिचा सत्कार टाळला होता. बरं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली देखील होती पण तरीही तिचं स्वागत झालं नाही. प्रशासन तिचा सत्कार करण्यासाठी नव नवी कारणं देत होतं. मुंबई मात्र याला अपवाद ठरली आणि इंडस्ट्रीने तिचं स्वागत करत तिला चित्रपटांची ऑफरही दिली. पण हिरमुसलेली प्रियांका (Priyanka Chopra) जिद्दीने पुन्हा उभी राहिली. (Entertainment news)

प्रियांकाच्या लहाणपणीचं खेळणं म्हणजे…
मधु चोप्रा यांनी प्रियांकाच्या (Priyanka Chopra) एका खेळण्याची विशेष उल्लेख केला होता. त्या म्हणाल्या की, “प्रियांकाकडे एक खेळणं होतं. त्याला मुक्का मारला की ते परत तुमच्याकडे यायचं. ज्यावेळी प्रियांका उदास असायची ती त्या खेळण्यासोबत खेळायची आणि स्वत:ला शांत करायची”. हिंदी चित्रपसृष्टीने जरी सुरुवातीच्या काळात प्रियांकाला चांगले रोल दिले असले तरी काही काळानंतर कदाचित प्रियांकाच्या टेलेंटमुळे लोकांना इनसिक्युरिटी वाटू लागल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. एका मुलाखतीत प्रियांकाने बॉलिवूडला रामराम का केला त्याचं कारण सांगितलं होतं. ती म्हणाली की, इंडस्ट्रीने मला एका कोपऱ्यात टाकलं होतं. कोणत्याही चित्रपटात माझं कास्टिंग केलं जात नव्हतं. एकूणच हिंदी चित्रपसृष्टीत सुरु असणाऱ्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि त्यामुळेच मी जरा ब्रेक घ्यायचं ठरवलं. ब्रेक घेण्यापुर्वी प्रियांका ‘सात खुन माफ’ या चित्रपटाचं शुट करत होती आणि त्यावेळी अंजुला यांचा तिला फोन गेला ज्यात त्यांनी तिला विचारलं की युएसमध्ये म्युझिक अल्बम करण्याची इच्छा आहे का? आणि त्याचवेळी खरंतर बॉलिवूडच्या बाहेर करिअरच्या संधी प्रियांका शोधत होती आणि ही चांगली संधी तिच्याकडे चालून आली. २०१९ साली ती ‘द स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटात शेवटची झळकली होती. (Bollywood masala)

हॉलिवूडमध्ये निर्माण केलं विश्व
हॉलिवूडमध्ये ‘देसी गर्ल’ने आपला जम बसवण्यास सुरुवात केली आणि २०१५ मध्ये Quantico या सीरीजमध्ये तिने (Priyanka Chopra) काम केलं आणि परदेशातल्या फिल्म मेकर्सनाही स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडलं. प्रियांका चोप्रा ही पहिली साऊथ एशियन अभिनेत्री ठरली जिने अमेरिकन ड्रामा सीरीजमध्ये काम केलं. इतकंच नव्हे तर २०१६ मध्ये प्रियांका पहिली साऊथ एशियन अभिनेत्री ठरली जिने People’s choice award जिंकला. आंतरराष्ट्रीय चित्रपसृष्टीत प्रियांका चोप्राने स्वबळावर आपलं फेम निर्माण केलं. आणि त्यानंतर ‘बेवॉच’, ‘द मॅट्रिक्स’, ‘द व्हाईट टायगर’, ‘लव्ह अगेन’ असे सुपरहिट चित्रपट आणि मालिका दिल्या. बॉलिवूडने जरी प्रियांकाच्या दिसण्याला,तिच्या रंगाला आणि तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याला नाकारलं असलं तरी आजही तिने साकारलेला प्रत्येक हिंदी चित्रपट एक अभिनेत्री म्हणून ती किती परिपक्व आहे हे सांगून जातात. ‘ऐतराज’, ‘फॅशन’, ‘बर्फी’, ‘कमिने’’, ‘ब्लफमास्टर’, ‘मेरी कॉम’ अशी तिच्या चित्रपटांची यादी खरंच मोठी आहे. लवकरच प्रियांका. बॉलिवूडमध्ये पुन्हा कमबॅक करणार अशा चर्चा रंगल्या असून राजामौलीसोबत काम करणार असं सांगितलं जात आहे.(Bollywood gossip)
रसिका शिंदे-पॉल