Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ps 2 चा ट्रेलरमुळे चित्रपटाची प्रतीक्षा वाढली…

 Ps 2 चा ट्रेलरमुळे चित्रपटाची प्रतीक्षा वाढली…
कलाकृती विशेष

Ps 2 चा ट्रेलरमुळे चित्रपटाची प्रतीक्षा वाढली…

by सई बने 01/04/2023

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा Ponniyin Selvan 1 हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतच नाही तर जगभरात वाखणला गेला. तेव्हापासूनच या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे या Ps 2 चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर एवढा उत्कंठावर्धक आहे की, त्याला मिळणा-या लाईकनं नवीन रेकॉर्ड केला आहे.  चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम रवी आणि त्रिशा कृष्णन अशा तगड्या स्टारकास्टचा हा चित्रपट त्यातील सेटमुळेही वाखणण्यात येत आहे.  याशिवाय तत्कालिन दागिने आणि कपडेही प्रेक्षकांसाठी कौतुकाचा विषय ठरले आहेत. Ps 1 च्या पहिल्या भागात नंदिनी नेमकी कोण आहे, ती राजकुमाराला वाचवते का? या प्रश्नावर चित्रपट थांबला होता. आता तेव्हापासूनच Ps 2 सुरु होतोय. यात नंदिनी नेमकी कोण आहे, याचा उलगडा होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरुनही याचा अंदाच प्रेक्षक काढत आहेत. त्यामुळेच Ps 2 हा चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होईल याची उत्सुकता आता वाढली आहे.  

मणिरत्नम यांच्या बहुप्रतिक्षीत Ponniyin Selvan 2 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्याच्यावर प्रेक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या.  ट्रेलरनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  Ps 2 चा हा ट्रेलर सुमारे 3 मिनिटांचा आहे. यात भरपूर अॅक्शन सीन्स आहेत. Ps 2 चा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची क्रेझ आणखीनच वाढली आहे. अनेक प्रेक्षकांनी ऐश्वर्या आणि विक्रमच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. Ps 2 मध्ये सिंहासनासाठी एक मोठे युद्ध पाहायला मिळणार आहे. चोल शासकांचा अपूर्ण बदला Ps 2 मध्ये पूर्ण होणार आहे. यासोबत भरपूर ड्रामा, अॅक्शन आणि रहस्ये सुद्धा यात असणार आहेत.  Ps 2 हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित  होणार आहे. तमिळ आणि तेलुगू व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होईल. प्रसिद्ध लेखिका कल्की कृष्णमूर्ती यांच्या पोनियल सेल्वन याच नावाच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम रवी आणि त्रिशा कृष्णन अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच Ps 1 आणि आता Ps 2 बाबत उत्सुकता होती.  Ps 1 ची भव्यता पाहून मणिरत्नम यांचे कौतुक झाले. सोबत ऐश्वर्याच्या अभिनयालाही वाखाणण्यात आले.  

‘पोनियिन सेल्वन 1’ हा 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली.  जगभरात चित्रपटाने 450 कोटींहून अधिक कमाई केली. आता पोन्नियन सेल्वन 2 चा ट्रेलर पाहिल्यावर चाहत्यांनी Ps 2 या वर्षातला सर्वाधिक मोठा हिट चित्रपट असेल असे जाहीर केले आहे.  

=====

हे देखील वाचा : साऊथची शिस्त, मुंबईत बिघडते…

=====

या ट्रेलरची सुरुवात होते ती, अरुणमोदी यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आणि आता मधुरकातन देव हे सिंहासनाचे पुढचे वारसदार असतील, या घोषणेपासून. यानंतर सिंहासन आणि जमिनीच्या वाटणीचा जो निर्णय घेतला जातो, त्यामुळे पुन्हा युद्ध भडकते.  राजकुमारी नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या चोल साम्राज्याचा अंत करण्याची तिची प्रतीज्ञा पूर्ण करताना दिसणार आहे. यावेळी सिंहासनासाठी मोठी लढत होणार आहे.  ट्रेलरच्या शेवटी एक दृश्य आहे, जिथे राजकुमारी नंदिनी म्हणजेच ऐश्वर्या राय आणि आदित्य म्हणजेच विक्रम समोरासमोर येतात. त्या दृश्यात ऐश्वर्या विक्रमवर तलवार घेऊन उभी आहे. या दृश्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.  Ps 2 चा हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 1
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 1
    Share
    Email
Tags: actor actress Entertainment Movie Ps2 Movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.