डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

R Madhvan : मराठी मातीशी कनेक्शन ते लष्करी प्रशिक्षण; असा आहे आर माधवनचा प्रवास….
फिल्मी इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांचे ठराविक परफॉर्मन्स आपल्या लक्षात राहतात… त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे आर माधवन (R Madhvan)… ‘रेहना है तेरे दिल में’ या हिंदी चित्रपटातील मॅडी आज जवळपास २० वर्ष उलटून गेली तरीही लक्षात आहे… अभिनय क्षेत्रात मुळात करिअर करण्याचं मनातच नसलेल्या माधवन याने आता मात्र एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे… ९०च्या दशकात माधवन जितका फेमस नव्हता झाला तितका तो आज २१व्या शतकात वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर फेमस झाला आहे… तरुण अभिनेत्यांनाही लाजवेल असा चार्म आणि अभिनय प्रत्येक चित्रपटात माधवन करताना दिसतोय… सध्या तो आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटात दिसणार असून त्याच्या लूक आणि कॅरेक्टरची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे… चला तर आज जाणून घेऊयात माधवनचं फिल्मी करिअर आणि मराठी भाषेसोबत असलेलं घनिष्ट नातं… (Entertainment News)
आर माधवन याचा जन्म बिहारमधील एका तमिळ ब्राम्हण कुटुंबात झाला… माधवनचे वडिल रंगनाथन टाटा स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते तर आई सरोजा बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होती. आर माधवनने त्याचे शालेय शिक्षण जमशेदपूर येथील डी.बी.एम.एस. इंग्लिश स्कूलमधून केले… बरं काही जणांना माहित नसेल तर साऊथमध्ये प्रत्येक घरातील एक तरी पोर हे इंजिनिअर असतंच… आणि त्याचप्रमाणे माधवन यानेही इंजिनिअरिंगचं शिक्षण पुर्ण केलं… कोल्हापूरातल्या राजाराम कॉलेजमधून सांस्कृतिक राजदूत म्हणून भारताचे प्रतिनिधत्व करण्याची शिष्यवृत्ती त्याला मिळाली. त्यानंतर त्याने कॅनडामध्ये रोटरी इंटरनॅशनलसोबतच्या एक्सचेंज प्रोग्रामचा भाग घेतला. कॅनडात एक वर्ष राहिल्यानंतर माधवन पुन्हा कोल्हापूरात आला आणि तिथे त्याने बीएससीचे शिक्षण पूर्ण करत लष्करी प्रशिक्षणही घेतले.

अभिमानाची बाब म्हणजे वयाच्या २२ व्या वर्षी महाराष्ट्रातल्या NCC कॅडेट्सपैकी त्याची ओळख निर्माण झाली… याच काळात त्याला इंग्ल्ंडला जाण्याची संधी मिळाली… तिथे त्याने ब्रिटीश आर्मी, रॉयल नेव्ही आणि रॉयल एअर फोर्समध्ये प्रशिक्षण घेतले. लष्काराचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यामुळे पुढे याच क्षेत्रात करिअर करण्याचा त्याचा विचार होता… पण या क्षेत्रात त्याची भरती होण्यासाठी त्याच्या वयोमर्यादेत ६ महिन्यांची तफावत येत असल्यामुळे त्याचं लष्करात भरती होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं…
पुढे कोल्हापूरात शिक्षक म्हणून तो रुजू झाला… इथे त्याच्या पर्सनल आयुष्यातही एक मोठा ट्विस्ट आला… तर कोल्हापूरात तो शिक्षक म्हणून काम करत असताचा त्याच्याच एका विद्यार्थीवर त्याचं प्रेम जडलं.. ९०च्या दशकात सरिता बिर्जेने कोल्हापूरातील एका कम्युनिकेशन वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता. याच वर्कशॉपमध्ये माधवन शिक्षक म्हणून शिकवत होते. इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, माधवन सोशल कम्युनिकेशनचे वर्ग घेऊ लागला आणि सरिता त्यावेळी एअर होस्टेस म्हणून काम करत होती. (R Madhvan Lovestory)

सरिता आणि माधवनची ती वर्कशॉपमधील भेट मैत्रीतून प्रेमात रुपांतरीत झाली… मग काय शिक्षक आणि विद्यार्थीनीचं नातं नवरा-बायकोच्या नात्यात झालं आणि १९९९ मध्ये माधवन आणि सरिताने पारंपारिक तमिळ रितीरिवाजानुसार लग्न केलं… मुळची नागपूरची असणारी मराठमोळी सरिता आता तमिळ कलाकाराची बायको झाली… दरम्यान, शिक्षण कोल्हापूरात झाल्यामुळे आि बायको मराठी असल्यामुळे माधवनचं मराठी संस्कृतीशी खास नातं जोडलं गेलं आहे… बऱ्ऱ्याच मुलाखतीत माधवने कोल्हापूरची मिसळ त्याची फेव्हरेट असल्याचं देखील म्हटलं होतं…

दरम्यान, आर माधवन याचा चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, ‘शैतान’ चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये त्याचे जास्त फॅन्स वाढले… पुढे ‘केसरी २’, ‘दे दे प्यार दे २’ आणि आता ‘धुरंधर’मुळे लोकं अक्षरश: त्याच्या अभिनयासाठी वेडी झाली आहेत… आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनित या चित्रपटात आर माधवन अजय सानयाल ही भूमिका साकारणार आहे… ५ डिसेंबर २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून यात संजय दत्त, अक्षय खन्ना आणि अर्जून रामपाल हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत…. (R Madhvan Movies)
================================
================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi