Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Raanjhanaa : AI च्या मदतीने बदलला चित्रपटाचा शेवट; दिग्दर्शक आणि इरॉस यांच्यात पेटला वाद
२०१३ मध्ये रिलीज झालेल्या आनंद राय यांच्या ‘रांजना’ (Raanjhanaa) चित्रपटाची आजही १२ वर्षांनी तितकीच क्रेझ तरुणाईत आहे… धनुष आणि सोनम कपूरच्या अभिनयासोबतच चित्रपटाची कथा आणि गाणी म्हणजे प्रेक्षकांना भावलेली एक जमेची बाजू… रांजना हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत रिलीज झाला होता… आणि आता तब्बल १२ वर्षांनी पुन्हा एकदा रि-रिलीज होणार असून चित्रपटाचा शेवट AI च्या मदतीने बदलण्यात आला आहे… आणि एका नव्या Ending सोबत १ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट तमिळ भाषेत रि-रिलीज होणार आहे… मात्र, मुळ ‘रांजना’चा शेवट बदलण्यात आल्यामुळे इरॉस फिल्म्स विरुद्ध दिग्दर्शक आनंद एल रॉय असा नवा वाद सुरु झाला आहे…(Bollywood News)

दरम्यान, रांजना या चित्रपटाचे इरॉस कंपनीकडे कॉपी राईट्स आहेत. मात्र, दिग्दर्शक असूनही माझ्या चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला आणि त्याबद्दल त्यांनी माझ्याशी काहीही चर्चा केली नसल्याची नाराजी आनंद यांनी व्यक्त केली आहे…. ते असं म्हणाले की, “रांझना चित्रपटावर लोकांचं प्रेम आहे. या चित्रपटाने लोकांच्या मनात १२ वर्षांपासून घर केलं आहे. आता मला हे कळत नाही की मला म्हणजेच चित्रपटाच्या दिग्दर्शकाला विश्वासात न घेता हे काय चाललं आहे? रांझना या चित्रपटातून एक शोकांतिका मांडली होती. आता लोकांच्या भावनांशीही तुम्ही खेळ करणार आहात का? चित्रपटाचा खरा आवाज म्हणजे चित्रपटाचा शेवट आहे. तुम्ही चित्रपटाचा शेवट तुमच्याकडे हक्क स्वाधीन आहेत म्हणून एआयच्या मदतीने बदलत आहात. हे करणं म्हणजे चित्रपटाचा आत्मा बदलण्यासारखं आहे’. (Entertainment)

दिग्दर्शक आनंद राय द स्क्रीनशी चर्चा करताना म्हणाले, “काही कोटींच्या कमाईसाठी हे लोक दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांनी केलेल्या कलाकृतीशी छेडछाड करत आहेत. टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करा त्याचं स्वागत करु. मात्र, हे जे काही चाललं आहे ते धोकादायक आहे. उद्या मनात आलं तर लोक ‘शोले’ (Sholay) चित्रपटात जय आणि वीरु दोघांनाही जिवंत राहिलेलं दाखवून चित्रपटाचा क्लासमॅक्सच बदलतील”, अशीही भीती आनंद एल रॉय यांनी बोलून दाखवली.

तर, या वादावर इरॉस फिल्म्स कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप द्विवेदी म्हणाले की, “इरॉसकडे चित्रपटाचे हक्क स्वाधीन आहेत. आमच्याकडे चित्रपटाचा विशेष कॉपीराईट आहे. धनुष, सोनम कपूर तसंच इतर कलाकारांनी यासंदर्भातल्या करारावर सह्या केल्या आहेत. जो बदल आम्ही करत आहोत, ती एक सकारात्मक रचना आहे. आम्ही संपूर्ण चित्रपट बदललेला नाही फक्त शेवटचे काही प्रसंग बदलले आहेत. एआयच्या मदतीने हा बदल करण्यात आला असून आम्ही एआयच्या मदतीने बदल केला असला तरीही एआय हे सावधगिरीने वापरण्याचं टूल आहे. रांझना चित्रपटाचा जरी शेवट बदलला असला तरी मूळ संकल्पनेत कोणताही बदल केला नाही आहे”.
================================
हे देखील वाचा: Border 2 मध्ये वरुण धवनसोबत झळकणार ही अभिनेत्री!; अर्जून रामपाल सोबत केलं आहे काम….
=================================
आता, ‘रांजना’ चित्रपटाचा नेमका शेवट काय असणार? आणि प्रेक्षक तो स्वीकारणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे… दरम्यान, लवकरच रांजना चित्रपटाचा सीक्वेल तेरे इश्क मे येणार असून यात धनुष आणि क्रिती सेनॉन मुख भूमिकेत झळकणार आहे… तर. २०१३ मध्ये आलेल्या रांजना चित्रपटात धनुष, सोनम कपूर, अभय देओल, स्वरा भास्कर, मोहम्मद झीशान अय्युब यांच्या प्रमुख भूमिका होत्या…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi