Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Suresh Wadkar

    Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rishi Kapoor : ‘डफली वाले डफली बजा…’ हे गाणे सिनेमातून

Sai Tamhankar: ‘गुलकंद’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई!

Rajkumar Rao : ‘भूल चुक माफ’ चित्रपटाला उच्च न्यायालयाचा दणका!

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; पार केला

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”;

Pallavi Joshi : अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात

Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर

Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती

स्वतःला समजून घेण्यासाठी Actress Manisha Koirala ने केली ब्रेन मॅपिंग; काय

Operation Sindoor च्या  पार्श्वभूमीवर Aamir Khanने ‘सितारे जमीन पर’ सिनेमाबद्दल घेतला मोठा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मॅडम रेणुकाची जादू

 मॅडम रेणुकाची जादू
आठवणींच्या पानावर

मॅडम रेणुकाची जादू

by सई बने 11/05/2020

सोशल मिडीयावर गेल्या काही महिन्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेला स्टारकीड म्हणजे तैमूर… करीना आणि सैफ अलीच्या या गो-यागुब-या लेकानं सोशल मिडीयाला वेडं केलं होतं. पण या तैमूरची जणू हवा काढून घेतलीय ती आपल्या मराठमोळ्या लेकीनं… तिचं नावच भारी आहे… रेणुका… रेणुका राहूल देशपांडे.

प्रख्यात शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांची ही लाकडी कन्या सध्या अवघ्या महाराष्ट्राची लाडकी झाली आहे. देशपांडे घराण्याचा गायनाचा वारसा म्हणजे काय, हे या चिमुरडीचे गाणे ऐकले की कळते… वडीलांसोबत अर्थात राहूल देशपांडेंसोबत ती शास्त्रीय गाणी म्हणतेच… पण वडीलांच्या एक पाऊल पुढे टाकत ती इंग्रजी गाणीही तेवढ्याच तन्मयतेने म्हणते… विशेष म्हणजे तिचे पाठांतर… आणि हजरजबाबीपणा… या सर्वांमुळे सध्या सोशल मिडीयावर रेणुकाचा चांगलाच बोलबाला आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच घरात आहेत. राहूल देशपांडेही आपले सर्व कार्यक्रम रद्द करुन कुटुंबियांसोबत घरी आहेत. अशावेळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत आहेत. सोबत आपला गाण्याचा रियाजही करीत आहेत. गप्पा आणि गाणी असं हे लाईव्ह असतं. पण या लाईव्हमध्ये खरी रंगत येते ती रेणुकामुळे… एकतर या रेणुका मॅडमना कॅमेरा फिअर वैगेरे काही असतं हे माहीतही नाही… ती बिंनधास्त असते. ती या लाईव्हमध्ये येते. तिच्या बाबासोबत गाणं गुणगुणते… आपल्या बाबांनी काय गायला हवं… आणि कसं गायला हवं हेही सांगते… आहे की नाही कमाल. ज्या राहूल देशपांडेला प्रत्यक्ष ऐकण्यासाठी गानरसिक धडपडत असतात… त्या राहूल देशपांडेना ही छोटुशी रेणुका कसं गाणं गायला हवं हे शिकवते… सूर लावणाऱ्या या राहूल देशपांडेला असं करु नकोस, असा सूर लावू नकोस… हे सांगण्याचं धाडस ही बेटी करतेय… मग त्याच्यासोबत युवतीमना दारुण हे पद गाते… आपल्या वडीलांसोबत गातांना मध्येच ही पठ्ठी सूर लावते… रेणुकाचे हे अंदाज सोशल मिडीयावर चांगलेच चर्चेत आहेत.

आत्ताच, काही दिवसांपूर्वी तिचा नवा व्हिडीओ आला आहे… तिच्या सुंदर केसांचं रहस्य कशात आहे, हे ती सांगत आहे… हा व्हिडीओ बघितला नसाल तर नक्की बघा… काय तिची स्टाईल… डोळे… हावभाव.. आणि ते आहा बोलण्याची स्टाईल… एकदम झक्कास…

https://www.instagram.com/p/B_t9U6MpeLa/?utm_source=ig_web_copy_link

याआधीही रेणुकाचे तिच्या वडीलांसोबतचे अनेक व्हिडीओ युट्युबवर लोकप्रिय झाले आहेत. कधी ती सैय्या मेरा नथ्थू गैरा… हे फिल्मी गाणं गाते तर कधी लेट ईट गो… हे इंग्रजी गाणं गाते! एक फेसबुक लाईव्हमध्ये ती चक्क कोरोनाला धमकी देतेय, येडा करोना म्हणत त्या करोनाला मारायला रेणुका तयार झालीय. अशाच एका फेसबुक लाईव्हमध्ये रेणुका बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात… हे गाणं आपल्या बाबांसोबत म्हणते… मग थोड्यावेळांनी अजून एक गाणं सुरु करते… कुठलं, तर दिल की तपीश आज है…

फेसबुक लाईव्हाच्या दरम्यान ही रेणुका आपल्या वडीलांचे विकपॉईंही सांगते. बाबा पालीला कसे घाबरतात हे करुन दाखवते. एकीकडे ती संशय कल्लोळ मधील रोहीणी सादर करते… एकूण काय या रेणुकाच्या फॅनची संख्या सध्या राहूल देशपांडेपेक्षा अधिक झाली आहे.

https://www.instagram.com/p/B-v7KbXJUnm/?utm_source=ig_web_copy_link

काही महिन्यापूर्वी आळीमिळी गुपचिळी च्या सेटवर या रेणुकानं धम्माल उडवून दिली होती… लाईटस, कॅमेरा आणि ऍकशन हा क्रमही तिला माहीत आहे… हे बोलल्याशिवाय मॅडम काहीच सादर करीत नाहीत. तिचे व्हीडीओ लाखभरापेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहेत. रेणुकाचा स्पष्ट अंदाजच सर्वांना भावला आहे. आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत ही छोटी रेणुका सर्वांची लाडकी बनली आहे. मंडळी तुमच्यापैकी कोणी कोणी रेणुकाचे व्हिडोओ पाहिले आहेत? जर अद्याप बघितले नसतील, तर नक्की बघा… बघा तुम्हीही या रेणुकाच्या प्रेमात पडाल…

सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celibrity celibrity news Entertainment Featured music Singer social media
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.