Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Rahul Deshpande : लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल पत्नीपासून झाले विभक्त
राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande)यांनी त्यांच्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांच्या मनावर आजवर राज्य केलं आहे… कायम त्यांच्या गाण्यांसाठी चर्चेत असणारे राहूल देशपांडे आता मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आले आहेत… राहूल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याच्या निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.. १७ वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी सहमतीने हा निर्णय घेतल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे..

राहूल देशपांडे यांनी पोस्ट करत लिहिलं आहे की, ”१७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आणि अगणित सुंदर आठवणींनंतर, मी आणि नेहाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही आपापले आयुष्य स्वतंत्रपणे पुढे जगत आहोत. आमचे कायदेशीर विलगीकरण सप्टेंबर २०२४ मध्ये कायदेशीररित्या पूर्ण झाले. मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यापूर्वी काही वेळ घेतला, या बदलाच्या प्रक्रियेला मी खाजगीरित्या हाताळू शकेन आणि सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हिताची. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि मी नेहा सोबत तिच्यासाठी अतुट प्रेम, साथ आणि स्थैर्य देण्यास कटिबद्ध आहे.”
====================================
हे देखील वाचा: Bigg Boss 19 ची स्पर्धक Tanya Mittal घरात घेऊन गेली तब्बल ८००हून जास्त साडया?
====================================
पुढे त्यांनी असं देखील लिहिलं आहे की, ”हा जरी आमच्या वैयक्तिक आयुष्यातील एक नवीन अध्याय असला तरी, पालक म्हणून असलेले आमचे नाते आणि एकमेकांबद्दल असलेला आदर आजही तसाच आहे. या काळात तुम्ही दाखवलेल्या समजुतीबद्दल आणि आमच्या निर्णयाचा आदर कराल अशी आशा आहे”.