‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Raj Kpaoor-Amitabh Bachchan पडद्यावर एकत्र आले नाहीत पण बॉक्स ऑफिसवर मात्र समोरासमोर उभे ठाकले!
हिंदी सिनेमातील ग्रेटेस्ट शोमन राजकपूर आणि हिंदी सिनेमाचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी एकत्र कुठल्याच सिनेमात स्क्रीन शेअर केला नसला तरी बॉक्स ऑफिसवर मात्र यांच्या सिनेमाचे टक्कर तीन-चार वेळेला जबरदस्त झाली होती. या दोघांमध्ये व्यावसायिक स्पर्धा नक्कीच होती पण परस्परांबद्दल आदर, प्रेम आणि सद्भावना कायम असायचा अमिताभ बच्चन यांनी कायम राज कपूर यांच्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सन्मानपूर्वक उद्गार काढले. मागचे वर्ष राज कपूर यांचे जन्मशताब्दीचे वर्ष असल्यामुळे त्यांच्या अनेक चित्रपटांचे प्रदर्शन देशभरातील विविध चित्रपटगृहातून होत असताना अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून ‘राज कपूर यांच्या कल्ट क्लासिक सिनेमाला थिएटरमध्ये जाऊन बघण्याचे प्रेक्षकांना आवाहन केले होते. राज कपूर यांचे सिनेमे भारतीय चित्रपट सृष्टीचे वैभव आहेत असे गौरवोद्गार काढले होते.

अमिताभ बच्चन आणि आर के फिल्म्स यांच्यातील टक्कर पहिल्यांदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली १९७३ साली जेव्हा आर के फिल्मचा ‘बॉबी’ हा चित्रपट २८ सप्टेंबर १९७३ रोजी प्रदर्शित झाला. त्यावर्षी अमिताभ बच्चन यांचा प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ हा चित्रपट ११ मे १९७३ रोजी प्रदर्शित झाला होता . या दोन सिनेमांची टक्कर चार महिन्यांच्या अंतराने झाली. ‘जंजीर’ या चित्रपटातून नव्या सुपरस्टारचा उदय झाला. ‘बॉबी’ ला टक्कर देण्यामध्ये ‘जंजीर’, ‘दाग’ आणि ‘जुगनू’ या चित्रपटांचा समावेश होता. ‘बॉबी’ रिलीज नंतर बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये तो इतर चित्रपटा ना भारी पडला. यानंतर आर के फिल्मला अमिताभच्या चित्रपटांचा खरा फटका बसला १९७८ साली.

जेव्हा आर के फिल्मचा ‘सत्यम शिवम सुंदरम’ हाराजचा ड्रीम प्रोजेक्ट २२ मार्च १९७८ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला आणि अमिताभ बच्चन यांच्या तुफान लोकप्रिय झंजावातात कुठल्या कुठे हरवून गेला. या वर्षीच्या टॉप टेन सिनेमात अमिताभ चे ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘त्रिशूल’,डॉन’,कस्मे वादे’ आणि ;गंगा की सौगंध’ हे सिनेमे होते. हे सर्व सुपर डुपर हिट ठरले होते . त्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये आर के फिल्म्स ‘सत्यं शिवन सुंदरम’ सातव्या नंबरवर गेला होता. राजकपूरला या सिनेमापासून भरपूर अपेक्षा होत्या परंतु एक ऍव्हरेज हिट असं ‘सत्यम शिवम सुंदरम’ ला यश मिळालं. त्यावर्षी अमिताभच्या मुकद्दर का सिकंदर, डॉन हे दोन सुपरहिट सिनेमे वर्षभर थिएटर मधून हलायचे नाव घेत नव्हतं प्रेक्षकांच्या गर्दीचा फ्लो या सिनेमाला कायम होता. त्यामुळे साहजिकच इतर चित्रपटांना यश मिळणं अवघड होतं आणि यातच राज कपूर आर के फिल्मचा ‘सत्यम शिवम सुंदरम’ अडकला.
================================
हे देखील वाचा : The Great Gambler : अमिताभ बच्चनचा चांगला पण अंडर रेटेड सिनेमा!
=================================
यानंतर मात्र राज कपूर यांनी एक लक्षात घेतलं की अमिताभ बच्चन यांच्या झंजावातात टिकणं थोडसं अवघड आहे त्यामुळे शक्यतो आमने-सामने टक्कर टाळायची. १९८० साली अमिताभ बच्चन यांचा ‘सिलसिला’ आणि आर के फिल्म च्या ‘प्रेम रोग’ चे शूटिंग एकाच वेळेला सुरू झाले. ‘सिलसिला’ या चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये ‘ हे गाणं नेदरलँडची राजधानी ॲमस्टर डॅम येथील ट्यूलिप गार्डनमध्ये चित्रित केले गेले. ही बातमी जेव्हा राज कपूर यांना कळाले त्यावेळेला त्यांनी आपल्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटातील ‘भंवरे न खिलाया फूल फुल लो ले गया राजकुंवर…’ हे गाणे त्याच लोकेशनवर चित्रित करायचं ठरवलं आणि तसेच चित्रित देखील केले देखील!
‘सिलसिला’ आणि ‘प्रेम रोग’ यांची रिलीज टक्कर होऊ नये म्हणून आर के फिल्म्सने आपल्या ‘प्रेम रोग’ चे प्रदर्शन पुढे ढकलले. यश चोप्रा यांचा ‘सिलसिला’ हा सिनेमा १४ ऑगस्ट १९८१ रोजी प्रदर्शित झाला आणि सेमी हिट ठरला. त्यानंतर तब्बल वर्षभरा नंतर ३० जुलै १९८२ रोजी ‘प्रेम रोग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यावर्षीचा तो सुपरहिट ठरला. पण या वर्षी अमिताभ बच्चन यांचे सहा चित्रपट रिलीज झाले होते. ‘नमक हलाल’, ’खुद्दार’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘शक्ती’, ’बेमिसाल’, आणि ‘देश प्रेमी’… त्यातील तीन सिनेमांमध्ये अमिताभ बच्चनचे डबल रोल होते म्हणजे एकूण नऊ अमिताभ बच्चन सोबत टक्कर होती. तरीही ‘प्रेम रोग’ ने चांगला बिजनेस केला. यावर्षी मात्र बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता मिथुनचा ‘डिस्को डान्सर’ आणि सुभाष घई यांचा ‘विधाता’. अमिताभच्या सुपर हिट सिनेमांच्या प्रदर्शनाची संख्या वाढल्या मुळे इतरांना प्रेक्षक मिळविणे कठीण होत होते. याच वर्षी राजकपूर यांचा अभिनेता म्हणून ‘वकील बाबू’ हा सिनेमा आला होता. तो कधी आला कधी गेला लक्षात देखील आले नाही.

यानंतर अमिताभ बच्चन आणि आर के फिल्म्स यांची टक्कर झाली होती १९८५ साली यावर्षी आर के फिल्मचा ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट आला होता आणि त्याच्या समोर मनमोहन देसाई यांचा ‘मर्द’ या चित्रपटाने आव्हान उभे केले होते. अर्थात बॉक्स ऑफिस कलेक्शन रेकॉर्ड पाहिले तर ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट त्यावर्षीचा सुपरहिट सिनेमा ठरला. राजकपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यात व्यावसायिक स्पर्धा जरी असली तरी राजकपूर यांना देखील अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाबद्दल भरपूर आदर होता. जेव्हा ‘सिलसिला’ या चित्रपटाला समीक्षकांनी टीका केली होती तेव्हा राज कपूर यांनी यातील ‘हळुवार प्रेम कथा खूप चांगल्या पद्धतीने पडद्यावर आणली आहे‘ असा गौरव केला होता. तसेच यश चोप्रा यांनी ट्युलिप गार्डन मध्ये सिलसिला चे गाणे ‘प्रेम रोग’ पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने चित्रित केले होते याची देखील दाद देखील दिली.
================================
हे देखील वाचा : Shashi Kapoor यांना राज कपूर यांनी कोणता मोलाचा सल्ला दिला होता?
=================================
अमिताभ बच्चन आणि राज कपूर हे दोघे रुपेरी पडद्यावर फक्त ‘नसीब’ या सिनेमातील ‘जोन जॉनी जनार्दन ‘ या गाण्याच्या एका प्रसंगात एकत्र आलेले दिसतो. जेंव्हा पार्टीमध्ये अमिता राज कपूर यांच्या हातात अकॉर्डिंयन देऊन त्यांना गायची विनंती करतो. या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न फारसा कधी झाल्याचे आठवत नाही. मनमोहन देसाई यांनी मात्र एका सिनेमात राज कपूरला अमिताभ सोबत कास्ट करायच्या ठरवले होते परंतु राजकपूर यांनी सांगितले की ‘आता तर माझी मुले अमिताभ सोबत काम करत आहेत!” ऋषी कपूर- अमिताभ ही जोडी त्या काळात खूप लोकप्रिय झाली होती पण राजकपूर मात्र ऋषी कपूर ला अमिताभच्या सिनेमात फारसं स्थान नव्हतं असं नेहमी बोलून दाखवायचे. जाहीर रित्या कधी बोलले नाहीत परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात ऋषी कपूर ने जे आत्मचरित्र ‘खुल्लमखुल्ला’ लिहिले आहे त्या मध्ये त्यांनी याचा उल्लेख केला होता!