Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण?

Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Shilpa Shetty : “मी महाराष्ट्राची मुलगी…”,मराठी-हिंदी भाषा वादावर शिल्पाचं सूचक

‘बिग बॉस मराठी’ फेम Janhavi Killekar ची मालिकेत एन्ट्री; मोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना

Actress Snehlata Vasaikar आता होणार माईसाहेब; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत करणार

Son Of Sardaar 2 Trailer: अजय देवगनच्या हटके कॉमेडीने चाहते

Bahubali Movie :१० वर्षांनी पुन्हा एकदा ‘बाहुबली’ एका ट्विस्टसह भेटीला

राजेश खन्ना यांच्या ‘या’ सिनेमाच्या मुहूर्ताची क्लॅप Amitabh Bahchan यांनी

Genelia Deshmukh : ‘सितारे जमीन पर’ नंतर तिच्याच सुपरहिट चित्रपटाच्या

Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…

 चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…
कलाकृती तडका बात पुरानी बडी सुहानी

चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…

by धनंजय कुलकर्णी 14/12/2020

१४ डिसेंबर हा सिनेमातील एका महान कलावंताना आठवण्य़ाचा दिवस आहे. (जन्म १४ डिसेंबर १९२४) आपल्या निळ्या डोळ्यातून रसिकांना प्रेमाची भाषा शिकवणार्‍या आणि आपल्या भव्य कलाकृतीतून शोमन या पदवीला सार्थ ठरवणार्‍या राजकपूरचा आज जन्म दिवस.

आज त्याला आपल्यातून जाऊन पंचवीस वर्षाचा कालावधी उलटला असला तरी त्याच्या लोकप्रियतेत जगतिक पातळीवर तसूभरही घट झालेली दिसत नाही. राज प्रामुख्याने ओळखला जातो त्याच्या स्वत:च्या आर के बॅनरमुळे. वयाच्या २४ व्या वर्षी त्याने १९४८ साली ’आग’ हा पहिला चित्रपट आपल्या आर के या चित्र संस्थेद्वारे बनविला. तिथून पुढच्या तीन दशकात आर के चा जबरदस्त करीष्मा जारी होता.

असं असलं तरी राजकपूरने आर के च्या बाहेरील चित्रपटात ज्या भूमिका केल्या त्या देखील काही कमी मोलाच्या नव्हत्या. या सिनेमांबाबत आणि व्यक्तीरेखांबाबत तसं फार कमी बोलंलं जातं. आज राजच्या जयंतीच्या निमित्ताने त्याच्या आर के बाहेरच्या भूमिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात आढावा घेवूयात.

१९५० साली केदार शर्मा यांचा ’बावरे नैन’ हा चित्रपट आला होता. केदार शर्मांचे राजच्या जीवनात स्थान या करीता महत्वाचे होते की त्यांनीच त्यांच्या ’नीलकमल’ (१९४७) द्वारे राजला नायक बनवले होते. ’बावरे नैन’ मध्ये गीताबाली त्याची नायिका होती. रोशन यांनी संगीत दिलेल्या या चित्रपटातील ’खयालो में किसीके इस तरह आया नही करते’, ’सुन बैरी बलम सच बोल’ आणि ’तेरी दुनियामें दिल लगता नही वापस बुला ले’हि अप्रतिम गाणी या प्रणयी त्रिकोणाच्या सिनेमाला हिट करण्यासाठी पूरक होती.राज-नर्गीस यांनी एकूण १६ चित्रपटात एकत्र काम केले.त्या  पैकी आर के बॅनरचे सहा सिनेमे होते.

बावरे नैन

आर के बाहेरच्या १९५६ सालच्या ’चोरी चोरी’ चा उल्लेख महत्वपूर्ण ठरावा. मूळात हा सिनेमा ’इट हॅपन्ड वन नाईट’या हॉलीवूड च्या सिनेमावर बेतला होता. यातील शंकरजयकिशनची गाणी अतिशय मधाळ आणि मनाला रूंजी घालणारी होती. ’रसिक बलमा’, ’आजा सनम मधुर चांदनी में’,’जहां मै जाती हूं वही चले आते हो’, ’ ये रात भीगी भीगी ’’पंछी बनू उडती फिरू’ हि गाणी इतक्या वर्षांनंतर आजही मनाल धुंद करतात.

राजच्या अभिनयाचा खरा कस ज्या सिनेमात लागला तो होता १९५८ चा ’फिर सुबह होगी’रमेश सैगल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट डोस्डोव्हस्कीच्या ’क्राईम अ‍ॅंड पनिशमेंट’वर आधारीत होता. साम्यवादी विचारांचा उघड उघड प्रचार करणारा हा सिनेमा अप्रतिम जमून आला होता.यात त्याच्या जोडीला माला सिन्हा होती. डाव्या विचारसरणीच्या साहिरच्या आशयघन काव्याला खय्यामचे संगीत होते.’वो सुबहा कभी तो आयेगी’,’फिर न किजिए मेरी गुस्ताख निगाहोंका गिला’,’चीनो अरब हमारा’या गीतांनी आणि राजच्या अप्रतिम अभिनयाने हा सिनेमा सर्वाथाने वेगळा ठरला.

१९५९ साली ऋशिकेश मुखर्जी यांचा ’अनाडी’ चित्रपट आला यात राज सोबत नूतन होती.यात मात्र राजने आपल्या आर के च्या ट्रॅंप लाच रीपीट केले होते.’दिल के नजरसे ’, ’किसीके मुस्कुराहटो पे हो निसार’,’तेरा जाना दिल के अरमानोका लूट जाना’, ’ सब कुछ सीखा हमने’ ’वो चां खिला वो तारे हंसे’ हि गाणी व हा चित्रपट राजला त्या वर्षीचे फिल्म फेअर देवून गेली.यानंतर साठच्या दशकात ’दिल हि तो है ’,’छलिया’,’आशिक’,नजराना’,’दुल्हा दुल्हन’ असे रोमॅंटीक सिनेमे येत गेले.

पण १९६६ साली आलेला ’तीसरी कसम’ एकूणच सिनेमाच्या इतिहासात एक वेगळा प्रयत्न होता.संवेदनशील मनाच्या शैलेंद्र ची हि निर्मिती होती. यात राजच्या जोडीला वहिदा होती.अतिशय मनापासून बनवलेल्या अभिजात कलाकृती शापीत ठरतात. या चित्रपटाबाबत हाच प्रत्यय आला.यात राजने रंगवलेला भॊळा भाबडा हिरामण गाडीवान अप्रतिम होता. सत्तरच्या दशकात राज चरीत्र भूमिकांकडे वळलाखरा पण १९८० सालच्या संजय खानच्या ’अब्दुल्ला’चा अपवाद वगळता त्याच्या तील अभिनेत्याचा उपयोग फारसा करून घेतला नाही.

Sab Kuch Seekha Humne | Raj Kapoor | Evergreen Hindi Song (राज चे आर के बाहेरचे सुपर हिट गाणे)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Celebrity Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.