
Rajinikanth यांना बॉलीवूडमध्ये लॉन्च करणाऱ्या सिनेमात बाजी मारली होती अमिताभ बच्चन यांनी!
साउथचा सुपरस्टार रजनीकांत याने हिंदी सिनेमा मध्ये पहिल्यांदा अभिनय केला १९८३ सालच्या ‘अंधा कानून’ या चित्रपटात. या सिनेमा मध्ये त्याची साउथची सर्व तीच सुपर हिट ठरलेली ‘रजनी’ स्टाईल होती. फाइट सिक्वेन्स, हात उलटा करून डोळ्यावर गॉगल सरकवणे, तोंडात सिगारेट झेलणे, एकाच वेळी १०-१२ व्हिलन सोबत तुफानी स्टायलिश फाईट, व्हिलनच्या डोक्यावर सिगारेट विझवणे, बाईक वरील कसरती, हातापायांच्या चमकदार हालचाली, स्टाईलने लोकांना वेड लावलं होतं…

‘अंधा कानून’ हा चित्रपट रजनीकांचच्याच Sattam Oru Iruttarai (१९८१) तामिळ सिनेमाचा रिमेक होता. या सिनेमाचा रिमेक तेलगू आणि मल्याळममध्ये झाले होते आणि सुपरहिट झाले होते. त्यामुळे निर्माता ए पूर्णचंद्रराव आणि दिग्दर्शक टी. रामाराव यांनी हा सिनेमा हिंदीत करायचे ठरवले. रजनीकांतच्या बॉलीवूड लॉन्चिंगसाठी एकदम सेफ लँडिंग होते. पण चित्रपटाची शूटिंग सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून दिग्दर्शकाच्या मनात एक शंका येऊ लागली. हिंदी सिनेमाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. इथल्या प्रेक्षकांची टेस्ट वेगळी आहे. तिथे एकटा रजनीकांत टिकू शकेल का? यावर त्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी आपली काळजी निर्मात्या सोबत बोलून दाखवली आणि सांगितले,”बॉस, आपल्याला आणखी कोणीतरी सपोर्टिंग ॲक्टर या चित्रपटात घ्यावा लागेल तरच रजनीकांतचे लॉन्चिंग सक्सेसफुल होईल!” चित्रपटात आणखी एक नायक आणायचा म्हटलं तर सर्वांच्या समोर एकच नाव पुढे आले अमिताभ बच्चन.
जेव्हा हा प्रस्ताव बिग बी यांच्याकडे गेला तेव्हा त्यांनी त्यांची डायरी दिग्दर्शका समोर ठेवली. पुढचं एक वर्षभर एकही तारीख शिल्लक नव्हती. काय करायचे? निर्मात्याने अमिताभला, ”तुम्ही फक्त आम्हाला पाच दिवस द्या; आम्ही सर्व शूट पूर्ण करतो.” असे सांगितले. तसेच याकरता प्रति दिन दोन लाख रुपये मानधन तुम्हाला मिळेल!”. अमिताभ बच्चन त्यावेळी एका सिनेमाचे 15 ते 20 लाख रुपये घेत होते. इथे केवळ पाच दिवसाच्या शूटिंगसाठी त्याला दहा लाख रुपये मिळत होते. प्रश्न पैशाचा नव्हता.
============================
हे देखील वाचा : Rajinikanth : रजनीकांतचा वन मॅन शो “बाशा” चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण
============================
अमिताभने आपला ब्लॉगमध्ये लिहिले आहे की,”प्रश्न पैशाचा नव्हता. लोक माझ्या कामाला किती महत्त्व देतात याचा होता.” अमिताभने चित्रपटात भूमिका करायचे मान्य केले. रोल स्पेशल अपिअरन्स होता पण त्यासाठी खास भूमिका लिहिली गेली. अमिताभ बच्चन चित्रपटात आल्यानंतर सर्वच चित्र पालटले. अनेक प्रसंग आणि घटना यांचं री कन्स्ट्रक्शन केलं गेलं. या चित्रपटात रजनीकांत रीना राय आणि हेमामालिनी यांच्या भूमिका होत्या. हेमा मालिनी या सिनेमा पोलीस इन्स्पेक्टरचा रोल करणार होती आणि ती रजनीकांतची बहिण दाखवली होती. सिनेमाची स्टोरी तशी फ्लॅट होती. ‘डेथ विश’ या इंग्रजी चित्रपटावरून (ज्यावरून पुढे प्रकाश मेहरा यांनी ‘जंजीर’ बनवला होता) तीच थीम या सिनेमात वापरली. लहानपणी आपल्या डोळ्यादेखत आपल्या आई-वडिलांचे हत्या होते आणि हा मुलगा मोठा होऊन त्या हत्येचा सूड घेऊन मारेकऱ्यांचा खातमा करतो. असे कथानक होते.
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील आगमनानंतर सिनेमाचे डायमेन्शन्स बदलले. त्याच्यासाठी खास भूमिका लिहिली गेली. जानिसार अख्तर नावाच्या एका फॉरेस्ट ऑफिसरचा रोल त्याने केला. अतिशय प्रामाणिक असलेल्या या ऑफिसरला फसवले जाते आणि एका खोट्या खुनाच्या गुन्ह्यात अडकवले जाते. एवढेच होत नाही तर त्याच्या पत्नीची इज्जत आणि मुलीचा जीव देखील घेतला. आपली जेल यात्रा उपभोगून अमिताभ जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो कानून चा दुश्मन झालेला असतो. चित्रपटात दोन कथा समांतर रित्या चालू असतात.

रजनीकांतचा लढा हा त्याच्या आई वडिलांच्या मारेकऱ्यांच्या असतो या मारेकऱ्यांमध्ये प्राण, प्रेम चोपडा आणि डॅनी यांच्या भूमिका होत्या. या तिघांना अमर अकबर अँथनी असे नाव सिनेमा दिले होते. त्यांच्या मागावर रजनीकांत असतो आणि त्याच्या मागावर त्याची पोलीस इन्स्पेक्टर बहिण हेमामलिनी असते. रजनीकांत विविध क्लुप्त्या करून आपल्या आई-वडिलांच्या हत्यारांचा खून करतो आणि नामा निराळा राहतो. इकडे अमिताभ बच्चन ज्याला ज्याच्या खुनाच्या खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकले असते त्या खऱ्या गुन्हेगाराला शोधतो आणि या गुन्हेगाराला तो कोर्टात जाऊन जज समोर मारून टाकतो! आणि त्यावेळेला त्याचा युक्तिवाद असा असतो. “याच व्यक्तीच्या खुनासाठी तुम्ही मला 14 वर्षाची शिक्षा दिली होती. आता तुम्ही मला काही शिक्षा देऊ शकत नाही. कारण आपल्या न्यायव्यवस्थेत असे कुठलेही प्रविधान नाही की, एकाच व्यक्तीच्या खूनासाठी दोनदा शिक्षा होते.” त्याचा हा फिल्मी युक्तिवाद सिनेमा चालवून गेला. प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या पण अलाहाबाद हायकोर्टाने चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकाला नोटीस पाठवून ,”तुम्ही कोर्टामध्ये जज समोर खुलेआम खून कसा काय दाखवता?” असा प्रश्न विचारून चित्रपटावर बंदी आणण्याचा विचार सुरू केला. त्यावेळेला निर्मात्याने अशा प्रकारच्या दोन हत्या नुकत्याच भारताच्या काही भागात झालेल्या आहेत असे पुरावे व्या निशी सिद्ध केले. त्यामुळे कोर्टाला झक्कत परवानगी द्यावी लागेली.
8 एप्रिल 1993 या दिवशी ‘अंधा कानून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशात हा सुपर डुपर हिट झाला. भले हा सिनेमा रजनीकांतला बॉलीवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी त्याचा पहिला हिंदी सिनेमा असला तरी लोक अजूनही हा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट समजतात. अमिताभ बच्चन यांचा या चित्रपटातील स्पेशल ऍपींअरन्स जबरदस्त गाजला. उत्तरेच्या राज्यात तर रजनीकांतचा पोस्टर फोटो अतिशय छोटा होता. पोस्टर वर प्रामुख्याने दिसत होता तो अमिताभ बच्चन. अर्थात रजनीकांत याला याचे काही वाटले नाही. कारण अमिताभ बच्चन यांच्या गाजलेले हिंदी सिनेमाचे जसे ‘दिवार’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘डॉन’ या चित्रपटाचे तमिळमध्ये रीमेक त्याने केले होते आणि याच चित्रपटामुळे तो सुपरस्टार झाला होता!
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
हेमामालिनीचा हा कदाचित पहिला चित्रपट असावा ज्यामध्ये तिला भूमिका तर मोठी आहे पण तिची इमेज रोमँटिक नाही आणि तिला या चित्रपटात नायक देखील नाही. प्राण याने या चित्रपटात जवळपास दहा वर्षानंतर पुन्हा एकदा खलनायक रंगवला होता. डॅनी आणि अमिताभ बच्चन यांचा एकत्रित हा पहिला सिनेमा होता पण या दोघांचा एकही शॉट या सिनेमात नव्हता. तसेच प्राण खलनायक असलेल्या चित्रपटात अमिताभ पहिल्यांदाच काम करत होता पण या दोघांचाही या चित्रपटात एकत्रित एकही शॉट नाही अमिताभ सोबत जेवढे चित्रपट प्राणी केले त्यात त्याने खलनायक रंगवलेला नव्हता. 1983 सालच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ‘अंधा कानून’ पाचव्या नंबर वर होता. ‘कुली’ हा सिनेमा टॉपवर होता. ‘बेताब’, ‘हिरो’ आणि ‘हिम्मतवाला’ नंतर ‘अंधा कानून’ होता.