
Rajinikanth यांच्या डाय हॉर्ट फॅन्सचे भन्नाट किस्से; कुणी स्वत:ला जीवंत जाळलं, तर कुणी विष प्राशन केलं…
सुपरस्टार तसे बरेच आहेत आणि होऊन गेले पण थलायवा रजनीकांत यांचं स्थान कुणीच घेऊ शकत नाही हे खरं… आज १२ डिसेंबर रजनीकांत (Rajinikanth) यांचा ७५वा वाढदिवस… केवळ साऊथच नाही तर परदेशातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या रजनीकांत यांचा अभिनय प्रवास तर आपण जाणतोच… पण आज आपण त्यांच्या डाय हॉर्ट फॅन्सचे भन्नाट किस्से जाणून घेऊयात…

तर, रजनीकांत यांचा ‘राणा’ हा चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झाला होता.. पण या चित्रपटाच्या शुटींगवेळी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं… काही दिवसांनी प्रकृती ठिक झाल्यानंतर त्यांनी पु्न्हा शुटींगला सुरुवात केली, पण परत श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना अॅडमिट केलं गेलं… मग समजलं की रजनीकांत यांची किडनी निकामी झाली असून किडनी ट्रान्सप्लॅन्टची गरज होती… हे ऐकताच त्यांच्या चाहत्यांनी देवपूजा करायसा सुरुवात केली… तर दुसरीकडे रजनीराजा अरोकिसामी नावाच्या ४० वर्षीय चाहत्याने त्यांना किडनी दान करता यावी यासाठी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोज घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. का? तर, मृत्यूनंतर रजनीकांत यांना आपली किडनी द्यावी, अशी चाहत्याची इच्छा होती. पण सुदैवाने त्या चाहत्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले होते.

रजनीसरांच्या चाहत्याचा आणखी एक किस्सा.. २०१६ मध्ये त्यांचा ‘कबाली’ चित्रपट रिलीज झाला होता… भारतात तर थिएटर्स हाऊसफुल्ल होतेच पण परदेशातही या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता… रजनीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाची फर्स्ट डे फर्स्ट शो तिकीट मिळवण्यासाठी आजही चाहते उस्तुक असतात.. तर असंच ‘कबाली’ चित्रपटावेळी झालं होतं… मलेशियामध्ये एका चाहत्याला कबालीचं तिकिट न मिळाल्यामुळे त्याने चक्क दु:खी होत मॉलच्या वरच्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती… आता साहजिकच रजनीकांत यांच्यावरील हे प्रेमच होतं पण दुर्दैवाने चाहत्याचा जीव गेला होता…
आजही साऊथमध्ये देव्हाऱ्यात देवांसोबतच रजनीकांत यांच्या फोटोचीही पूजा केली जाते… तर, असंच देवाप्रमाणे रजनीसरांना पुजणाऱ्या एका चाहत्याची त्यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी इच्छा होती. आणि ही आपली इच्छा रजनीकांत यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने त्यांच्या घराबाहेर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता, सुदैवाने या हानीत त्याचा जीव वाचला होता…

रजनीकांत यांच्या आणखी एका चाहत्याने तर कहरच केला होता… २०१७ मध्ये रजनीसर त्यांच्या वाढदिवसाच्यादिवशी राजकारणात प्रवेश करतील असं लोकांना वाटत होतं.. परंतु, एका अर्जंट कामामुळे थलायवांना चेन्नईतून बाहेर जावं लागलं होतं… वाढदिवसाच्या दिवशी शहरात रजनीकांत गैरहजर असल्यामुळे त्यांच्या एका चाहत्याने चक्क विष पीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता… तर, आणखी एका चाहत्याने आपल्या पत्नीचे सगळे दागिने विकून रजनीसरांच्या वाढदिवसाला लोकांना जंगी पार्टी दिली होती… आणि विशेष म्हणजे हा किस्सा लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर रजनीकांत यांच्या एका माहितीपटात त्या चाहत्याला स्थान मिळालं होतं…
================================
हे देखील वाचा : फडावरची लावणी फेमस करणाऱ्या लावणीसम्राज्ञी Sulochana Chavan!
================================
१५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये झळकलेल्या रजनीकांत यांना मेलेलं दाखवण्यात आजही निर्माते आणि दिग्दर्शक घाबरतात… त्यांच्या चित्रपटाचं तिकीट मिळालं नाही किंवा एखाद्या कार्यक्रमाला त्यांची झलक दिसली नाही म्हणून त्यांचे चाहते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात… जर का चुकुन रजनीकांत यांचा शेवट एखाद्या चित्रपटात दुर्दैवी दखवला तर लोकं हाहाकार माजवतील हे सत्यच आहे… ५० वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाचं गारुड घालणाऱ्या रजनीकांत यांना ७५व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!लवकरच, रजनीकांत ‘जेलर २’, ‘थलायवर १७३’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi