‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Rajinikanth यांच्या ‘त्या’ फोटोमागचं रहस्य!
दाक्षिणात्य कलाकारांची अध्यात्मिकता त्यांच्या प्रत्येक चित्रपटात दिसून येते… चित्रपटाची कथा हॉरर, कॉमेडी, रोमॅंटिक किंवा अन्य कुठल्याही पठडीतील असली तरी साऊथचे मेकर्स त्यांची संस्कृती, त्यांचे देव हे सारं काही चित्रपटांमध्ये दाखवतातच… अशातच सध्या सुपरस्टार रजनीकांत यांचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय… एकामागून एक सुपरहिट चित्रपट देणारे रजनीकांत (Rajinikanth) अगदी साध्या वेशात रस्त्याच्या कडेला जेवताना या फोटोमध्ये दिसत आहेत… आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत रजनीकांत दरवेळेप्रमाणे यंदाही त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला निघाले आहेत… जाणून घेऊयात याबद्दल… (Spiritual Journey of Rajinikanth)

तर, नुकतीच रजनीकांत यांनी अभिनयात ५० वर्षांची कारकिर्द पुर्ण केली… त्यांचा कुली चित्रपट रिलीज झाला आणि जगभरात चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली… आता वळूयात रजनीकांत यांच्या या आध्यात्मिक प्रवासाकडे… सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दुसऱ्या एका फोटोत रजनीकांत साध्या पांढऱ्या वस्त्रांमध्ये दिसत आहेत. रजनीकांत यांनी नुकतीच ऋषिकेश इथल्या प्रसिद्ध स्वामी दयानंद आश्रमाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्वामी दयानंद यांना आदरांजली वाहिली. ही भेट त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग असून या प्रवासादरम्यान त्यांनी गंगा नदीच्या पवित्र काठी काही काळ शांतपणे ध्यान करत गंगा आरतीमध्येही सहभाग घेतला होता… (Rajinikanth visit to Himalaya)
रजनीकांत जितक्या आत्मियतेने चित्रपट आणि प्रत्येक भूमिका साकारतात; अगदी तितक्याच भक्ती, भावनेने ते आपली संस्कृती जपतात… परमहंस योगनंदा हे रजनीकांत यांचे अध्यात्मिक गुरु असून गेली अनेक वर्ष ते क्रिया योगा आणि त्यांच्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली आपली अध्यात्मिकता जपत आहेत… तसेच, बरीच वर्ष नित्यनियमाने रजनीकांत झारखंडमधील रांची येथील YSS आश्रमाला भेट देतात… याव्यतिरिक्त रजनीकांत आपल्या चित्रपटांच्या व्यस्त स्केड्युलमधून वेळ काढून हिमालयात अध्यात्मिक सहल करत असतात… तसेच, परमहंस योगनंदा यांच्यासोबतच रजनीकांत महावतार बाबाजी यांचे देखील फॉलोवर असून हिमालयातील पांडवखोली गुहेला देखील ते भेट देतात; त्यांची अशी धारणा आहे की महावतार बाबाजी तिथे राहात होते… (Tollywood news)

एकीकडे अॅक्शन आणि भन्नाट डायलॉगबाजी करणाऱ्या रजनीकांत यांचे जगभरात करोडो चाहते आहेत… तर, दुसरीकडे अतिशय साधी राहणीमान असणाऱ्या रजनीकांत यांचं त्यांच्या संस्कृती आणि देवांवर नितात प्रेम आणि भक्ती आहे… खरंतर, साऊथ फिल्म्स किंवा साऊथ कलाकार म्हटलं की उत्कृष्ट चित्रपटांसोबतच त्यांच्या अध्यात्मिकतेचा उल्लेख केलाच पाहिजे… केवळ रजनीकांतच नाही तर नयनतारा, अजिथ कुमार, धनुष, समंथा रुथ प्रभू, आर माधवन, काजल अग्रवाल, अनुष्का शेट्टी असे बरेच कलाकार आहेत… (south Indian actors who follow spirituality)
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !
=================================
दरम्यान, रजनीकांत यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा पॅन इंडिया चित्रपट ‘कुली’ (Coolie movie) १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झाला होता… या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २८५.०१ कोटींची कमाई केली आहे… लवकरच रजनीकांत यांचा ‘जेलर २’ (Jailer 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… २०२३ मध्ये आलेल्या ‘जेलर’ चित्रपटाचा हा सीक्वेल असून पुन्हा एकदा थलायवा रजनीकांत प्रेक्षकांना आपल्या जाळात ओढण्यास सज्ज होणार आहेत… (Rajinikanth movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi