डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

“शतजन्म मिळाले तरी रजनीकांत म्हणूनच…”; IFFIत Rajinikanth यांच्या वक्तव्याने रसिकांचं लक्ष वेधलं
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची पन्नाशी पुर्ण केली… आझही वयाची सत्तरी पार करुनही रजनीकांत तरुण कलाकारांना लाजवेल अशा भूमिका आणि स्टंट्स करताना दिसतात… नुकत्याच संपन्न झालेल्या ५६व्या इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2025) रजनीकांत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.. यावेळी “शतजन्म मिळाले तरी अभिनेता रजनीकांत म्हणूनच जन्माला येईन. माझ्या कारकीर्दीला ५० वर्षे झाली, पण अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट वाटते. काळ किती वेगाने पुढे सरकतो”, अशा शब्दांत आपल्या भावना रजनीकांत यांनी व्यक्त केल्या… (Rajinikanth News)

दरम्यान, २० ते २८ नोव्हेंबर २०२५ या काळात संपन्न झालेल्या इफ्फी महोत्सवात जगभरातील चित्रपटांचे स्क्रिनिंग पार पडले… या शिवाय नव्या दमाच्या मेकर्सना आपली कला सादर करण्यासाठी मोठं व्यासपीठही या निमित्ताने मिळालं.. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुरस्कार सोहळा संपन्न झाला.. यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानाचा पुरस्कार व्हिएतनामी चित्रपट ‘स्किन ऑफ यूथ’ने पटकावला, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांना देण्यात आला. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सुवर्णमहोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा खास सत्कार देखील केला गेला…
================================
हे देखील वाचा : Dhanush आणि ऐश्वर्या रजनीकांतची ‘अशी’ होती लव्हस्टोरी!
================================
दरम्यान, रजनीकांत यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर नुकताच त्यांचा कुली हा चित्रपट आला होता… आणि आता लवकरच Jailer 2 मध्ये ते दिसणार आहेत.. तसेच, ‘थलायवर १७१’ हा लोकेश कनगराजसोबत त्यांचा आगामी चित्रपट येणार असून कमल हासन (Kamal Hasan) यांचायासोबतही पुन्हा ते स्क्रिन शेअर करणार असल्याचं सांगितलं जात आहे… (Rajinikanth Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi