Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Manik Moti Marathi Book: गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्री. शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती’ चरित्र

Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची

War 2 : ह्रतिक रोशनचा चित्रपट रिलीजआधीच कमावणार १२० कोटी?

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र

Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”;

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे

‘ना थमेगा कभी, ना मुड़ेगा कभी…’ अखेर १९ दिवसानंतर Amitabh

‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

रुही… राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा हॉररपट…

 रुही… राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा हॉररपट…
मनोरंजन ए नया दौर मिक्स मसाला

रुही… राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा हॉररपट…

by सई बने 18/02/2021

स्त्री या कॉमेडी आणि हॉरर चित्रपटात हिट झालेला राजकुमार राव आता रुही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला रुही, ११ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.

रुही चित्रपटाची निर्मिती जियो स्टुडीओ आणि दिनेश विजन यांच्या मैडॉक फिल्म सोबत मृगदीप सिंह लाम्बा यांनी केली आहे. दिनेश विजन यांनीच स्त्री या चित्रपटाची निर्मिती केली होती. एक आत्मा आणि त्याचे लग्न हा रुही चित्रपटाचा धागा आहे. हार्दिक मेहता यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची केमिस्ट्री या चित्रपटात चांगलीच जमल्याची चर्चा आहे.

हे देखील वाचा: टायगरच्या ‘गणपत’ मध्ये ही अभिनेत्री बनणार हिरोईन..

रुही (Roohi) चित्रपट ११ मार्चला महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. त्यादरम्यान येणा-या सुट्टयांमुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान रुही चित्रपटाच्या नावावरुन प्रथम थोडा वाद झाला होता. या चित्रपटाचे नाव रुही आफजा होते… मात्र आता फक्त रुही या नावानं चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल.

Roohi – Rajkummar Rao, Janhvi Kapoor & Varun Sharma

लॉकडाऊन आणि कोरोनाचा फटका या चित्रपटाला बसला. रुही २०१९ च्या जूनमध्ये प्रदर्शित होणार होता. पण मोठा पडदा बंद झाल्यानं चित्रपटाचं प्रदर्शन रखडलं. हॉरर – कॉमेडी स्वरुपाच्या रुहीचे प्रदर्शन ओटीटी माध्यमावर करायला निर्मांत्यांचा विरोध होता. त्यामुळेच आता सर्व परिस्थिती सुधारत असल्यानं मोठ्या पडदयावर रुहीचे प्रदर्शन करण्यात येईल.

रुहीमध्ये राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि जान्हवी (Janhvi Kapoor) सोबत वरुण शर्मा (Varun Sharma), पंकज त्रिपाठी, एलेक्स ओनेल, सीमा पाहवा, आमना शरीफ, रोनीत रॉय यांच्या भूमिका आहेत. धडक या चित्रपटानंतर जान्हवी कपूरचा मोठ्या पडद्यावर येणार रुही हा दुसरा चित्रपट आहे. ओटीटी माध्यमावर जान्हवीचा ‘गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला ओटीटीवर संमिश्र यश मिळालं. त्यामुळं जान्हवीनंही रुही चित्रपट ओटीटी ऐवजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा आग्रह केल्याचे बोलले जाते.

Roohi – Official Trailer | Rajkummar Janhvi Varun |

यात जान्हवीचा लूक भीतीदायक असणार आहे. राजकुमार राव आणि वरुण शर्मा हे दोघेही तिच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक असलेले तरुण दाखवण्यात आले आहेत. रुहीचा टीझर आणि ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. यात जान्हवी कपूरनं साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होत आहे. तर राजकुमार रावचा अभिनय नेहमीसारखाच सहजसुंदर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ट्रेलर रिलीज झाल्यावर त्याला काही क्षणातच लाखो लाईक मिळाले आहेत. अर्थात चित्रपट बघण्यासाठी मात्र ११ मार्चची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Celebrity News Entertainment Movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.