
Krrish 4 : ह्रतिकच्या ‘क्रिश ४’ मधून राकेश रोशन यांनीच घेतली एक्झिट!
रोमॅंटिक, हॉरर, हॉरर-कॉमेडी, देशभक्ती अशा वेगवेगळ्या कॅटेगरीतील हिंदी चित्रपट गेले अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. याशिवाय, जसं हॉलिवूडकडे त्यांचे स्वत:चे सुपरहिरो आहेत; अगदी त्याचप्रमाणे हिंदीतही ‘क्रिश’च्या रुपात दिग्दर्शक राकेश रोशन यांनी लहान मुलांसाठी एक सुपरहिरो २००६ साली आणला. एकामागून एक या चित्रपटाचे सुपरहिट भाग झाल्यानंतर ‘क्रिश ४’ लवकरच भेटीला येणार आहे. मात्र, या चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती समोर आली असून ‘क्रिश ४’ चं दिग्दर्शन राकेश रोशन करणार नसल्याचं त्यांनी जाहिर केलं आहे. (Bollywood superhero)
‘कोई मिल गया’ या चित्रपटापासून खरं तर ‘क्रिश’ या सुपरहिरोची सुरुवात राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी केली, ह्रतिक रोशनने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. काही महिन्यांपूर्वी ‘क्रिश ४’ येणार असं जाहिर केलं होतं पण आता बॉलिवूड हंगामाशी बोलताना राकेश रोशन यांनी ‘क्रिश ४’ चं दिग्दर्शन मी करणार नाही असं म्हटलं आहे. राकेश म्हणाले की, “कधी ना कधी तरी मला जबाबदारी कुणावर तरी सोपवावी लागणार होतीच. आणि मी माझ्याकडून जरी चित्रपटाचं काम थांबवलं असलं तरी इतर कुणीतरी याची जबाबदारी घेईलच. आणि मी ‘क्रिश ४’ (Krrish 4) चं दिग्दर्शन करत नसलो तरी मला त्याबद्दल वाईट वाटत नाहीये. कारण कधीतरी बदल हा गरजेचा असतो”. (Bollywood masala)

पुढे राकेश रोशन (Rakesh Roshan) म्हणाले की, “जर का उद्या मी राकेश रोशनने क्रिश ४ जरी दिग्दर्शित केला तरी तो हिट होईलच अशी शाश्वती देता येणार नाही”. दरम्यान, ‘क्रिश ४’ काही कारणांमुळे गेला काही काळ रखडला आहे. त्याचं कारण एका मुलाखतीत सांगताना राकेश म्हणाले होते की, क्रिश ४ बजेटच्या अडचणींमुळे अडकला आहे. हा एक बिग बजेट चित्रपट आहे आणि जर का आम्ही बजेट कमी केलं तर त्याचा परिणाम हा कथेवर होईल आणि सध्या मी कथेच्या बाबतीत कॉम्प्रोमाईज करु शकत नाही. ज्यावेळी उत्तम बजेट ठरेल तेव्हाच चित्रपटाचं काम सुरु होईल”.
===========================
हे देखील वाचा: संगीतकार रोशन यांना आत्मविश्वास दिला होता अनिल विश्वास यांनी!
===========================
महत्वाचं म्हणजे ‘क्रिश’ हा चित्रपट राकेश रोशन यांच्या दिग्दर्शनाशिवाय कल्पना करणं तसं कठिण आहे. त्यामुळे निर्माते सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांनी ‘क्रिश ४’ चित्रपटातून माघार घेतल्यानंतर आता राकेश रोशन क्रिश ४ चे दिग्दर्शन करणार नाही ही बाब चाहत्यांना नक्कीच अडचणीत टाकणारी आहे. आता ‘क्रिश ४’ (Krrish 4) चित्रपट नेमका कधी येणार? दिग्दर्शक कोण असणार याची माहिती लवकरच यावी अशी अपेक्षा आहे. (Entertainment gossip)

क्रिशबद्दल बोलायचं झालं तर, २००६ मध्ये क्रिश फ्रॅंचाईजीतील पहिला भाग आला होता. ज्यात ह्रतिक रोशनने (Hrithik Roshan) क्रिश्ना मेहरा आणि सायंटिस्ट डॉ. रोहित मेहरा अशी दुहेरी भूमिका साकारली होती. यात त्याच्यासोबत प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) झळकली होती. खरं तर, ‘क्रिश’चा पाया २००३ मध्ये आलेल्या ‘कोई मिल गया’ (Koi Mail Gaya) या चित्रपटापासून रचला गेला होता. ज्यात जादू हे एलियन कॅरेक्टर दाखवलं होतं. ३५ कोंटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘कोई मिल गया’ चित्रपटाने ४७.१९ कोटी कमावले होते. त्यानंतर ‘क्रिशच्’या तीनही भागांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करत तुफान प्रतिसाद मिळवला होता. लहान मुलांसाठी हॉलिवूडच्या सुपरहिरोनंतर ‘क्रिश’ (Krrish 4) हा आवडता सुपरहिरो झाला होता. (Bollywood trending news)