Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट

“Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान चर्चेत
ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कधी काय बोलेल आणि कधी कुणाला टार्गेट करेल याचा काही नेम नाही. बऱ्याचवेळा राखी तिच्या वक्तव्यांमुळे वादात अडकते. आता तर राखीने कहर केला आहे. अमिताभ बच्चन आणि रेखा ही बॉलिवूडमधली गाजलेली जोडी. त्यांचं खास नातं चांगलंच चर्चेत होतं आणि आजही आहेच. राखीने आता थेट बिग बी, रेखा आणि जया बच्चन यांना टार्गेट केलं आहे. आजवर त्यांच्याबद्दल असं बोलण्यास कुणीच धजावलं नाही पण राखीने भलतंच विधान केलं आहे. नेमकं ती काय म्हणाली जाणून घेऊयात…
राखी सावंतने अलीकडेच एका व्हायरल व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्यावर वादग्रस्त विधानं केली आहे. तिने अमिताभ बच्चन यांना रेखासोबत लग्न करण्याचा सल्ला दिला असून जया बच्चन यांच्या ड्रेसिंग सेन्सची देखील थट्टा केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी राखीला ट्रोल केलं आहे. ‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली की, “अमितजी, तुम्ही रेखाजींना स्वीकारा. आता तर दोन पत्नींचा काळ चालू आहे, असं राखीने म्हटलं आहे. “अमितजी, आप रेखा जी को अपना ले. अभी तो वैसे भी दो-दो बीवियों का ऐसा भी समय चल रहा है”… (Amitabh Bachchan & Rekha)

इतकंच नाही तर, राखीने अमिताभ आणि रेखा यांना ‘राजा-राणी’ म्हणून संबोधले आणि जया बच्चन या ‘मोलकरणी’ सारख्या दिसतात असे म्हणाली आहे. अमिताभजी, जया यांना सोडून द्या, रेखासोबत राहा असा वादग्रस्त सल्लाही राखीने दिला आहे. “जया यांना सोडा आणि रेखा यांना पकडा आणि उरलेलं आयुष्य त्यांच्यासोबत घालवा,” असा सल्ला राखीने दिला आहे.

काही महिन्यांपूर्वी जया बच्चन यांनी पॅपराझांच्या फॅशनवर टीका केली होती. आता राखीने थेट जया यांच्यात फॅशनवर टीका केली आहे. “जया बच्चन या चांगले कपडे परिधान करत नाहीत. त्यांनी मला वाढदिवसाला बोलावलं तरी मी त्यांना एक छान सूट भेट देईन. जरा केस रंगवा असा सल्ला देतानाच राखीने अमिताभ तुमचे पती आहेत हे विसरु नका. “जया जी तो ढंग का सलवार-कमीज भी नहीं पहनती, इतनी करोड़पति-अरबपति होने के बावजूद. जया जी, आप मुझे अपने बर्थडे पे बुलाए, मैं आपको अच्छा सूट गिफ्ट करूंगी. आप बालों को कलर कीजिए, बॉटॉक्स कीजिए. आपके हसबैंड अमिताभ बच्चन हैं,” असं राखीने म्हटलं आहे. (Jaya Bachchan)
================================
हे देखील वाचा : Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!
================================
इतक्यावरच राखी थांबली नाही आहे. तिने असं म्हटलं आहे की, “अमिताभ यांनी जया बच्चन यांनी निवड का केली? मला हेच समजत नाही. त्यांनी रेखांची निवड का केली नाही? मला कोणी अमिताभ यांच्यासाठी जया किंवा रेखा यांच्यामधून एखादीला निवडण्यास सांगितल्यास मी रेखांना निवडेल,” असं राखी म्हणाली आहे. आता जया बच्चन आपल्या अनोख्या शैलीत राखीला उत्तर देणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi