‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
४१ दिवसांचे कठीण अनुष्ठान घेतलेल्या रामचरणचा हटके अंदाज, जाणून घ्या त्याच्या या रूपाचे रहस्य
नेहमीच आपल्याला कलाकार अतिशय मॉडर्न विचारांच्या जगात राहत असल्याने ते मॉडर्न आणि आधुनिक विचारांचे असल्याचे वाटत असते. मात्र अनेकदा याच कलाकारांचे एक वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळते.
कलाकारांची देवावर असणारी श्रद्धा आणि निष्ठा अनेकदा त्यांचं विविध कृतीत झळकत असते. आपण कितीही आधुनिक विचारांचे झालो, किती मोठे कर्तृत्व गाजवले तरी देवापुढे सामान असल्याचे ते नेहमीच सांगत असतात. कलाकार आणि त्यांचे देवावरील प्रेम अनेकदा आपल्याला दिसून येते. दाक्षिणात्य सुपरस्टार असलेला रामचरण (Ram Charan) नुकताच मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला तेव्हा त्याचे वेगळेच रूप पाहायला मिळाले.
सध्या आरआरआर सिनेमामुळे तुफान चर्चेत आलेला रामचरण नुकताच त्याचा सिनेमा बघण्यासाठी मुंबईच्या गेयटी चित्रपटगृहात पोहचला होता. यावेळी त्याच्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रामचरण (Ram Charan) जेव्हा त्याच्या फॅन्ससोबत चित्रपटगृहांमध्ये पोहचला तेव्हा त्याच्या वेषभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रामचरणने काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता, तर त्याच्या हातात भगव्या रंगाचा कापड आणि गळ्यात रुद्राक्षची माळ घातलेली होती. रामचरण (Ram Charan) अयप्पा स्वामींचा मोठा भक्त आहे. आणि तो मागील अनेक वर्षांपासून ‘माळे’सोबत मंदिरात जात असतो. याला ‘अयप्पा माळा’ म्हटले जाते.
अयप्पा माळा धारण करणे ही एक साधना आहे. या काळात भक्तांना काळे कपडे घालावे लागतात. छोट्या रुद्राक्षांची माळा घालावी लागते. साधना पूर्ण होईपर्यंत चप्पल न घालता सगळीकडे जावे लागते. ही साधना तब्ब्ल ४१ दिवसांची असते आणि या काळात भक्त केवळ आणि केवळ शाकाहारी भोजन घेतात.
साधना पूर्ण झाल्यानंतर केरळस्थित शबरीमाला मंदिरात जाऊन अयप्पा स्वामींचे दर्शन घेऊन या अनुष्ठानाची समाप्ती केली जाते. प्राप्त माहितीनुसार रामचरण (Ram Charan) वयाच्या २० व्या वर्षापासूनच हे अनुष्ठान निष्ठापूर्वक करत आहे. तो हे अनुष्ठान वर्षातून दोन वेळा करतो आणि याकाळात कपाळावर चंदन देखील लावतो.
रामचरणला आपल्यामध्ये पाहून ‘आरआरआर’ पाहायला आलेले प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आणि त्या गेयटी चित्रपटगृहाबाहेर हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली. लोकं त्याच्या पायावर पाय देत असूनही तो हसताना दिसला.
तत्पूर्वी रामचरणचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला आरआरआर हा सिनेमा तुफान कमाई करत गर्दी खेचताना दिसत आहे. सध्या या सिनेमाने ९०० कोटींची कमाई केली असून, नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी देखील संपन्न झाली. आरआरआरच्या यशामुळे खुश झालेल्या रामचरणने सिनेमाच्या वेगवेगळ्या विभागातील लोकांना सोन्याची नाणी गिफ्ट केली आहे.