प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

उर्मिला सोबतच्या अफेरबद्दल Ram Gopal Varma यांनी सोडलं मौन; म्हणाले, “तिचं सौंदर्य टिपण्यासाठीच….
बॉलिवूडमध्ये कोणाचं सुत कधी कुणाशी जुळेल याचा अंदाज लावता येत नाही… आजवर इंडस्ट्रीत बऱ्याच कलाकारांच्या अफेर्सच्या चर्चा रंगल्या… काही जणांची या अफेअर्समधून सक्सेलफुल लग्न झाली तर काहींची झालेली लग्न मोडली देखील… त्यातलंच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांचं अफेअर… एकेकाळी त्या दोघांची चित्रपटसृष्टीत अभिनेत्री-दिग्दर्शक म्हणून जोडी हिट होती… पण आता बऱ्याच वर्षांनी राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अफेअरबद्दल मौन सोडलं आहे… काय म्हणाले आहेत राम गोपाल वर्मा जाणून घेऊयात…
राम गोपाल वर्मा यांनी बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले… जितकी चर्चा त्यांच्या चित्रपटांची झाली तितकीच उर्मिला सोबतच्या अफेअरचीही झालीच… परंतु, दोघांनी कायमच या अफवा फेटाळून लावल्या. आता, झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा एकदा उर्मिलासोबतच्या त्यांच्या अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ‘मला वाटतं की, ती सर्वात चांगली अभिनेत्री आहे, म्हणूनच मी तिच्यासोबत इतक्या चित्रपटांमध्ये काम केलंय. मी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतही खूप काम केलंय, पण कोणीही त्याबद्दल बोलत नाही. पण सोशल मीडियावर फक्त आमच्याबद्दल बोलणं आणि अफवा पसरवणं हेच आहे. सोशल मीडिया असंच काम करतं”… आता यावर उर्मिला काही बोलणार का याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे…

आता जरा भूतकाळात जाऊयात… उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) लहान नवयातच अभिनय करण्यास सुरुवात केली होती. ‘मासूम’ (Masoom) या चित्रपटात पिंकीची भूमिका साकारणारी उर्मिला बॉलिवूडमध्ये लीड नायिका म्हणून आली आणि तिने आपल्या अभिनय-सौंदर्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्धच केलं…. पुढे १९९१ मध्ये ‘नरसिंहा’ चित्रपटातून प्रमुख अभिनेत्री म्हणून तिने कामाला सुरुवात केली… बऱ्याच दिग्दर्शकांसोबत काम करत असताना तिची जोडी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत विशेष जमली…
१९९० आणि २००० च्या काळात राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकरसोबत अनेक हिट चित्रपट केले. यामध्ये ‘रंगीला’, ‘दौर’, ‘सत्या’, आणि ‘प्यार तूने क्या किया’ या चित्रपटांचा उल्लेख केलाच पाहिजे… हळूहळू बीटाऊनमध्ये उर्मिला आणि रामगोपाल वर्मा यांच्या अफेअरची खूप चर्चा सुरु झाली… त्यावेळी असेही गॉसिप्स केले गेले की, रामू त्यांच्या चित्रपटात केवळ उर्मिलालाच कास्ट करत होते… एका चित्रपटात तर उर्मिलासाठी राम गोपाल वर्मांनी माधुरी दीक्षितलाही चित्रपटातून काढून टाकलं होतं… (Urmila Matondkar Affair with Ram Gopal Varma)
एका मुलाखतीत राम गोपाल वर्मांना उर्मिलाबद्दल विचारलं असता ते म्हणाले होते की, “होय, मी उर्मिलाच्या सौंदर्यात रंगून गेलो होते. केवळ उर्मिलाचे सौंदर्य कॅमेऱ्याद्वारे टिपण्यासाठीच मी ‘रंगीला’ (Rangeela) बनविला होता असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. आतापर्यंत मी काम केलेल्या अभिनेत्रींमध्ये उर्मिला सर्वात सुंदर अभिनेत्री आहे आणि कायम राहील.”

उर्मिलाने तिच्या अभिनय कारकिर्दित बरेच उत्तम चित्रपट दिले… जितकी ताकदीची ती अभिनेत्री आहे तितकीच सुंदर ती डान्सरही आहे… पण इंस्ट्रीत तिच्या अभिनयापेक्षा लूक्सबद्दल फारसं बोललं गेलं होतं… याबद्दल एकदा मुलाखतीत बोलताना उर्मिंला म्हणाली होती की, “इंडस्ट्रीत कायम एक आयटम गर्ल किंवा सेक्स सायरन म्हणून माझ्याकडे बघितलं जायचं. मी आऊटसाईडर होते आणि याचे परिणाम मला भोगावे लागले. नेपोटिझममुळेच माझं करिअर बर्बाद झालं. राम गोपाल वर्मांसोबत माझं कोणतंही भांडण नाही. मी त्यांच्या ‘कंपनी’,’राम गोपाल वर्मा की आग’ या चित्रपटांमध्ये स्पेशल गाणीही केली आहेत”… यावरुन दोघांनी एकमेकांबद्दल कधीच वाईट म्हटलं नाही हे जरी लक्षात आलं असलं तरी अफेअर्सबद्दल बोलणंही टाळलं हे स्पष्ट होतंच… (Bollywood News)
================================
================================
उर्मिला मातोंडकर गेल्या बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे… २०१४ मध्ये ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात ती दिसली होती… या व्यतिरिक्त ब्लॅकमेल या २०१८ मध्ये आलेल्या चित्रपटात तिने स्पेशल अपिअरन्स दिला होता.. परंतु, लीड रोल तिने बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये साकारला नाही आहे… तर, राम गोपाल वर्मा यांच्या कामाबद्दल बोलायचं तर सध्या ते त्यांच्या ‘भूत इन द पोलिस स्टेशन’ (Bhoot In Police Station) या आगामी चित्रपटाची तयारी करत आहेत. हा एक हॉरर-कॉमेडी ड्रामा असून २७ वर्षांनी पुन्हा रामू मनोज बाजपेयींसोबत काम करणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi