Abhijeet Sawant : जुन्या गाण्याला नवा साज;अभिजीत चाहत्यांना देणार सरप्राईज

Ramayan : रणबीर आणि साई पल्लवीच्या ‘रामायण’ची झलक कुठे पाहता येणार?
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरुन कलाकारांचे प्रभू श्री राम आणि सीता मातेच्या वेशातील फोटो देखील तुफान व्हायरल झाले होते. आता नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटाची पहिली झलक नेमकी कधी दिसणार याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. (Bollywood)
‘रामायण’ (Ramayan) चित्रपट हा बॉलिवूडमधील मेगा बजेट असणारा चित्रपट असून दोन भागांमध्ये चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, या चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांना कधी पाहता येईल हे निर्मात्यांनी सांगितले आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाची झलक २०२५ च्या वेव्हज समिटमध्ये दाखवली जाणार आहे. तसेच, ‘रामायण’चा पहिला भाग दिवाळी २०२६ ला आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ ला प्रदर्शित होणार अशी माहिती देण्यात आली आहे. (Ramayan Movie release date)

केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने १ ते ४ मे २०२५ या दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ (वेव्हज २०२५) या कार्यक्रमाचे आयोजन केले असून काही चित्रपटाचे चित्रीकरणही अनेक दिवसांपासून सुरू आहे. बॉलीवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्माते कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आणि याच समिटमध्ये ‘रामायण’ चित्रपटाची झलक दिसणार आहे. (Entertainment news update)
===============================
हे देखील वाचा: Ramayan : साई पल्लवीचे सीता मातेच्या गेटअपमधील फोटो आले समोर!
===============================
दरम्यान, ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता माता, रवी दुबे लक्ष्मण, यश रावण आणि सनी देओल (Sunny Deol) हनुमान, लारा दत्ता कैकयी या भूमिकांमध्ये हे कलाकार दिसणार आहेत. याव्यतिरिक्त चित्रपटात अजून कोणते कलाकार असणार याबद्दल माहिती देण्यात आली नाही आहे. (Ramayan Movie cast)