Kalam : मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार ‘मिसाईल मॅन’चं जीवनचरित्र!

Ramayan : रणबीर कपूर आणि यश स्क्रिन शेअर करणार नाहीत; चित्रपटात मोठा ट्विस्ट
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी (Sai Pallavi) दिसणार आहे. चित्रपटात रावणाची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार यश करणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या रामायण चित्रपटात खरं तर एक मोठा ट्विस्ट आला आहे. (Ramayan movie)
मिळालेल्या माहितीनुसार, ‘रामायण’ चित्रपटातील दोन सुपरस्टार्स म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि यश (Yash) चित्रपटात जरी एकत्र असले तरी ते स्क्रिन शेअर करणार नाही आहेत. वाल्मिकींच्या लिखाणातील रामायण चित्रपटात मांडण्याचा टीमने निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुळ कथा पाहिल्यास प्रभू श्री राम आणि रावण केवळ शेवटच्या युद्धातच समोरा-समोर आले होते; त्याव्यतिरिक्त त्यांची कथा स्वतंत्रपणे उलगडली जाणार आहे. (Entertainment)

दरम्यान, भव्य सेट, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राफिक्सच्या साहाय्याने एक उत्कृष्ट आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दर्जेदार पौराणिक चित्रपट साकारला जाणार आहे. तसेच, दोन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून एकाचवेळी दोन्ही भागांचे चित्रिकरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Ramayan चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६, आणि दुसरा दिवाळी २०२७ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी माहिती देण्यात आली आहे. (Bollywood tadaka)
================================
हे देखील वाचा: Ramayan : रणबीर आणि साई पल्लवीच्या ‘रामायण’ची झलक कुठे पाहता येणार?
=================================
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘रामायण’च्या निमित्ताने आणखी एक मल्टीस्टारर पौराणिक चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. मुळात रामायण, प्रभू श्री राम, सीता माता, हनुमान हे प्रत्येक भारतीयांसाठी श्रद्धा स्थान आहे. आणि त्यामुळे आपली संस्कृती, परंपरा आणि भावना जपण्याचा प्रयत्न नक्कीच ‘रामायण’ चित्रपटात केला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. (Bollywood update)