
Ranveer Singh To Akshaye Khanna : ‘धुरंधर’साठी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण?
‘धुरंधर’ चित्रपट रेकॉर्ड बनवण्याच्या शर्यतीत फारच पुढे निघून गेला आहे… २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा ‘धुरंधर’ (Dhurandhar Box Office Collection) चित्रपट बनला असून ‘जवान’, ‘पुष्पा’, ‘छावा’ या चित्रपटांचे रेकॉर्ड रणवीर सिंगच्या या चित्रपटाने मोडून काढले आहेत… जगभरात १००० कोटींच्या कमाईकडे वाटचाल करणाऱ्या ‘धुरंधर’ या स्पाय-ॲक्शन-थ्रिलर चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं आहे जाणून घेऊयात… (Ranveer Singh Movies)

आदित्य धर लिखित-दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जून रामपाल, आर, माधवन या ५ अभिनेत्यांच्या प्रमुख भूमिका होत्या… विशेष म्हणजे चित्रपटाचा नायक जरी रणवीर असला तरी सर्वाधिक चर्चा अक्षय खन्नाचीच (Akshaye Khanna) झाली होती… चित्रपटातील त्याचा डान्स, अभिनय सगळं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. तर, टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘गुडरिटर्न्स’च्या वृत्तानुसार रणवीर सिंगने ‘धुरंधर’साठी ३० ते ५० कोटी मानधन घेतलं आहे. तसेच, रेहमान डकैत ही भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाने २.५ कोटीं मानधन घेतलं आहे. इतकंच नाही तर काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार अक्षय खन्ना प्रत्येक चित्रपटासाठी २.५ कोटी इतकं मानधन घेतो असंही सांगितलं जातं. (Entertainment News)

तर, ‘न्यूज १८’ च्या वृत्तानुसार संजय दत्तने (Sanjay Dutt) चित्रपटातील या भूमिकेसाठी १० कोटी मानधन घेतलं असून आयएसआय अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन रामपालने चित्रपटासाठी १ कोटी मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, आर माधवनने (R Madhvan) या चित्रपटात अजय सान्याल ही भूमिका साकारली असून त्याने या चित्रपटासाठी ९ कोटी मानधन मिळाल्याचं समोर येत आहे.
================================
हे देखील वाचा : Dhurandhar च्या वादळाचा मराठी चित्रपटांना फटका बसलाय का?
================================
दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटाला देशभरासह जगभरात उत्तम प्रतिसाद मिळत असून १९ मार्च २०२६ रोजी धुरंधर २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच, २० दिवसांत या चित्रपटाने जगभरात ९०० कोटींचा टप्पा पार केला असून देशात ६०० कोटींपर्यंत ‘धुरंधर’ने कमाई केली आहे…. शिवाय, अक्षय खन्ना याचा ‘छावा’ (Chhaava) नंतर २०२५ मध्येच ५०० कोटींचा टप्पा पार करणारा हा दुसरा चित्रपट असून रणवीर सिंगचा ५०० कोटी पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे… (Bollywood)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi