‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Ravindra Mahajani Death: रविंद्र महाजनी यांचा लेकाबरोबर काम केलेला सिनेमा ठरला शेवटचा सिनेमा !
सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. ते पुण्यातील आंबी गावात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. आणि त्याच फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत आढळले आहेत. रवींद्र महाजनी हे ७७ वर्षांचे होते. या फ्लॅटमध्ये तो अनेकदा राहायला यायचे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना रवींद्र मृतावस्थेत दिसले. दोन ते तीन दिवसांपूर्वी रवींद्र यांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. रवींद्र महाजनी हे १९८४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मुंबईचा फौजदार‘आणि १९९० साली प्रदर्शित झालेला ‘कळत नकळत‘ या चित्रपटांसाठी विशेष ओळखले जातात. त्याचबरोबर ७० च्या दशकातही ते खूप लोकप्रिय होते. सध्या त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी टीव्हीवर चांगलाच लोकप्रिय आहे.(Ravindra Mahajani Death)
रवींद्र महाजनी यांनी मराठी आणि त्याबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केलेले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना म्हणूनही त्यांना संबोधले जायचे. कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि लूक दोन्ही विनोद खन्ना यांच्यासारखेच होते. अभिनयाबरोबरच रवींद्र यांनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. अमिताभ बच्चन स्टारर सात हिंदुस्तानी या चित्रपटात रवींद्र महाजनी यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट होता. यानंतर त्यांनी ‘आराम हरमा है’, ‘दुनिया करी सलाम’ तसेच ‘हळदी कुंकू‘ या मराठी चित्रपटात काम केले. याशिवाय त्यांनी मुंबईचा फौजदार (१९८४), झुंझ (१९८९), कळत नकळत (१९९०) या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा ‘लक्ष्मीची पावले‘ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
रविंद्र महाजनी आणि त्यांचा मुलगा गष्मीर महाजनी या बाप लेकाच्या जोडीनं एका बॉलिवूड सिनेमात सुद्धा एकत्र काम केलं होतं. आणि दुर्दैवाने हा सिनेमा रविंद्र महाजनी यांचा शेवटचा सिनेमा ठरला आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या सिनेमात रविंद्र यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आणि त्याच सिनेमात त्यांचा मुलगा गश्मिर महाजनी याने देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमामुळे या बाप-लेकाच्या जोडीला एकत्र काम करता आलं. आणि प्रेक्षकांना ते पाहता आलं. या सिनेमातील दोघांचाही लूक अप्रतिम असा होता.(Ravindra Mahajani Death)
========================
हे देखील वाचा: स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा ‘सुभेदार’ लवकरच येणार भेटीला
=======================
रविंद्र महाजनी यांच्या मृत्यूने सिनेसृष्टित हळहळ व्यक्त केली जात असून कलविश्वात त्यांच्यासारख्या कलाकाराच्या जाण्याने कधीही भरता न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांनीही ट्वीट करत सोशल मीडियावर रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.