Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish

रणवीरच्या ‘त्या’ नकलेबद्दल Rishabh Shetty ने सोडलं मौन; म्हणाला, ‘दैवतांची अशी नक्कल पाहिली की…’
अभिनेता रणवीर सिंग कायम त्याच्या अतरंगी फॅशन, काही विधान किंवा चित्रपटांमुळे चर्चेत असतोच… असंही काहीसं घडलं होतं काही महिन्यांपूर्वी… ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : द लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter 1) या चित्रपटातील दैवांची नक्कल रणवीरने गोव्यातील इफ्फी सोहळ्यात केली होती… यावरुन त्याला कांच्या ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागला होता… रणवीर सिंगने स्टेजवरच दैवतांची नक्कल केल्यामुळे नवा वाद सुरु झाला होता.. आता यावर कांतारा फेम दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे… चेन्नईमध्ये ‘बिहाइंडवुड्स’च्या एका कार्यक्रमात बोलताना ऋषभने दैवतांची नक्कल करणाऱ्या लोकांबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे… (Rishabh Shetty)
रणवीरने ‘इफ्फी’मध्ये ऋषभने कांतारा चित्रपटाता साकारलेल्या भूमिकेची नक्कल केली होती… महत्वाचं म्हणजे दैव त्याच्या अंगात जेव्हा संचारत त्या सीनची जेव्हा रणवीर नकल करत होता त्यावेळी ऋषभने त्याला तसे न करण्यास सांगितले. विशेष म्हणजे चित्रपटातील चामुंडा देवीच्या सीनबद्दल बोलताना रणवीरने, ‘घोस्ट’ म्हणजेच भूत असाही उल्लेख केलेला. आता याबद्दल ऋषभने रणवीरचं नाव न घेता ऋषभने घडलेल्या प्रकारावर आपलं मत व्यक्त केलं. “’कांतारा’सारखा चित्रपट बनवताना नेहमीच एक धोका असतो. तो म्हणजे, संस्कृती आणि परंपरा केवळ पॉप कल्चरपुरती मर्यादित राहू शकते”, असं ऋषभ म्हणाला. एक चित्रपट निर्माता म्हणून, ऋषभने ‘कांतारा’संदर्भातील सर्व चित्रिकरण अगदी सन्मानपूर्वक केले जाईल याची खात्री करुन घेतच काम केलं. यासाठी त्याने ग्रमीण भागातील अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा केल्याचं तो म्हणाला…. (Ranveer Singh & Kantara Movie Controversy)

पुढे ऋषभ म्हणाला की, “अशा गोष्टी पाहिल्या की मी अस्वस्थ होतो. चित्रपटाचा बराचसा भाग जरी सिनेमा आणि अभिनयाचा असला तरी, दैवतांचा घटक संवेदनशील आणि पवित्र आहे. मी जिथे कुठे जातो, तिथे लोकांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर त्याचे सादरीकरण करू नये किंवा त्याची चेष्टा करू नये. तो आमच्यासाठी भावनिकदृष्ट्या फार संवेदनशील विषय आहे, याची त्यांना जाणीव असायला हवी”…. शेवटी जेव्हा दैवतांची ‘नक्कल किंवा चेष्टा’ केली जाते, तेव्हा आपल्याला वाईट वाटते, असे ऋषभने स्पष्टपणे सांगितले.
================================
हे देखील वाचा : Kantara : The Legend-Chapter 1 मधील ‘तो’ म्हातारा कोण होता?
================================
दरम्यान, रणवीर सिंग याने घडलेल्या प्रकारानंतर सोशल मिडियावरुन सगळ्यांची जाहिर माफी मागितली होती… त्याने म्हटलं होतं की, “माझा उद्देश चित्रपटातील ऋषभच्या अविश्वसनीय अभिनयाला अधोरेखित करण्याचा होता. एक अभिनेता म्हणून, मला माहित आहे की त्याने ज्या प्रकारे तो विशिष्ट सीन केला, तसा करण्यासाठी किती मेहनत लागली असेल, ज्याबद्दल मला त्याचे खूप कौतुक आहे. मी नेहमीच आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि मान्यतांचा मनापासून आदर केला आहे. जर मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो”… (Bollywood)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi