‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Kantara 1 फेम रिषभ शेट्टीने केलं ‘दशावतार’ चित्रपटाचं कौतुक; म्हणाला,“आपल्या मातीतील चित्रपट…”
कितीही रोमॅंटिक, हॉरर, कॉमेडी चित्रपट आले तरी आपल्या मातीशी जुळलेले आणि आपली संस्कृती मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटांचा ऑरा काही वेगळाच अतो… सध्या थिएटरमध्ये दोनच चित्रपटांचा डंका वाजतोय… एक म्हणजे आपल्या मराठी मातीतला ‘दशावतार’ (Dashavatar movie) आणि दुसरा कन्नड संस्कृती आणि तेथील दैवी शक्तींचा गौरवशाली इतिहास सांगणारा ‘कांतारा : द लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter 1)…

तसं पाहायला गेलं तर या दोन्ही चित्रपटांचा मुळ गाभा हा आपल्या मुळांशी असणाऱ्या एकरुपतेचा, आपल्या देवांवरील श्रद्धेचा आणि जंगलांचं रक्षण कसं करावं या मुद्द्यांना अधोरेखित करणारा आहे… दरम्यान, याच दशावतार चित्रपटाचं जगभरातून कौतुक होत असताना आता ‘कांतारा १’ फेम दिग्दर्शक-अभिनेता रिषभ शेट्टीने (Rishabh Shetty) ‘दशावतार’चं कौतुक केलं आहे… आपल्या संस्कृती आणि मातीशी जोडणारे आणि आपल्या पुर्वजांना आणि देवांचा इतिहास सांगणारे चित्रपट येत आहेत हे फार कौतुकास्पद आहे असं म्हणत त्याने दशावतारचं अभिनंदन केलं आहे…

ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रिषभ शेट्टीने दशावतार चित्रपटाचा उल्लेख केला… “’दशावतार’ तुम्ही पाहिला आहे का?”, असा प्रश्न विचारला असता रिषभ म्हणाला की, “मी ‘दशावतार’ चित्रपटाच्या कथेबद्दल आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल ऐकलं आहे… पण अजून मी चित्रपट पाहिला नाही… पण नक्कीच मी दशावतार चित्रपट पाहणार आहे…”
पुढे लोककथा आणि लोककलेवर आधारित आणि ‘दशावतार’ चित्रपटाचा उल्लेख करत रिषभ म्हणाला की, “आपल्या रुढी, प्रथा, परंपरा आणि संस्कृतीशी निगडित चित्रपट येत आहेत हे फार उत्तम आहे… हे विषय प्रेक्षकांना कधीच नाउमेद करत नाहीत; उलट मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत फार महत्वाचा संदेश पुढच्या पिढीसाठी हे चित्रपट पोहोचवतात…” (Rishabh Shetty reaction on Dashavatar movie)
================================
हे देखील वाचा : Dashavatar Film : कोकणातील ‘दशावतार’ बॉक्स ऑफिसवर गाजला…
=================================
दरम्यान, ‘दशावतार’ चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं असून कोकणातील ‘दशावतार’ ही लोककला आणि त्याभोवती रहस्यमयी कथा या चित्रपटातून सादर केली गेली आहे… चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आत्तापर्यंत २३.२ कोटींची कमाई केली आहे… तर दुसरीकडे ‘कांतारा १’ ने धुमाकूळच घातला आहे… अवघ्या ६ दिवसांमध्ये या चित्रपटाने २६६.०२ कोटींची कमाई केली असून चित्रपटाचं १२५ कोटींचं बजेट वसूल करत ५०० कोटींकडे वाटचाल सुरु केली आहे… (Kantara 1 box office collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi