Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karz movie : ऋषी कपूर-टीना मुनीमचा म्युझिकल हिट ’कर्ज’!

Gulkand ची १ महिन्यानंतरही थिएटरमध्ये जादू; जाणून घ्या बॉक्स ऑफिस

Squid Game 3: पुन्हा फासे पलटणार; येणार नवा ट्विस्ट!

Aamir Khan : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बॉलिवूडमधून एक्झिट घेणार?

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rudra: The Edge of Darkness Review: प्रदीर्घ भागांची सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर!

 Rudra: The Edge of Darkness Review: प्रदीर्घ भागांची सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर!
वेबसिरीज रिव्ह्यू

Rudra: The Edge of Darkness Review: प्रदीर्घ भागांची सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर!

by मानसी जोशी 04/03/2022

गेल्या काही वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली आहे. अभिषेक बच्चन, सैफ अली खान, माधुरी दीक्षित यांच्यामागोमाग आता अजय देवगणनेही ओटीटीच्या दुनियेत प्रवेश केला आहे. ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस (Rudra: The Edge of Darkness)  या वेबसिरीजद्वारे त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिमाखात एंट्री घेतली आहे. 

डिस्ने + हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज बहुचर्चित वेबसिरीज ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ ही वेबसिरीज रिलीज झाली. यामध्ये अजय देवगण सोबत अतुल कुलकर्णी, राशी खन्ना, ईशा देओल हे कलाकार मध्यवर्ती भूमिकेमध्ये दिसणार आहेत. 

‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ ही एक सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर असून, ती ‘लुथर’ या ब्रिटिश वेबसिरिजवर आधारित आहे. ही सिरीज एकूण ६ भागांची असून प्रत्येक भाग ४५ ते ५५ मिनिटांची आहे. 

Rudra: The Edge of Darkness

डीसीपी रुद्रवीर प्रताप सिंह (अजय देवगण) मुंबई क्राईम ब्रँचमधला एक अतिशय प्रामाणिक आणि बुद्धिमान ऑफिसर असतो. गुन्हेगाराला पकडण्यासाठी कोणत्याही थराला जाणं, वेळप्रसंगी सर्व नियम धाब्यावर बसवणं, ही याची खासियत. साहजिकच तो न आवडणाऱ्यांची संख्याही कमी नसते. (Rudra: The Edge of Darkness Review)

सात महिन्यांच्या सस्पेन्शननंतर पुन्हा ऑफिसला आलेल्या रुद्रवीरचा सामना होतो एका सायको क्रिमिनलशी. प्रचंड गुंतागुंतीची केस सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुद्रच्या आयुष्यातही अशीच गुंतागुंत निर्माण झालेली असते. रुद्रवीर आणि त्याची पत्नी शैला (इशा देओल) या दोघांमधले मतभेद, केस सोडविण्यासाठी त्याचं कोणत्याही थराला जाणं, कामाच्या पद्धतीमुळे वैयक्तिक आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या आणि सिनिअर्स आणि ज्युनिअर्ससोबतचे संबंध या साऱ्या गोष्टींभोवती ही सिरीज फिरत राहते. 

सीरिजच्या पहिल्याच भागात रुद्रच्या आयुष्यात येते बोल्ड अँड ब्युटीफुल आलिया चोकसी (राशि खन्ना). प्रचंड बुद्धिमान असणारी आलिया स्‍पेस रिसर्च जीनियस असते. परंतु, याचसोबत ती डबल मर्डर केस मधली प्रमुख संशयितही असते. अर्थात आलियाला अटक करण्यात असफल झालेला रुद्र आणि आलियाची चांगली मैत्री होते. पहिल्याच भागात या दोघांमध्ये झालेली मैत्री पुढच्या भागाची उत्कंठा वाढवते. (Rudra: The Edge of Darkness Review)

Rudra Review

‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ ही सायको- थ्रिलर- सस्पेन्स सिरीज असल्यामुळे याबद्दल अजून काही सांगितल्यास सिरीज बघण्यातली मजा संपून जाईल. इशा देओलच्या अभिनयाच्या मर्यादा या सिरीजमध्ये पुन्हा एकदा ‘हायलाईट’ होत असताना राशी खन्ना या अभिनेत्रीचा वावर मात्र सुखद वाटत राहतो. अर्थात, असं असलं तरी सशक्त अभिनयासाठी तिला अजून थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे. अश्विनी आणि आशिष विद्यार्थी या दोन्ही कलाकारांनी नेहमीप्रमाणे आपली भूमिका चोख बजावली आहे. 

=====

हे देखील वाचा: अजय देवगण याला अक्षय कुमारचे उदाहरण देऊन स्टंटचे धडे दिले होते. ज्यामुळे अजय देवगणच्या पुढच्या कारकीर्दीचा पाया रचला गेला…

=====

अतुल कुलकर्णी या गुणी कलाकाराचा सशक्त अभिनय ही या सिरीजमधली सर्वात जमेची बाजू म्हणता येईल. अजय देवगणने याआधी मोठ्या पडद्यावर अशा प्रकारच्या भूमिका साकारलेल्या असल्यामुळे पुन्हा ओटीटीवरही त्याला त्याच भूमिकेत बघणं काहींना आवडू शकेल, तर काहींना कंटाळवाणं वाटेल.

ज्यांनी याआधी ‘लुथर’ ही इंग्रजी वेबसिरीज बघितली आहे त्यांनी ही वेबसिरीज न बघणं उत्तम. कारण ‘लुथर’ची कथा भारतीय पद्धतीने सादर करताना दिग्दर्शकाने काही प्रसंग तसेच्या तसे सिरीजमध्ये घेतले आहेत. त्यामुळे ही सिरीज म्हणजे ‘लुथर’ चा रिमेक वाटू शकते. (Rudra: The Edge of Darkness Review)

वेबसिरीजचे एपिसोड्स थोडे मोठे आहेत आणि काही ठिकाणी कंटाळवाणे वाटू शकतात. सशक्त कथा, प्रत्येक भागात निर्माण होणारी पुढच्या भागाची उत्कंठा या सिरीजमधल्या जमेच्या गोष्टी असल्या तरी लांबलचक भाग बघणं प्रेक्षकांना कंटाळवाणं वाटू शकतं. त्यामुळे, या सिरीजमधले काही प्रसंग टाळून भाग छोटे करता आले असते, पण दिग्दर्शकाने तसं का केलं नाही, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो आणि इथे सिरीज बघण्याचा ट्रॅक सुटू शकतो. 

थोडक्यात, ज्यांना सस्पेन्स सिरीज, मर्डर मिस्ट्री, सायको थ्रिलर पद्धतीच्या सिरीज बघायला आवडतात आणि ज्यांनी ‘लुथर’ ही ब्रिटिश सिरीज अजून बघितली नाहीये त्यांना ही सिरीज आवडू शकते. परंतु, काहीतरी भव्यदिव्य बघायला मिळेल अशी अपेक्षा असेल, तर इथे तुमची निराशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Rudra: The Edge of Darkness Review)

वेबसिरीज: ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra: The Edge of Darkness)
ओटीटी प्लॅटफॉर्म: डिस्ने + हॉटस्टार
दिग्दर्शक: राजेश मापुस्कर
निर्माता: समीर नायर
प्रमुख कलाकार: अजय देवगण, राशि खन्ना, अतुल कुलकर्णी, आशिष विद्यार्थी, इशा देओल
दर्जा: साडे तीन स्टार

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood bollywood update Celebrity Entertainment Review Webseries WebSeriesReview
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.