
Genelia Deshmukh : बॉलिवूडनंर साऊथमध्येही पुनरागमन; SS Rajamouli यांच्याशी झाली २० वर्षांनी भेट
बॉलिवूड आणि साऊथ अशा दोन्ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने घर-संसारासाठी तब्बल १० वर्षांचा करिअरमध्ये ब्रेक घेतला होता… आता मात्र, तिने आमिर खान याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं असून तिचं चाहत्यांनी स्वागत केलं आहे… शिवाय, मुळची साऊथ हिरोईन असल्यामुळे आता जिनिलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पुनरागमन केलं असून ‘एस.एस.राजामौली’ यांनी जिनिलियाचं खास कौतुक केलं आहे… दरम्यान, २००४ मध्ये जिनिलियाने राजामौली यांच्यासोबत एका स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात काम केलं होतं.. त्यानंतर २१ वर्षांनी दोघं एकत्र आले आहेत… काय म्हणाले ते जाणून घेऊयात..

तर, जिनिलीया ‘ज्युनिअर’ या तेलुगू चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट १८ जुलैला प्रदर्शित झाला…या चित्रपटात जिनिलीयासह श्रीलीला, राव रमेश,आर.रवीचंद्रन असे बरेच कलाकार झळकणार आहेत. राधाकृष्ण रेड्डी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.दरम्यान, याच चित्रपटाच्या एका कार्यक्रमाला राजामौली (Ss Rajamouli) यांनीही हजेरी लावली होती… यावेळी त्यांनी जिनिलीयाच्या तेलुगू इंडस्ट्रीतील पुनरागमनाबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली. राजामौली म्हणाले की,“किती वर्षे झाले पण तू अजूनही तशीच दिसत आहेस. मी सिनेमॅटोग्राफर सेंथिलला विचारलं होतं की, आपल्याला नवीन जिनिलिया दिसेल का तर तोसुद्धा म्हणाला हो नक्कीच. त्यामुळे मी आतुरतेने तुझी वाट बघत आहे”.(Entertainment)
================================
=================================
राजामौली यांच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून भावूक झालेली जिनिलिया म्हणाली की, “तुम्ही खूप चांगले आहात सर माझ्यासाठी तुमचे हे शब्द फार महत्त्वाचे आहेत”. दरम्यान,जिनिलीया ‘ना इश्तम’ या तेलुगू चित्रपटात २०१२ मध्ये शेवटची दिसली होती..त्यानंतर आता तब्बल १३ वर्षांनी ती ‘ज्युनिअर’ चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत पुनरागमन करत आहे. तिच्या अन्य साऊथ चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर,आजवर ‘बॉईज’, ‘सचिन’, ‘हॅपी’, ‘बोम्मारिल्लू’, ‘संतोष सुब्रमण्यम’, ‘उरुमी’ यांसारख्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांतून काम केलं आहे. (Genelia Movies)
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : ५ इंडस्ट्रीचे ५ दिग्गज एकत्र… ‘कुली’ १००० कोटी कमावणार?
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi