Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

सचिन, विजू खोटे ते एम.एस. शिंदे; Sholay चं मराठी कनेक्शन!
“कितने आदमी थे… एक एक को चून चून के मारुंगा…” हे cult डायलॉग्स ५० वर्ष झाली, तरी आपल्यातल्या कोणाच्या तरी मुखात ऐकायला मिळतातच… हो हो ‘शोले’बद्दलच बोलतोय… एक असा मुव्ही ज्याचा प्रभाव आजही इतका आहे की… तुम्ही परदेशात जरी गेलात, तरी बॉलीवूडचीच काय तर इंडियन फिल्म इंडस्ट्रीची ओळख ही ‘शोले’मुळेच असते. याच ‘शोले’ला ग्रेट बनवण्यासाठी काही मराठमोळ्या व्यक्तीमत्त्वांचाही हातभार लागला होता. त्यातले दोन म्हणजे सचिन पिळगावकर आणि विजू खोटे, हे तुम्ही ऑन स्क्रीन पाहिलेच असतील, पण ऑफ स्क्रीन असतानासुद्धा काही मराठी लोकांनी शोलेसाठी योगदान दिलं आहे. आज आपण शोले आणि मराठीचं हेच कनेक्शन जाणून घेणार आहोत…

आधी आपण शोलेमधल्या दोन खास कलाकारांबद्दल जाणून घेऊ… पहिले म्हणजे सचिन पिळगांवकर ज्यांनी अहमदची भूमिका साकारली होती… ‘शोले’च्या आधी सचिन यांनी ८- १० हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं, यासोबतच त्यांना दोन national awards मिळाले होते. त्यामुळे दांडगा अनुभव होताच… आणि म्हणूनच हा खास रोल सचिन यांना मिळाला. मध्यंतरी सचिन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी शोलेचा सहाय्यक दिग्दर्शक होतो आणि गब्बर सिंग म्हणजेच अमजद खान यांना काही डायलॉग्स बोलायला मी शिकवले होते. त्यावरून थोडी controversy सुद्धा पहायला मिळाली होती. शोलेमधले दुसरे मराठी actor म्हणजे विजू खोटे… कालिया हे शोलेमधलं एक खास पात्र… सरदार, मैने आपका नमक खाया है फेम विजू खोटे यांनीही बऱ्यापैकी हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘शोले’मध्ये त्यांचा फक्त ७ मिनिटांचा स्क्रीन स्पेस होता, याच्यासाठीच त्यांना २५०० रुपये मिळाले होते. (Bollywood News)

शोलेच्या यशामागचं आणखी एक मराठी नाव म्हणजे एम एस शिंदे… म्हणजेच माधव शिंदे… शिंदे हे शोलेचे एडिटर होते. आणि खास गोष्ट म्हणजे फिल्मफेअर अवार्ड्स मध्ये शोलेचा अनेक नॉमिनेशन्स मिळाले. पण अवार्ड फक्त एकच मिळाला तो म्हणजे बेस्ट एडिटरचा आणि तो मिळवून दिला, एम एस शिंदे यांनी ! त्यांनी जवळपास १०० हिंदी चित्रपटांचं एडिटिंगचं काम केलं. पण दुर्दैव म्हणजे त्यांचं अखेरचं आयुष्य अगदीच हलाखीच्या परिस्थितीत गेलं… १९९५ नंतर त्यांनी एडिटिंगचं काम सोडलं. २००६ साली त्यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्यांच्या मुलीचं असं म्हणणं होत की आर्थिक परिस्थिती ढासळली असताना इंडस्ट्री मधून त्यांना कोणाचीही मदत मिळाली नाही. आणि वडिलांना कित्येक कामाचे तर पैसेसुद्धा मिळाले नव्हते. त्यामुळे शोलेला इतक्या उंचावर पोहोचणारा एडिटर मात्र फार बिकट परिस्थितीशी सामना करत गेला.
==========
हे देखील वाचा : किशोर कुमार यांनी संगीतकारासोबत भांडून अनुपमा देशपांडे सोबत गाणे गायले!
==========
‘शोले’चे आर्ट डिरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर होते, राम येडेकर… खास गोष्ट म्हणजे त्यांनाही बंगाल फिल्म्स जर्नलिस्ट असोसिएशन अवार्ड्समध्ये best art direction चा अवार्ड मिळाला होता. त्यांनी ‘गांधी’ सारख्या ऑस्करविनिंग हॉलीवूड मुव्हीसाठीही art director म्हणून काम केलं होतं. मुव्हीच्या असिस्टंट डीरेक्टरपैकी एक होते शरद पालेकर…. तसेच मेक अप artist होते, दिनू आणि पांडू इंदुलकर ! इथे हेच सांगायचं आहे की, ‘शोले’मध्ये खासकरून मराठी प्रेक्षकांनीही सचिन पिळगावकर आणि विजू खोटे यांची पात्र लक्षात ठेवली, पण behind the camera असणारी एम एस शिंदे, राम येडेकर, शरद पालेकर, दिनू आणि पांडू इंदुलकर अशी मराठी मंडळी फारशी कोणालाच माहिती नाही. त्यामुळे शोलेला ग्लोबल लेव्हलला पोहोचवण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारी ही मराठी व्यक्तिमत्त्व… प्रत्येक मराठी माणसाच्या लक्षात असावीत एवढंच!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi