प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

“माझी तल्लख बुद्धी म्हणून…”; Sachin Pilgoankar यांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर सध्या त्यांच्या किस्स्यांमुळे विशेष चर्चेत आहेत… ५० वर्षांपेक्षा अधिक काळ सचिनजींनी इंडस्ट्रीत काम केलं आहे… बालकलाकार म्हणून सचिन पिळगांवकर यांनी काम करायला सुरुवात केली… त्यामुळे साहाजिकच त्यांच्याकडे सांगायला फार किस्से आहेत… पण बऱ्याचदा त्यांना याचमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो… आता एका मुलाखतीदरम्यान सचिन यांनी त्यांच्या स्मरणशक्तीबद्दल भाष्य केलं होतं.

सचिन पिळगांवकर यांनी ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान सचिनजींना ‘इतक्या गोष्टी लक्षात कशा राहतात?’ असं विचारलं असता ते म्हणाले होते की, ‘काय आहे ना! मी त्याच्यासोबतचं जन्माला आलोय, असं म्हणू शकतो आपण. माझी तल्लख बुद्धी आहे. ती फार चांगली गोष्ट आहे, असं नाही म्हणता येत. कारण, सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात ना! त्यामुळे ना, मी खूप सहजपणे माफ करू शकतो, पण मी कधीच काहीच विसरू शकत नाही.’
पुढे सचिन म्हणाले की, ‘पण ती खूपच चांगली गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. कारण, त्याने त्रास पण खूप होतो. तसं बघायला गेलं तर त्याचे फायदेसुद्धा खूप आहेत. कारण, ह्या गोष्टी लक्षात राहणं आणि ते लक्षात ठेऊन त्या वेळेवर ते डोक्यात येणं, ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे बऱ्याच क्षुल्लक गोष्टी लक्षात राहतात.’ असंही सचिन यांनी पुढे सांगितलं.
================================
हे देखील वाचा : 9व्या वर्षी पहिली गाडी घेतली; Sachin Pilgoankar यांचा आणखी एक किस्सा चर्चेत
================================
दरम्यान, सचिन पिळगांवकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘गंमत जंमत’, ‘नादिया के पार’, ‘बालिका वधू’, ‘अखियो के झारोंखो से’, ‘शोले’ यांसारख्या गाजलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९६२ मध्ये ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा प्रवास सुरु केला होता…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi