
Sai Tamhankar To Siddharth Jadhav; मराठी कलाकारांचा ‘नटसम्राट बालगंधर्व’ पुरस्काराने झाला सन्मान
नटसम्राट बालगंधर्व यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला… मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना या पुरस्कार प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला… २५व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात सई ताम्हणकरसह सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे अशा दिग्गज कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…
सिने सृष्टीतील योगदानासाठी मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव यांचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावतआणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला…तसेच, गायन विभागात या पुरस्काराचे मानकरी ठरले कुमार सानू, पियुष पनवर.. कुमार सानू यांनी पुरस्कार स्वीकारला…

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मकरंद देशपांडे म्हणाले की, “ज्या काळात स्त्री नटी म्हणून नाटकात अभिनय करू शकत नव्हती अशावेळी बालगंधर्वांनी रंगमंचावर लक्षणीय स्त्री उभी केली. ए.आय. कितीही पुढारलं तर माणसाची जागा घेऊ शकणार नाही”… तर, आपल्या घरच्यांची केलेला सन्मान खूप जास्त जवळचा असल्याचं म्हणत अभिनेत्री सई ताम्हणकरने आभार मानले.
================================
हे देखील वाचा : सिद्धार्थ जाधवची एक महत्त्वपूर्ण बाजू आपल्याकडून दुर्लक्षित रहाते.
================================
तर सिद्धार्थ जाधव याने देखील सगळ्यांचे आभार मानताना म्हटलं की, पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला की, ‘मी माझ्या मुलीसोबत इथे आलो आहे. तिच्या सोबत हा पुरस्कार स्वीकारून मला खूप आनंद झाला आहे. 2009ला मला युवा बालगंधर्व कडून पुरस्कार मिळाला होता. मी 2000 साली माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आज पंचवीस वर्षे झाली मी मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करतोय. त्यामुळे हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे. हा पुरस्कार मिळने ही खूप मोठी गोष्ट आहे.. हे पुरस्कार पुढे काहीतरी करण्याची ताकद देतात. मालिका ते सिनेमा पर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि उभे राहण्याची ताकद हे नाटकांनी आम्हाला दिला. चेहरा नसलेल्या कलाकारांना रंगभूमीने चेहरा दिला”, असंही तो म्हणाला.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi