Dadasaheb Phalke यांच्या आधीही मराठी माणसाने चित्रपट तयार केला होता!

Tere Naam पाहिला तर ही GenZ पोरं रडून रडून… ‘सैयारा’ चित्रपट आणि यंगस्टर्स होतायत ट्रोल!
समजा मुव्हीला गेला आहात आणि अचानक तुमच्या बाजूला बसलेली व्यक्ती ढसाढसा रडतेय किंवा बेशुद्धच झालीये.. असा काही किस्सा कधी तुमच्यासोबत घडला आहे का? नाही?पण सध्या बऱ्याच लोकांसोबत हे घडतंय.. निमित्त आहे 18 जुलैला मोहित सुरी दिग्दर्शित सैयारा (Saiyaara) हा movie… यामध्ये अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडे आणि अनिता पद्डा लीड रोल मध्ये आहेत. हा मुव्ही बघायला specially GEN Z पब्लिक गर्दी करतंय. आता इतर मूव्हीप्रमाणे यालासुद्धा चांगले वाईट reviews मिळतायत. पण ओव्हरऑल या सिनेमाला निब्बा निब्बीचा मूवी म्हटलं जातंय! अशात आता तेरे नाम (Tere Naam) चित्रपटाचे मीम्स व्हायरल होत असून ९०च्या दशकातील हा चित्रपट जर का आता रि-रिलीज केला तर हेच GEN Z पारच वेडी होतील किंवा जीवच देतील असं ट्रोलिंग सध्या सुरु झालं आहे…(Bollywood News)

बॉक्स ऑफिसवर सध्या मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाने धुमाकूळ घातला असून, अवघ्या ५ दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे…खरं तर या मूव्हीची स्टोरी तशी नॉर्मल लव्ह स्टोरीच आहे, पण थिएटरमध्ये हा मुव्ही बघून लोकं अक्षरशः वेड्यासारखंच करत आहेत. थिएटरमधील काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात कुणी ढसाढसा रडतंय, तर कोणी सदम्यातच गेलंय, तर कोणाचं आणखी काही जगावेगळं सुरु आहे..इतकंच नाही तर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक माणूस थिएटरमध्ये शर्ट काढून छातीवर मारून मारून रडतोय…. एकंदरीत काय तर सिनेमा पाहताना प्रेक्षकांची वाईट अवस्था झाली आहे आणि यावरून मुव्हीला ट्रोल केलं जातंय. अशात काही नेटकऱ्यांनी ९० च्या दशकातील काहींनी तर ‘तेरे नाम’ चित्रपटाची आठवण काढली आहे. या GenZ ना जर ‘तेरे नाम’ दाखवला तर रडून रडून मरतील अशी खिल्ली काहींनी उडवली आहे.(Entertainment)
================================
हे देखील वाचा : Salman Khan याने २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘तेरे नाम’मधील ‘ही’ गोष्ट ठेवलीये जपून!
=================================
२००३ मध्ये सतीश कौशिक दिग्दर्शित तेरे नाम हा चित्रपट प्रत्येक ब्रेकअप झालेल्या माणसाने किमान ४०-५० वेळा तरी पाहिला असेलच..प्रत्येकालाच आपण राधे आहोत असं देखील वाटलं असेल… त्यामुळे आता तर का या दर्दी वातावरणात सलमान खान याची प्रमुख भूमिका असणारा तेरे नाम चित्रपट रि-रिलीज केला तर आम्ही ९०च्या दशकातील प्रेक्षक तो हाऊसफुल्ल करुन दाखवू असे मीम्स सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत… त्यामुळे आता प्रेक्षकांच्या आग्रहाखातर खरंच तेरे नाम रि-रिलीज होणार का? आणि जर का झालाच तर GenZ चा रिस्पॉन्स काय असेल हे पाहणं महत्वाचं नक्कीच असेल…(Latest bollywood news)

बरं, सैयारा जरी ट्रोल होत असला तरी या चित्रपटाची एक बाजू अशी पण आहे की, negative publicity is the best publicity या वाक्यानुसार या सगळ्या लोकांच्या स्टोरीज, न्युज बघून अनेक जण नक्की या मुव्हीमध्ये असं आहे तरी काय ? हे जाणून घ्यायला थिएटरमध्ये जातायत! त्यामुळे आपोआप मुव्हीच्या colllection मध्ये भर पडतोय. त्यामुळे येत्या काळात ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल होणारा सैयारा नक्कीच असू शकेल असं चित्र सध्यातरी दिसत आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi