Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Sakhi Gokhale : “विनोद निर्माण करण्याची जबाबदारी पुरुषांवर असायची पण…”
अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी यांचं सूत दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे जुळलं. काही काळाने या दोघांनी लग्न केलं आणि आता दोघेही एकत्र मराठी नाट्यसृष्टीत काम करत आहेत. नुकताच सुव्रत जोशी ‘छावा’ चित्रपटात झळकला होता. मालिकेनंतर सखी गोखले (Sakhi Gokhale) आणि सुव्रत जोशी (Suvrat Joshi) यांनी ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे पहिलं एकत्र नाटक केलं. त्यानंतर हे दोघे ‘वरवरचे वधू-वर’ (Varvarche Vadhuvar Play) या नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून सखी-सुव्रत भारावले आहेत.(Marathi Movies)
सखी-सुव्रतच्या ‘वरवरचे वधू-वर’ (Varvarche Vadhuvar Play) या नाटकाला यंदा बरेच पुरस्कार मिळाले. सर्वत्र या नाटकाचे कौतुक होत असताना सखीने (Sakhi Gokhale) या नाटकाबद्दलची एक खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे की, “मला ‘वरवरचे वधू-वर’ (Varvarche Vadhuvar Play) या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या श्रेणीत नामांकन मिळाले. मी जिंकली नाही; पण प्रामुख्याने विनोदी नाटकातील भूमिकेसाठी मुख्य श्रेणीत नामांकन मिळणे ही माझ्यासाठी विशेष गोष्ट होती. मी लहानपणी पाहिलेल्या विनोदी सादरीकरण/नाटकांमध्ये नेहमीच एक विशिष्ट पद्धत असायची. यात स्त्री पात्रे दृश्य मांडणी करत असत आणि पुरुष पात्रे विनोद घडवत असत. विनोद निर्माण करण्याची जबाबदारी पुरुषांवर असायची. महिला बहुतेकदा विनोदांचा केंद्रबिंदू असायची”. (Marathi natak)

पुढे ती लिहिते, “स्वतःला भाग्यवान समजते की, विनोदी सादरीकरणाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी मिळाली. स्त्रीची वैशिष्ट्ये, तिचे शरीर, तिचे गुण इत्यादींवर आधारित विनोद असायचे. पण आता विराजस कुलकर्णीसारखे माझे समकालीन कलाकार त्या रूढीवादी कल्पनांना तोडत आहेत. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते की, मला विनोदी सादरीकरणाचे नेतृत्व करण्याची समान जबाबदारी मिळाली. ‘नायिके’चे सर्व गुण असलेले पात्र लिहिण्यासाठी, तिला थोडे अधिक विनोद देण्यासाठी आणि नाटकाचे कथन तिच्याभोवती रचण्यासाठी धाडस लागते आणि विराजसने मला ही संधी दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते”.
===========
हे देखील वाचा : Chhaava : शुभांगी गोखलेंनी जावयाचं केलं कौतुक,“त्याला बघुन चिड येते म्हणजेच”
===========
आणि शेवटी तिने सगळ्यांचे आभार मानत लिहिलं आहे की, “मी माझ्या संपूर्ण टीमचे, माझ्या सह-निर्मात्यांचेही आभार मानू इच्छिते की, त्यांनी माझ्या क्षमतेवर कधीही शंका घेतली नाही. माझ्या आईनेही माझा अभिनय पाहिला आणि अभिमानाने आनंद व्यक्त केला. शेवटी मी माझा सह-अभिनेता, सह-निर्माता व सह-प्रवासी सुव्रत जोशीचे (Suvrat Joshi) आभार मानते. तुझा माझ्यावरील विश्वास ही एक प्रेरक शक्ती आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”. (Sakhi Gokhale)
दरम्यान, अभिनेत्री शुभांगी गोखले (Subhangi Gokhale) यांनी जावई सुव्रतच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटातील अभिनयाचं कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी, “त्याने सादर केलेल्या भूमिकेचा लोकांना राग येत असेल तर तीच त्याच्या कामाची पोचपावती आहे” असं म्हटलं आहे. (Chhaava Movie)