Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
Salman Khan Birthday बॉलिवूडचा वन अँड ओन्ली भाईजान सलमान खान
बॉलिवूडमध्ये आपले करियर व्हावे आणि आपणही एक सुपरहिट कलाकार बनावे अशी अनेकांची अपेक्षा असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक लोकं मुंबई (Mumbai) नावाच्या मायानगरीमध्ये येतात. मात्र या येणाऱ्या सर्वच लोकांना यश मिळते असे नाही. (Salman Khan Birthday)
अनेक लोकं भरपूर प्रयत्न करूनही यश मिळवू शकत नाही. काम मिळवण्याचा हा संघर्ष सगळ्यांना सारखाच असतो. मात्र ज्यांना या क्षेत्रात यश मिळते ते टिकवणे देखील खूपच अवघड आणि महत्वाचे असते. एक गोष्ट तर या इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षांपासून काम करणारे कलाकार आणि सामान्य लोकं आदी सर्वच मान्य करतील की कलाकार हा त्याच्या फॅन्समुळेच असतो. (Bollywood Masala)
फॅन्सच्या जोरावर आणि लोकांच्या प्रेमावरचा प्रत्येक कलाकाराचे स्टारडम अवलंबून असते. आणि त्यावरच ते टिकते. या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची एक सुप्त इच्छा असते, आणि ती म्हणजे आपल्याला देखील अशी फॅन फॉलोविंग असली पाहिजे जशी सलमान खानला आहे. (Bollywood Tadka)
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman Khan) हा मनोरंजनविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची आणि परिचयाची गरज नाही. आज सलमान खान त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे, (Salman Khan Birthday) त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी.
बॉलिवूडमध्ये अभिनयाची कारकीर्द सुरु करून सलमान खानला ३२ पेक्षा अधिक वर्ष झाले आहेत. मात्र आजही त्याचे स्टारडम, त्याची क्रेझ आजही कायम आहे. तो ५९ वर्षाचा असूनही त्याच्या वयाचा अंदाज कोणालाही लावता येणार नाही. आजही तो त्याचा फिटनेस कमालीचा जपतो. आज तो इंडस्ट्रीतल्या सर्वांत महागड्या कलाकारांमधील एक अभिनेता म्हणून ओळखला जातो. (Ankahi Baatein / Untold Stories)
सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला. सलमानचे पूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे. त्याला अरबाज आणि सोहेल खान (Arbaaz Khan and Sohel Khan) हे दोन भाऊ, तर, अलविरा आणि अर्पिता या दोन बहिणीही आहेत. सलमानचे वडील बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान (Writer Salim Khan) आहेत. तर आई सलमा खान या गृहिणी आणि सावत्र आई हेलन या देखील हिंदी सिनेमातील प्रसिद्ध डान्सर होत्या.
सलमान खानला अभिनयातच यायचे होते. त्याचे कधी अभ्यासात लक्ष लागले नाही. वडील प्रसिद्ध लेखक असूनही, सलमान खानला या क्षेत्रात काम मिळवताना मोठा संघर्ष करावा लागला. त्याने त्याच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. ‘बीवी हो तो ऐसी‘ (Biwi Ho Toh Aisi) हा सलमान खानचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याने सहाय्यक कलाकाराची भूमिका निभावली होती. त्याला या चित्रपटासाठी केवळ ७५ रुपये मानधन देण्यात आले होते. (Entertainment mix masala)
पहिला सिनेमा केल्यानंतर त्याने मोठा काळ कामासाठी संघर्ष केला. त्याच्याकडे अनेक महिने काम नव्हते. सलमान खानने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले. मात्र अचानक त्याचे नशीब चमकले आणि त्याला राजश्री प्रोडक्शनचा ‘मैंने प्यार किया‘ (Maine Pyar Kiya) सिनेमा मिळाला. (Celebrity)
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड तयार केले आणि अफाट लोकप्रियता मिळवली. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटासाठी सलमानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. या सिनेमामुळे सलमान खानला रोमँटिक हिरो म्हणून एक नवीन ओळख मिळाली आणि त्याची गाडी सुसाट धावू लागली.
सलमानने आपला अभिनय आणि प्रयत्नांच्या जोरावर अनेक चित्रपट मिळवले. त्याने आपल्या कारकिर्दीत मैंने प्यार किया, साजन, हम आपके हैं कौन, करण-अर्जुन, जुडवा, प्यार किया तो डरना क्या, तेरे नाम, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर, बजरंगी भाईजान असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ अनेक सुपरहिट चित्रपट देऊन सलमानने यशाचे शिखर गाठले आहे.
सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक ट्रेंड सेट केले. तो त्याच्या बॉडीसाठी ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक अॅब्ज आणि शर्टलेस बॉडी फ्लाँट करण्याचा ट्रेंड सुरू केला. त्यातून त्याचे चाहते आणि अनेक बॉलिवूड कलाकारांनी प्रेरणा घेतली. सलमान खानने अनके नवोदितांना इंडस्ट्रीत संधी दिली आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतले अनेक जण त्याला ‘भाईजान’ अशी हाक मारतात.
सलमान खान अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम लेखक, गायक आणि पेंटर देखील आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये गायन केले असून, वीर या चित्रपटाचे लेखनही त्याने केले होते. सलमान खान वेळ घालवण्यासाठी पेंटींग करतो. परंतु अनेकदा तो या पेंटींग विकतो. एवढेच नव्हे सिनेमांच्या प्रमोशनवेळी तो आपल्या चाहत्यांना पेंटींग भेट म्हणून सुध्दा देतो. पेंटींगमधून जे पैसे येतात, ते तो त्याच्या चॅरिटेबल ट्रस्ट बीइंग ह्यूमनमध्ये देतो.
रिपोर्ट्सनुसार, सलमान खानजवळ त्याचा कुठलाही ईमेल आयडी नाहीये. याचे कारण म्हणजे ईमेलच्या माध्यमातून संवाद साधणे तो अवॉइड करतो. याविषयी त्याला विचारले असता, कधी ईमेल आयडीची गरज भासली नाही, असे तो सांगतो. एखाद्याला काही सांगायचे असल्यास ते तो फोनच्या माध्यमातून संपर्क साधून सांगत असतो.
सलमानला सिनेमांमध्ये Kissing सीन देण्यास मुळीच आवडत नाही. कारण सालमानला वाटते, की कुटुंबीयांसोबत सिनेमा पाहताना असे सीन पाहणे योग्य ठरत नाही. हा त्याचा खासगी अनुभव आहे.
सलमानला अभिनेत्रींनी अंगप्रदर्शन केलेले अजिबात आवडत नाही. जेव्हा कधी एखादी अभिनेत्री तोडके कपडे परिधान करते तेव्हा तो तिला कपड्यांवरून टोकतो. त्यामुळे अनेक अभिनेत्री सलमानच्या या वागणूकीमुळे घाबरतात.
सलमान खान आपल्या आईचा मोठा भक्त आहे. त्यामुळे जेव्हा कधी तो शूटिंगवर असतो तेव्हा त्याला आईच्या हातचे जेवण सेटवर येते. सलमान सांगतो, त्याला आईच्याच हातचे जेवण आवडते.
सलमान खान नेहमी उजव्या हाताच्या मनगटावर घालतो. हे निळ्या रंगाचे ब्रेसलेट इतके ट्रेंडिंग असते की तिचे चाहते देखील ते घालतात. अभिनेत्याने अनेक मुलाखतींमध्ये या खास ब्रेसलेटबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहे.
सलमान खानला त्याच्या फिरोजा ब्रेसलेटबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘माझे वडील नेहमी हे रत्न घालायचे. मला ते लहानपणापासूनच खूप आवडायचे. मी लहान असताना बरेचदा पप्पांच्या त्या ब्रेसलेटसोबत खेळायचो. मला ते खूप कुल वाटायचे. त्यानंतर जेव्हा मी मोठा झालो. माझ्या करिअरला सुरुवात झाली तेव्हा माझ्या वडिलांनीही हे मला गिफ्ट केले होते.
सलमान खानने एका मुलाखतीमध्ये सांगितलेले होते की, मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात त्याने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. या कामासाठी त्याला ७५ रुपये मोबदला मिळाला होता. ‘मैंने प्यार किया’ या हिट चित्रपटासाठी त्याला फक्त ३१ हजार रुपये मानधन मिळालं होतं. सलमान खानची एकूण संपत्ती ही सध्याच्या घडीला २००० कोटी असल्याचं म्हटलं जातंय.
सलमान खान अभिनेता असण्यासोबतच तो एक बिझनेसमनदेखील आहे. त्याचं ‘सलमान खान फिल्म्स (SKF)’ नावाचं प्रॉडक्शन हाउस आहे. बीइंग ह्युमन नावाचा एक ब्रँडदेखील त्याने लाँच केला आहे. या सर्व गोष्टींमधून त्याची भरपूर कमाई होते. याशिवाय ब्रँड एंडॉर्समेंटमधूनही तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
सलमान खान मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. या अपार्टमेंटशिवाय सलमानने २०१७ मध्ये 5 BHK बंगला खरेदी केला होता. याशिवाय त्याचे पनवेलमध्ये फार्महाऊसही आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार दिल्ली, नोएडा आणि चंदीगडमध्येही सलमान खानच्या अनेक मालमत्ता आहेत.
सलमान खान कारचाही शौकीन आहे. त्याच्याकडे ऑडी, बेंटले, रोल्स रॉयस आणि मर्सिडीजसह अनेक लक्झरी आणि महागड्या गाड्या आहेत. या गाड्यांची एकूण किंमत १४ कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सलमान खानला जेवणात चिकन बिर्याणी आणि राजमा चावल आवडतात. त्याला मोदक आणि कबाब खायलाही आवडतात. सकाळच्या नाश्त्यात सलमान चार अंड्यांचा पांढरा बलक खातो आणि कमी फॅट असलेले दूध पितो. तर दुपारी त्याला मटण, तळलेले मासे, कोशिंबीर आणि फळे खायला आवडतात. आणि रात्री चिकन, सूप, उकडलेल्या भाज्या आणि मासे खायला आवडतात.
सलमान खान हा जेवढा त्याच्या व्यवसायिक आयुष्यामध्ये यशस्वी आणि प्रसिद्ध आहे, तेवढेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील खूप गाजले. सलमान खानचे अनेक अभिनेत्रींसोबत संबंध होते हे जगजाहीर आहे. संगीता बिजलानीपासून ऐश्वर्या रायपर्यंत त्याचे अनेक प्रेमप्रकरणं गाजले. ऐश्वर्या रायसोबतच्या त्याच्या प्रेमाच्या कहाण्या आजही जगभर प्रसिद्ध आहेत. एवढ्या अभिनेत्रींसोबत नाव जोडले जाऊनही आज तो सिंगल आहे.
सलमान खान हा त्याच्या दानधर्मासाठी, लोकांच्या मदतीसाठी ओळखला जातो. तो नेहमीच इंडस्ट्रीतल्या कलाकारांना मदत करण्यापासून ते सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांचा हरप्रकारची मदत करतो. गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी त्याने बीइंग ह्यूमन नावाची एक संस्था चालू केली. यातून तो सर्वच लोकांना विविध प्रकारची मदत करतो.
यासोबतच सलमान खानचे नाव अनेक वादांसोबत देखील जोडले गेले आहे. हिट अँड रन केस, काळवीट हत्या प्रकरण आदींमुळे देखील तो सतत चर्चेत असतो. सध्या त्याला बिष्णोई गॅंग कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे त्याला सध्या मोठी सुरक्षा देण्यात आली आहे.