विद्यार्थ्यांने दिली होती सलमान खानला धमकी; पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी
बॉलिवुड अभिनेता ‘सलमान खान‘ला मेलद्वारे धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. मार्च महिन्यात गॅलेक्सी अपार्टमेंटच्या ईमेलमध्ये धमकीचा मेसेज आला होता आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला होता, आता या प्रकरणात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. सलमान खानला गेल्या काही काळापासून धमक्या मिळत होत्या, आता त्याला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस सुरक्षाही देण्यात आली आहे. बॉलिवूड स्टार सलमान खानला ई-मेलद्वारे धमकावल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी लंडनमधील एका वैद्यकीय विद्यार्थ्याची ओळख पटवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणारा विद्यार्थी हरियाणाचा रहिवासी आहे. मात्र, हा विद्यार्थी गँगस्टर ग्रुपशी संबंधित आहे की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. (Salman Khan Death Threat)
मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीने मार्च महिन्यात गोल्डी ब्रारच्या नावाने सलमानच्या जवळच्या मित्राला धमकीचा ईमेल पाठवला होता, ज्यामध्ये त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या ई-मेलनंतर सलमानच्या मित्राने पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मात्र, या व्यक्तीबाबत अद्याप पोलिसांना माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता एका भारतीय विद्यार्थ्याविरोधात लुकआऊट सर्कुलर जारी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ब्रिटनमध्ये तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून तो भारतातील हरयाणाचा रहिवासी आहे. त्याने गोल्डी ब्रारच्या नावाने सलमान खानला धमकीचा ई-मेल पाठवला होता. सध्या आरोपींबाबत पोलिसांकडून फारशी माहिती दिली जात नाही. आरोपीला भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
सलमान खानला पाठवलेल्या कथित मेलमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या मेलमध्ये लिहिलं होतं, ”गोल्डी भाई (गोल्डी बरार) ला तुमचा बॉस सलमान खानशी बोलायचं आहे. लॉरेन्स बिश्नोई यांची मुलाखत तुम्ही पाहिलीच असेल, पाहिली नसेल तर बघायला सांगा. हे प्रकरण बंद करायचं असेल तर बोलून घ्या. समोरासमोर बोलायचे आहे हे ही सांगा, आता वेळीच कळवण्यात आले आहे, पुढच्या वेळी तुम्हाला धक्का बसेल.”(Salman Khan Death Threat)
============================
हे देखील वाचा: ‘३० तारीख को मारूंगा’ सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
============================
अभिनेत्याला धमकीचा ईमेल पाठवताना विद्यार्थी मित्रांसोबत पार्टी करत होता आणि बहुधा हा ईमेल मनोरंजनासाठी पाठवण्यात आला असावा. वांद्रे पोलिसांनी ईमेलच्या आधारे या प्रकरणाचा तपास केल्याचे समजते. यावेळी पोलिसांना समजले की, अभिनेत्याला धमकावण्यासाठी वापरला जाणारा ईमेल आयडी लंडनमधील एका लपून बसलेल्या ठिकाणाशी जोडला गेला होता. या माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी दोन महिन्यांनंतर धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली.