‘३० तारीख को मारूंगा’ सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
बॉलीवूडचा भाईजान म्हणजेचं अभिनेता सलमान खानच्या सिनेमांची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सलमान खानचा अगामी सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच त्याच्या या नव्या सिनेमाचा ट्रेलर धूमधडाक्यात लॉन्च करण्यात आला. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून सलमान खान चर्चेत आहे.(Salman Khan)
दरम्यान याच बरोबर सलमानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोमवारी रात्री एका व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन करून सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या इसमाने स्व:हाच नाव रॅाकी भाई अस सांगितले आहे. अनेकांना ही मस्करी असल्यासारख वाटेल मात्र हे खरे आहे. ज्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यात त्याने तारीख ही सांगितली आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने सोमवारी रात्री 9 वाजता मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि 30 एप्रिल रोजी सलमान खानची हत्या करणार असल्याचे सांगितले आणि आता त्याचे नाव रॉक भाई असे नमूद करण्यात आले आहे. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी बिश्नोई टोळीने या सलमान खानला कधी ईमेलद्वारे तर कधी पत्र लिहून धमकी दिली आहे. अलीकडेच तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत माफी न मागितल्यास सलमान खानला परिणाम भोगावे लागतील, अशी सुद्धा धमकी दिली होती.
सलमान खानला मिळणाऱ्या सततच्या धमक्या लक्षात घेता अभिनेत्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे, तर त्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षाही देण्यात आली आहे. सलमानने स्वत: आपल्या सुरक्षेसाठी पांढऱ्या रंगाची अतिशय महागडी बुलेटप्रूफ गाडीही खरेदी केली आहे. यासोबतच गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत सलमानला धमकावल्याप्रकरणी धाकड राम सिहाग नावाच्या व्यक्तीला सुद्धा पकडले होते. त्याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती.(Salman Khan)
===============================
हे देखील वाचा: Ankita Lokhande झाली बेरोजगार? स्वतः सांगितलं काम न मिळण्याचे कारण…
===============================
सलमानला १८ मार्च रोजी मिळालेल्या धमकीमागे ब्रिटनमध्ये बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रारचा हात असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी नुकताच केला होता. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी इंटरपोलची ही मदत घेतली आणि ब्रिटन सरकारला विनंती पत्र पाठवले आहे.