डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

अभिनंदन! ‘त्या’ चर्चांना लागला पूर्णविराम; Samantha Ruth Prabhu-राज निदिमोरू यांनी बांधली लग्नगाठ
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ‘द फॅमेली मॅन’ (The Family Man Web Series) सीरीजचा दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या.. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला असून समांथाने घटस्फोटाच्या ४ वर्षांनंतर राज दिमोरूशी (Raj Nidimoru) लग्नगाठ बांधली आहे… तिने सोशल मिडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे… (Samantha Ruth Prabhu Marriage)
समांथा व राज निदिमोरू यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात लग्नगाठ बांधली.. केवळ जवळच्या काही निवडक लोकांच्या उपस्थितीत समंथाने तिच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाची सुरुवात कली आहे… मंदिराच्या शांत आणि आध्यात्मिक वातावरणात दोघांनी साऊथ इंडियन स्टाईलने लग्न केलं. समांथाने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट करत ‘01.12.2025’, असं कॅप्शन दिलं आहे. (Entertainment News)

दरम्यान, समंथाचं पहिलं लग्न साऊथ स्टार नागा चैतन्या (Naga Chaitanya) याच्याशी २०१७ मध्ये झालं होतं.. गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करत त्यांनी आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती… त्यानंतर ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला… घटस्फोटाच्या ३ वर्षांनी नागा चैतन्याने अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala) हिच्याशी दुसरं लग्न केलं… आणि आता ४ वर्षांनी समंथाने दुसऱ्यांदा संसार थाटला आहे… (Samantha and Naga Chaitanya marriage)

समंथाचा नवरा राज निदिमोरु हा लोकप्रिय दिग्दर्शक असून सध्या तो ‘द फॅमेली मॅन’ या वेब सीरीजमुळे विशेष चर्चेत आहे… राज याचंही हे दुसरं लग्न असून त्याचं पहिलं लग्न श्यामली डे हिच्याशी झालं होतं. श्यामलीपासून राजला एक मुलगी आहे. दरम्यान, समंथा आणि राज यांच्या लग्नानंतप त्याच्या एक्स पत्नीने इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट केली होती. त्यात “हताश लोक हताश गोष्टी करतात,” असं लिहिलं होतं. (South Indian Film Gossips)
================================
================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi