Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

Animal : बॉबी देओल मूक-बधीर का होता? संदीप म्हणाले…
आपलं कुटुंब किंवा पालकांची काळजी घेणं हे भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. फॅमिली व्हॅल्यूज थोड्या लाऊड पद्धतीने मांडणारा एक चित्रप२०२३ मध्ये आला आणि त्याने बॉलिवूडचं नशीबचं पालटलं. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ या चित्रपटातील रक्तरंजितपणा आजवर कुठल्याच हिंदी चित्रपटात इतक्या मोठ्या प्रमाणात दाखवला गेला नव्हता. शिवाय अलीकडे नायकापेक्षा खलनायकचं जास्त भाव खाऊन जातात याचंही उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट. इंडस्ट्रीत अनुभवाच्या आणि वयाच्यामानाने रणबीर कपूरपेक्षा बॉबी देओल सीनियर. आणि विशेष म्हणजे अभिनय आणइ क्षेत्रातील सिनियॉरीटी बॉबी देओल याने ‘अॅनिमल’ या चित्रपटातून टिकवली आहे. खलनायक म्हटलं की त्याचे तुफान डायलॉगबाजी आलीच पण ‘अॅनिमल’ चित्रपट याला अपवाद ठरला. बॉबी देओल‘अॅनिमल’मध्ये मूक-बधीर का दाखवला याचं कारण संदीप वांगा यांनी सांगितलं आहे. जाणून घेऊयात…(Animal)
खरं तर ‘अॅनिमल’ (Animal) चित्रपट ज्यावेळी आला तेव्हा इतके लाऊड अॅक्शन सीन्स, हाणामारी, रक्तरंजितपणा, हिंसा यामुळे लहान पिढीला चुकीचा संदेश दिला जात आहे असं बरंच काही बोललं गेलं. पण सगळ्या टिकांना सामोरं जात संदीप रेड्डी वांगा (Sandeep reddy Ganga) यांचा ‘अॅनिमल’ चित्रपट २०२३ मधला सुपरहिट चित्रपट ठरला. १५ ते २० मिनिटांच्या खलनायकाच्या भूमिकेतील बॉबी देओल (bobby deol) अक्षरश: रणबीरला खाऊन गेला.

खलनायक असूनही बॉबी देओलच्या तोंडी डायलॉग का? दाखवले नाही याचा खुलासा संदीप यांनी कोमल नाहटाला दिलेल्या मुलाखतीत केला. ते म्हणाले की,” चित्रपट भावना आणि फॅमिली ड्रामा यांचं मिश्रण आहे. म्हणूनच बॉबीच्या भूमिकेसाठी आम्हाला डायलॉग्स मुद्दाम कमीच ठेवायचे होते. इतर चित्रपटांमध्ये आपण डायलॉगबाजी पाहतोच. मला वाटलं. खलनायक असलेल्या बॉबीला मूकबधीर दाखवणं इंटरेस्टिंग होऊ शकतं. जो बोलू शकत नाही आणि ऐकूही शकत नाही अशा माणसाशी लढण्याची कल्पना मला फारच भारी वाटली.” त्यामुळे बॉबी देओलने त्याच्या आजवर लपवून ठेवलेल्या अभिनय कौशल्यातून खलनायकाची अशी काही पुंजी बाहेर काढली की वातावरण गारच करुन टाकलं. त्याच्या बॉडी लॅंग्वेजमधून त्याच्यातील क्रुरपणा दिसून येत होता; त्यामुळे नक्कीच त्याच्या तोंडी एकाही संवादाची गरज भासली नाही. (Animal park)

आजवर बॉबी देओलने हिंदी चित्रपसृष्टीत अनेक चित्रपट केले. २९ वर्षांपेक्षा अधिक काळ तो या इंडस्र्टीमध्ये असून त्याला हवं तितकं अप्रिसिएशन मिळालं नव्हतं किंवा त्या ताकदीचे रोल त्याच्या वाट्याला आले नव्हते. पण ‘अॅनिमल’च्या निमित्ताने त्याला ही संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं नक्कीच केलं. ‘अॅनिमल’ नंतर बॉबी देओलला दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. ‘कंगुआ’,’डाकू महाराज’ या सिनेमांमध्ये त्याने खलनायक साकारला. शिवाय लवकरच तो’जननायगन’ चित्रपट आणि’आश्रम सीरिज पार्ट ३’ मध्ये दिसणार आहे. (Bollywood sequels)
‘ॲनिमल’ (animal) चित्रपटामुळे जसं बॉबी देओलचं नशीब बदललं तसंच तृप्ती डिमरी (Tripti dimri) हिला देखील एक नवी ओळख आणि भाभी २ हा टॅग मिळाला. या चित्रपटात असे अनेक सीन्स होते जे करताना तिला जरा अवघडल्यासारखं वाटत होतं आणि त्याबद्दल बऱ्याच मुलाखतींमध्ये तिने खुलासा देखील केला आहे. एक किस्सा सांगताना तृप्ती म्हणाली की, एक कन्फेशन सीन होता. तो कन्फेशन सीन शूट करताना खूप अडचणी आल्या. या सीन दरम्यान मला रडायचं होतं पण मला रडायलाच येत नव्हतं आणि मी माझे डायलॉग्सही विसरत होते. त्यावेळी रणबीरने मला खुप मदत केली होती”. शिवाय तृप्ती असं देखील म्हणाली की रणबीरने (Ranbir Kapoor) माझ्या सोयीनुसार सीन्स शुट करु असं म्हटलं होतं. भलेही मी माझं बेस्ट काम देऊ शकले नाही, तरीही रणबीर किंवा संदीप रेड्डी वांगा यांनी मला वाईट वाटू दिलं नाही किंवा माझ्यामुळे वेळ जात होता हेही त्यांनी तिला जाणवू दिलं नाही”. (Bollywood tadaka)
=============================
हे देखील वाचा :Chhaava : बॉक्स ऑफिसवर Animal चित्रपटालाही ‘छावा’ने टाकलं मागे
=============================
लवकरच ‘अॅनिमल’ चित्रपटाचा दुसरा भाग ‘अॅनिमल पार्क’ येणार असून आता त्यात अजून हिंसा आणि दोन भावांची गोष्ट दिसणार असं म्हटलं जात आहे. पहिल्या भागात इतकं रक्त होतं तर दुसऱ्या भागात काय असणार आणि खलनायक नेमका आता कोण असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Entertainment masala)