ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
संतोष जुवेकर पूर्ण करणार पाठीराखा बनून इंदूची इच्छा? ‘इंद्रायणी’ मालिकेत विठू पंढरपूरकर पुन्हा झळकणार!
‘कलर्स मराठी‘ वाहिनीवरील ‘इंद्रायणी‘ मालिका अल्पावधीतच महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली आहे. मालिकेने नुकतचं 100 भागांचा टप्पा पार केला आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या आषाढी एकादशी विशेष भाग पार पडत आहे.’इंद्रायणी‘ मालिकेत विठू पंढरपूरकर पुन्हा झळकणार असल्याचं समोर आलं आहे. प्रोमो आऊट झाल्याने संतोष जुवेकर पाठीराखा बनून इंदूची इच्छा पूर्ण करणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.(Santosh Juvekar in Indrayani Serial)
प्रोमोमध्ये इंदू विठूरायाच्या दानपेटीत तिच्या इच्छांनी भरलेली एक चिठ्ठी टाकताना दिसत आहे. तसेच माझ्या या इच्छा आता तुलाच पूर्ण करायच्या आहेत विठूराया असं म्हणताना दिसत आहे. अशातच विठू पंढरपूरकरची एन्ट्री होते. विठू पंढरपूरकर इंदूला म्हणतो,”या आषाढीला तुझी इच्छा तुच पूर्ण करणार बाळा”. आषाढी एकादशी विशेष भाग या रविवारी संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.
‘इंद्रायणी‘ या मालिकेत विठू पंढरपूरकरच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला की,”कलर्स मराठी‘ या वाहिनीवर सुरू असलेल्या ‘इंद्रायणी‘ या मालिकेत एका सुंदर अशा भूमिकेत तुम्ही मला पाहताय. ‘विठू पंढरपूरकर‘ असं या भूमिकेचं नाव आहे. या पात्राला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या भूमिकेसाठी शांत, सोज्वळ आणि निरागसपणा चेहऱ्यावर आणण्याचा मी प्रयत्न करतोय. माऊलींवर माझी नितांत श्रद्धा असल्याने ही भूमिका साकारताना मला कोणतंही दडपण येत नाही. अशापद्धतीची सुंदर भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल संपूर्ण कलर्स मराठीच्या टीमचे खूप-खूप आभार”.(Santosh Juvekar in Indrayani Serial)
===============================
हे देखील वाचा: ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती!
===============================
संतोष जुवेकर पुढे अस ही म्हणाला की,”इंद्रायणी‘ मालिकेतील इंदू खूपच गोड आहे. इंदूसह मालिकेतील इतर बालकलाकारांसोबत काम करताना खूप काही वेगळं आणि नव्याने शिकायला मिळत आहे. त्यांच्यासारखं आणखी छान काम करायला हवं, याची जाणीव होते.’इंद्रायणी‘ मालिकेसोबत माझं एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. विठू पंढरपूरकर हे पात्र साकारणं मला चॅलेजिंग वाटत नाही कारण माऊलींच्या कृपेने मी ही भूमिका साकारतोय”. ‘इंद्रायणी’ मालिका दररोज संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर आणि JioCinema पाहता येईल.